https://newshindindia24.com/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र

सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर - सुझुकी ई ऍक्सेस भारतात लॉन्च

सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर - सुझुकी ई ऍक्सेस भारतात लॉन्च

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 09/01/2026 📞  8850212023
e-Access DIgital Banners

सुझुकी मोटरसायकल इंडिया तर्फे त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर असलेल्या च्या बुकिंग ची सुरुवात

मेटॅलिक मॅट स्टेलर ब्ल्यू / मेटॅलिक मॅट फायब्रॉईन ग्रे या ड्युअल टोन रंगाचीही सुरुवात

गुरुग्राम, NHI24.COM(M) –  सुझुकी मोटरसायकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएमआयपीएल),  या जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या दुचाकी कंपनी तर्फे आज त्यांच्या पहिल्या अशा सुझुकी ई क्सेस च्या बुकिंगच्या सुरुवातीची घोषणा केली. या उत्पादनाच्या सुरुवाती मुळे सुझुकी ने भारतासह जगभरांत दुचाकी क्षेत्रात इलेक्ट्रिक मोबिलिटी विभागात प्रवेश केला आहे.  सुझुकी ई क्सेस मुळे कंपनीची विश्वसनीयता, टिकाऊपणा आणि रोजच्या प्रात्यक्षिकतेला चालना मिळू शकेल.

ग्राहकांसाठी निवड करण्याची मोठी संधी देत एसएमआयपीएल ने त्यांच्या रंगाच्यां श्रेणीतही वाढ करुन नवीन ड्युअल टोन शेड्स – मेटॅलिक मॅट स्टेलर ब्ल्यू/ मेटॅलिक मॅट फायब्रॉईन ग्रे अशा दोन नवीन शेड्सही आणल्या आहेत. या मुळे सुझुकी ई क्सेस आता चार आकर्षक अशा रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहेत-  

१.   मेटॅलिक मॅट ब्लॅक नं.२/ मेटॅलिक मॅट बार्डोक्स रेड

२.   पर्ल ग्रेस व्हाईट/ मेटॅलिक मॅट फायब्रॉईन ग्रे

३.   पर्ल जेड ग्रीन/ मेटॅलिक मॅट फायब्रॉईन ग्रे

४.   मेटॅलिक मॅट स्टेलर ब्ल्यू/ मेटॅलिक मॅट फायब्रॉईन ग्रे

 ही घोषणा करतांना सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक श्री.केनीची उमेडा यांनी सांगितले “ सुझुकी ई-क्सेस ही सुझुकीच्या पहिल्या जागतिक बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचे प्रतिनिधीत्व करते.  हे उत्पादन दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, सोपा वापर, अजोड गतीशीलता आणि उच्च गुणवत्तेची फिट न्ड फिनिश देते.  प्रत्येक घटक हा अभ्यास करुन मालकी, सोपी, आनंददायी आणि तणावमुक्त असा आहे,  आम्ही नेहमीच ‘बाय युवर साईड’ च्या माध्यमातून ग्राहकांना सहकार्य करुन त्यांचा इलेक्ट्रिक मोबिलिटी अनुभव समृध्द करत आहोत.”

सुझुकीच्या ई तंत्रज्ञानाने

सुझुकीच्या सुझुकी ई तंत्रज्ञानाने युक्त सुझुकी ई- क्सेस ची निर्मिती ही जगभरांतील मुल्यांना सक्षम करणार्‍या पाच घटकांच्या भोवती फिरते : 

१.   विश्वसनीयता आणि टिकाऊपणा : सुझुकीच्या जागतिक स्तरावरील तपासणी निकषांनुसार सुझुकी ई-क्सेस ही कठोर तपासण्यांतून जात असून यांत सबमर्शन, तापमानातील चढउतार, पडणे, कंपने आणि बॅटरी सुरक्षा तपासण्यांचा समावेश आहे.

२.   अनेक वर्षे टिकणारी बॅटरी : सुझुकी ई क्सेस मध्ये लिथियम आयर्न फॉस्फेट (एलएफपी) बॅटरीचा वापर करण्यात आल्याने ही निकेल मँगनीज कोबाल्ट (एनएमसी) बॅटरीजच्या  तुलनेत चार पट* अधिक बॅटरीचे लाईफ देते.

३.   सोपे हँडलिंग : या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे हलकी चेसिस सह ल्युमिनियम बॅटरी केस जी एकाच फ्रेम मध्ये लावण्यात आल्याने अधिक दणकटपणा, सोपे कॉर्नरिंग आणि समतोल स्ट्रेट लाईन स्टेबिलिटी मिळते.  

४.   अजोड गतीमानता : शक्तीशाली अशा ४.१ केडब्ल्यू मोटर मुळे १५ एनएम टॉर्क मिळाल्याने सुझुकी ई क्सेस मध्ये अजोड गतीशीलता आणि प्रतिसादात्मक फीलिंग हे अगदी १० टक्के स्टेट ऑफ चार्ज (एसओसी) मध्ये मिळते.  या स्कूटर मध्ये तीन राईड मोड्स (इको, राईड ए आणि राईड बी),  रिव्हर्स मोड आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग मोड्स आहेत.

५.   उच्च गुणवत्तेचे फीट न्ड फिनिश : सुझुकी ई क्सेस चे वैशिष्ट्य म्हणजे एलईडी लायटिंग, टू टोन अलॉय व्हील्स आणि मेंटेनन्स फ्री ड्राईव्ह बेल्ट ज्याचे जीवनमान हे ७ वर्षे किंवा ७० हजार किलोमीटर आहे.

इतकेच नव्हे तर स्कूटरचा प्रत्येक टचपॉईंट हा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करत असून यामुळे अजोड पॅनल गॅप्स, व्हायब्रेशन पासून वाचणारे फासनिंग असल्याने थरथर कमी होऊन त्याचा आवाजही होत नाही. यांतील प्रिमियम फील देणार्‍या स्विचेस आणि लीव्हर्सचा ही यात उपयोग करण्यात आला आहे.  

विशाल  विक्री आणि सेवा नेटवर्क तसेच चार्जिंग सुविधा

एसएमआयपीएल कडे १२०० हून अधिक आऊटलेट्सचे नेटवर्क असून यामध्ये ग्राहकांना सुझुकी ई क्सेसचा अनुभव घेऊन सोप्या चार्जिंग सुविधांचा लाभ घेता येईल. सध्या २४० हून अधिक आऊटलेट्स मध्ये डीसी चार्जिंग सुविधा असून ती टप्प्या टप्प्याने वाढवत नेली जाणार आहे.  त्याच बरोबर एसी चार्जर्स हे सर्व १२०० आऊटलेट्स मध्ये उपलब्ध आहेत. त्याच बरोबर प्रमाणित ईव्ही तंत्रज्ञ,  विशेष उपकरणे आणि सुझुकीचे विश्वसनीय नेटवर्क इलेक्ट्रिक मोबिलिटीत प्रवेश करत असलेल्या ग्राहकांना मन:शांती प्राप्त करुन देते.

व्हॅल्यू पॅक्ड उत्पादनांमुळे ग्राहकांचा आनंद द्विगुणित**

ग्राहकांच्या मालकीचा प्रवास अधिक उत्तम आणि चिंतामुक्त करण्यासाठी ग्राहकांना खालील सुविधा सुध्दा देण्यात येत आहेत –

·       कोणत्याही शुल्काशिवाय ७ वर्षांपर्यंत किंवा ८० हजार किलोमीटरची वाढीव वॉरंटी

·       नि:शुल्क अशी तीन वर्षांनंतरची ६० टक्क्यांपर्यतची बाय बॅक श्युरन्स

·       सध्याच्या सुझुकी ग्राहकांसाठी १० हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस

·       सुझुकी ग्राहक नसलेल्या लोकांसाठी ७ हजार रुपयांपर्यंतचा वेलकम बोनस

·       अगदी कमी अशा ५.९९ टक्के व्याजदराने युक्त आकर्षक रिटेल फायनान्सचा पर्याय  

·       लवचिक रेंटल पर्याय अगदी २४ तासांपासून ते ३ वर्षांपर्यंत कालावधीसाठी आकर्षक दरात उपलब्ध

सुझुकी ई क्सेस ची किंमत रु1,88,490 (एक्स शो रुम  दिल्ली)  असून तिचे बुकिंग आता संपूर्ण भारतातील अधिकृत सुझुकी डिलरशिप मध्ये सुरु करण्यात आले आहे.  त्याच बरोबर सुझुकी ई क्सेस आता खरेदीसाठी  विक्री सुरु करण्यात आल्यानंतर फ्लिपकार्ट वर ही उपलब्ध असेल.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!