IPO AND MARKET NEWS

फोनपे कडून मायक्रोसॉफ्ट फाउंड्री आधारित AI-पॉवर्ड सर्च लाँच

फोनपे कडून मायक्रोसॉफ्ट फाउंड्री आधारित AI-पॉवर्ड सर्च लाँच

POSTED BY ANAGHA SAKPAL ON DATED 28 FEBRUARY 2026 (9004379946)

मुंबई, (NHI@24.COM)फोनपे ने आज मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीच्या मदतीने विकसित केलेले AI-पॉवर्ड ‘नॅचरल लँग्वेज सर्च’ फीचर लाँच करण्याची घोषणा केली. हे फीचर वापरकर्त्यांना साध्या नैसर्गिक भाषेतील मजकूर किंवा व्हॉइस कमांडद्वारे ॲपमधील कामे पूर्ण करण्यास मदत करते, ज्यामुळे प्लॅटफॉर्मचा अनुभव अधिक सोपा आणि वैयक्तिक होणार आहे.

हे नवीन फीचर पारंपारिक नेव्हिगेशनच्या ऐवजी ‘इंटेंट-बेस्ड राउटिंग’चा (वापरकर्त्याचा हेतू ओळखून मार्ग दाखवणे) वापर करते. उदाहरणार्थ, जर वापरकर्त्याने “हेमंतला ₹२० रुपये द्या” अशी कमांड दिली, तर ॲप आपोआप पेमेंट पेज उघडेल आणि संबंधित नाव निवडेल. त्याचप्रमाणे,”फास्टॅग रिचार्ज करा” किंवा “सोन्याचा भाव” अशा कमांड्स दिल्यास वापरकर्ता थेट संबंधित पेजवर पोहोचेल.

केवळ व्यवहारांपुरते मर्यादित न राहता, हे फिचर युजरला नेमके काय करायचे आहे (पेमेंट, खरेदी किंवा सपोर्टची मदत) हे ओळखू शकते. हे सर्व ‘हायब्रिड मॉडेल’द्वारे (ऑन-डिव्हाईस आणि क्लाउड इन्फरन्सिंग) केले जाते, ज्यामुळे युजरचा खाजगी डेटा आणि व्यवहारांची माहिती सुरक्षित राहते आणि ती फोनेपे च्या सुरक्षित वातावरणाबाहेर जात नाही.

*या लाँचबद्दल बोलताना फोनेपे चे संस्थापक आणि CTO राहुल चारी म्हणाले:* “अनेक वर्षांपासून पेमेंट ॲप्स हे केवळ व्यवहारांसाठी वापरले जात होते. पण आम्ही आता तो दृष्टिकोन बदलत आहोत. प्रत्येक भारतीयासाठी पेमेंट सोपे करणे हे आमचे व्हिजन आहे. मायक्रोसॉफ्ट सोबतच्या सहकार्याने, आम्ही केवळ इनपुट नाही तर वापरकर्त्याचा हेतू समजून घेऊन पेमेंट प्रक्रिया अधिक सोपी करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की सुरक्षा आणि गोपनीयतेशी तडजोड न करता मूल्य प्रदान करण्याचा हा सर्वात विचारपूर्वक केलेला प्रयत्न आहे.”

*मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष पुनीत चांदोक म्हणाले:* “जास्तीत जास्त भारतीय आता डिजिटल सेवांशी संवाद साधण्यासाठी नैसर्गिक भाषेचा वापर करत आहेत. फोनेपे चा हा नवीन अनुभव अधिक सोप्या डिजिटल पेमेंटच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. मायक्रोसॉफ्ट फाउंड्री नाविन्यपूर्ण कंपन्यांना सुरक्षित आणि मानवकेंद्रित उत्पादने तयार करण्यास मदत करते. आम्ही भारताच्या डिजिटल परिसंस्थेला विश्वासार्ह AI सह पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

हे फीचर संपूर्ण भारतातील वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जाईल. वापरकर्ते फोनेपे ॲपवरील ग्लोबल सर्च बार, हेल्प सेंटर आणि हिस्ट्री टॅबद्वारे या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!