खेल

उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 21/01/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) : श्री उद्यानगणेश मंदिर चषक राज्य स्तरीय विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत शेठ जगीलाल पोद्दार अकॅडमी–मालाड स्कूलच्या प्रसन्न गोळेने श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरच्या उमैर पठाणचा २१-१ असा पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. पहिले दोन बोर्ड हातून निसटल्यामुळे उमैर पठाणला अखेर अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर व टी शर्ट पुरस्काराने समितीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार वैद्य, कार्यवाह मधुकर प्रभू, व्यवस्थापक संजय आईर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गौरविण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील श्री उद्यानगणेश मंदिर मंडपामध्ये झालेल्या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात प्रसन्न गोळेने पुष्कर गोळेचे आव्हान २१-९ असे तर उमैर पठाणने ग्रीष्मा धामणकरचे आव्हान १४-७ असे संपुष्टात आणून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. विविध जिल्ह्यातील ४८ खेळाडूंच्या शालेय कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा पुष्कर गोळे व व्ही.एन. सुळे गुरुजी हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर यांनी उपांत्य उपविजेते; महात्मा गांधी विद्या मंदिर-वांद्रेची तनया दळवी, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा विराज बर्वे, पार्ले टिळक विद्यालयाचा दुर्वेश चव्हाण व शेठ करमशी कानजी स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी यांनी उपांत्यपूर्व उपविजेते तर जनरल एज्युकेशन स्कूलचा वेदांत लोखंडे, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा शिवांश मोरे, शिवाजी नगर हायस्कूलचा अद्वैत महाडिक, कुमुदिनी विद्यामंदिर-गोवंडीचा प्रज्वल गेडाम व आयुष मुल्लाम, ब्लॉसम इंग्लिश स्कूल-मरीन लाईनचा संचित जगताप, श्री नारायण गुरु हायस्कूलचा शाहीद खान, शारदाश्रम विद्यामंदिरचा सोहम जाधव यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद पटकाविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!