थंडीच्या दिवसांमध्ये पोषणामधील तीळाचे महत्त्व
थंडीच्या दिवसांमध्ये पोषणामधील तीळाचे महत्त्व

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 15/01/2026 📞 8850212023
थंडीच्या दिवसांमध्ये पोषणामधील तीळाचे महत्त्व: आधुनिक काळात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीचा प्राचीन उपाय-
बेंगळुरूमधील नारायणा हेल्थ सिटीमधील क्लिनिकल न्यूट्रिशन व डायटेटिक्स सुपर्णा मुखर्जी
मुंबई NHI24.COM(M) हिवाळा सुरू झाला की तापमान वेगाने कमी होते आणि मानवी शरीरात जैविक स्तरावर बदल होऊ लागतात. वैद्यकीय पोषण शास्त्राच्या दृष्टीने हिवाळ्यामध्ये प्रत्येकजण विशिष्ट आहाराचे सेवन करत आपल्या आरोग्यावर अधिक लक्ष केंदित करतात. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराचे अंतर्गत संतुलन राखण्यासाठी चयापचय क्रिया उत्तम ठेवण्यासह ऊर्जा वाढवणे आवश्यक असते. सोयीसुविधा आणि आधुनिक कृषी पद्धतींमुळे हिवाळ्यातील फळे इतर ऋतूंमध्ये देखील सेवन करता येऊ शकतात, पण त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.
भारतीय उपखंडातील पारंपारिक खाद्यसंस्कृतीकडे पाहिले तर लक्षात येते की हिवाळ्याचे आगमन आणि तिळाची कापणी यामध्ये मोठा संबंध आहे. तीळ म्हणजे फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा घटक आहे, हा समज चुकीचा आहे. उलट तीळ अत्यंत पौष्टिक आहे, जे हिवाळ्यामध्ये प्रतिकूल स्थितींचा सामना करण्यास मदत करू शकते. जानेवारी महिन्यातील मकर संक्रांती, लोहरी आणि पोंगल यांसारख्या सणांदरम्यान या प्राचीन हेल्थ हॅकचे महत्त्व पाहायला मिळते.
थर्मोजेनिक पॉवरहाऊस: हिवाळ्यामध्ये ऊर्जा देणारे स्रोत
पोषक घटकांनुसार तीळ हे दर्जेदार फॅटी अॅसिड्स आणि प्रथिनांचे सर्वोत्तम स्रोत आहे. हिवाळा जवळ आला की, शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी (थर्मोजेनेसिस) चयापचय क्रिया वेगाने काम करू लागते, ज्यामुळे शरीराचा ‘रेस्टिंग एनर्जी एक्सपेंडिचर’ (आरईई – विश्रांतीच्या काळातील ऊर्जा वापर) बदलतो. तिळामध्ये आढळणारे मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स दुर्मिळ आहेत. हे फॅटी अॅसिड्स शरीरासाठी मंद गतीने जळणाऱ्या इंधनाप्रमाणे काम करतात, ज्यामुळे सतत ऊर्जा मिळते आणि हिवाळ्यात जाणवणारा आळस व सुस्ती दूर राहण्यास मदत होते.
कॅलरी व्यतिरिक्त तिळामध्ये सेसामिन आणि सेसामोलिन ही दोन विशिष्ट संयुगे असतात, जी त्यांच्या प्रबळ अँटी-ऑक्सिडंट गुणांसाठी ओळखली जातात. ही दोन्ही संयुगे शारीरिक तणावामुळे वाढण्याची शक्यता असलेल्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसवर नियंत्रण ठेवतात. गुळाचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या गोड पोंगलसारख्या पदार्थात तीळ घातले जाते, तेव्हा त्यामधील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनची पातळी सुधारते, परिणामी सांध्यांना नैसर्गिक उष्णता मिळते. मिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते. हे पोषक घटक सांधेदुखी, कंबरदुखी आणि सांध्यांचा ताठरपणा कमी करण्यास मदत करतात, जेथे विशेषत: थंडीच्या दिवसात ज्येष्ठ नागरिकांना या समस्यांचा अधिक त्रास होतो.
‘कोरडेपणा’पासून संरक्षण: शरीरातील इंटर्नल ल्युब्रिकेशन
हिवाळ्यामध्ये दुर्लक्ष होणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे हवेमध्ये आर्द्रेतेचे कमी प्रमाण, ज्यामुळे आपली त्वचा आणि श्वसनमार्गातील ओलावा कमी होतो. पोषण शास्त्रामध्ये या समस्येवर ‘इंटर्नल ल्युब्रिकेशन’च्या माध्यमातून या समस्येचे निराकरण करण्यात आले आहे. तिळामध्ये असणारे नैसर्गिक तेल पद्धतशीर मॉइश्चरायझरप्रमाणे काम करते, ज्यामुळे शरीराला आतून ओलावा मिळतो.
हिवाळ्यात सेवन केल्या जाणाऱ्या आहारात अशा आरोग्यदायी फॅट्सची कमतरता असेल तर त्वचेला भेगा पडणे, कोरडेपणा आणि खाज सुटणे असे त्रास होतात. तीळ त्वचेतील ओलावा संतुलित राखण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, तीळ श्वसनसंस्थेची संवेदनशीलता कमी करण्यास देखील मदत करतात. नाकातील मस्कस मेम्ब्रेन्स कोरडी पडल्यास हवेतील विषाणू आणि जीवाणू सहजपणे नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तीळ सांध्यांमधील घर्षण रोखण्यास मदत करतात, जेथे थंडीमुळे सांध्यांमधील द्रव आकुंचन पावून त्यावर परिणाम होऊ शकतो. तिळातील तांबे व कॅल्शियम सांध्यांचे आरोग्य आणि हाडांची घनता टिकवून ठेवतात, ज्यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या वेदनांसाठी ते पौष्टिक ‘बफर’प्रमाणे (संरक्षक कवच) काम करतात.
पौष्टिक संरक्षक म्हणून साजरा केला जाणारा सण
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजेच उत्तरायण सुरू होते तेव्हा मकर संक्रांती सण साजरा केला जातो. यादरम्यान हिवाळ्यामधील कोरडेपणा खूप वाढलेला असतो. आपली रोगप्रतिकारशक्ती सर्वात कमकुवत असते, अशा काळात शरीराला आवश्यक असलेले पोषण व उष्णता तिळाच्या सेवनामधून मिळते. जानेवारीमधील हे कापणीचे सण नवीन ऊर्जा देण्याचे माध्यम ठरतात. या सणांदरम्यान तयार केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमधून झिंक, सेलेनियम व मॅग्नेशियम मिळते, जे टी-सेल निर्मिती आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. प्राचीन काळापासून हंगामी तापाविरुद्ध अशा प्रकारचे संरक्षण अस्तित्वात आहे, त्या काळात व्हिटॅमिन गोळ्यांबाबत कोणालाही माहित नव्हते.
‘उष्णता’ देणाऱ्या खाद्यपदार्थांकडे दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम
आपण ऋतूनुसार आहारामध्ये बदल करत नाही तेव्हा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? वातानुकूलित कार्यालये आणि प्रक्रिया केलेल्या थंड पदार्थांचे सेवन केल्या जाणाऱ्या आजच्या युगामध्ये अनेक व्यक्तींना ऋतूनुसार आहारामध्ये बदल करण्याबाबत माहित नाही. हिवाळ्यात तिळासारख्या उष्ण आणि पोषक घटकांनी समृद्ध पदार्थांचे सेवन न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.
१. चयापचय क्रिया मंदावणे
तीळ व नट्समध्ये थर्मोजेनिक फॅ्टस असतात, ज्यामुळे यांचे सेवन न केल्यास चयापचय क्रिया कमी होऊन शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते. यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये थकवा, निरूत्साह आणि वजन नियंत्रणात न राहणे असे त्रास होऊ शकतात. सामान्यत: हिवाळ्यामध्ये आपल्याला स्वेटर सारखे उबदार कपडे परिधान करायला आवडते, ज्यामुळे आपण आधीच आळशी झालेलो असतो. अशा वेळी, आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी तीळ उत्तम पर्याय आहे.
२. हाडांची झीज आणि मिनरलची कमतरता
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन-डी पातळी कमी होते. कॅल्शियम शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन-डी अत्यंत आवश्यक असते. कॅल्शियमची कमतरता भासल्यास शरीर रक्तातील कॅल्शियमची पातळी राखण्यासाठी हाडांमधील कॅल्शियम घेऊ लागते. तीळ हा वनस्पती-आधारित कॅल्शियमचा सर्वात समृद्ध स्रोत आहे, त्यामुळे ते थंडीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या या कमतरतेला रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिटॅमिन-डी किंवा कॅल्शियमसाठी फक्त कृत्रिम गोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आहारात दररोज किमान ३० ग्रॅम तिळाचा समावेश करणे अत्यंत उपयुक्त आहे.
३. पचनक्रिया मंदावते
थंड हवामानामुळे नैसर्गिकरित्या पचनसंस्था आकुंचन पावते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवू लागतात. तिळातील फायबरचे उच्च प्रमाण पचनसंस्थेला आवश्यक जडपणा आणि वंगण पुरवते. यामुळे पचनसंस्था कार्यक्षम राहते आणि शरीरात विषारी द्रव्ये साचण्याला प्रतिबंध होतो. शरीरात विषारी द्रव्ये साचल्यास त्वचेवर पुरळ उठणे आणि थकवा जाणवणे असे परिणाम दिसून येऊ शकतात. पण तिळाच्या सेवनाने ते टाळता येते.
तीळ आपल्याला आठवण करून देतात की, आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम उपाय अनेकदा अगदी साध्या घटकांमध्ये दडलेले असतात. हिवाळ्यातील सणांचे महत्त्व फक्त कॅलेंडरवरील तारखांपुरते मर्यादित नाही, तर हे सण आपले शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तिळासारख्या पदार्थांचे महत्त्व निदर्शनास आणतात. हिवाळ्यातील सुपरफूड म्हणजेच तिळाचे सेवन करून आपल्या शरीराला आवश्यक थर्मोजेनिक ऊर्जा मिळते, जे थंडीपासून आपले संरक्षण करेल.
बदलत्या ऋतूनुसार आपल्या आहारामध्ये बदल केला नाही तर आपण स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत, असा अर्थ होतो. याचा परिणाम म्हणजे हिवाळ्यामध्ये थकवा, कोरडेपणा आणि आजारांचा त्रास सहन करावा लागू शकतो.
पण या परंपरेचा स्वीकार करून आहारामध्ये केलेला विशिष्ट बदल म्हणजे आपल्या पूर्वजांच्या प्रगल्भ ज्ञानाचा खऱ्या अर्थाने सन्मान ठरेल. थंडीच्या दिवसांमध्ये तिळाचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. यासह आपण हिवाळ्यामध्ये आरोग्यदायी राहण्यासोबत ऋतूचा उत्साहात आनंद घेऊ शकतो.




