
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 15/01/2026 📞 8850212023
- सिद्धांत चतुर्वेदी यांच्याकडून आयोजित हा ४ तासांचा एअरबीएनबी ओरिजिन एक्स्पिरियन्स पाहुण्यांना सिद्धांतसोबत मुंबई एक्सप्लोर करण्याची आणि त्याचे आवडते परिसर, कॅफे, गिग स्पेस आणि बरेच काही शोधण्याची खास संधी देतो.
- या अनुभवासाठी बुकिंग १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल.
मुंबई NHI24.COM(M) : २०२६ सालात सुमारे ७७% जेनझी संगीताद्वारे भारताच्या प्रवासाचे नियोजन करत असताना एअरबीएनबी चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संस्कृतीच्या जवळ आणत आहे. लोल्लापालूझासोबतच्या जागतिक लाईव्ह संगीत भागीदारीचा एक भाग म्हणून एअरबीएनबीने मुंबईत लोल्ला इंडिया लाईक अ लोकल हा एक खास एअरबीएनबी ओरिजिनल एक्सपिरीयन्स आयोजित करण्यासाठी अभिनेता, संगीतकार आणि सांस्कृतिक आवाज सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत भागीदारी केली आहे.
एक जिव्हाळ्याचा आयुष्यातील एकमेवाद्वितीय अशा रितीने डिझाइन केलेला हा अनुभव सिद्धांतच्या करियरला आकार देणाऱ्या शहरात पाहुण्यांना आणते – त्याच्या आवडीचा परिसर, खाद्यपदार्थ, संगीत आणि सर्जनशील ठिकाणांमधून- लोल्लापालूझा इंडियात त्याच्यासोबत महोत्सवाचा अनुभव घेताना दररोजच्या प्रवासाची जादू जिवंत करते.
या सहकार्याच्या केंद्रस्थानी ‘द मुंबई गाईडबुक’ आहे. ते सिद्धांत चतुर्वेदी यांनी लोल्लापालूझा इंडिया २०२६ दरम्यान मुंबईला भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी तयार केलेले डिजिटल सिटी गाईड आहे. ज्या शहराने आपल्याला प्रेरणा दिली त्या शहराच्या या गाईडबुकमध्ये सिद्धांत यांनी निवडलेले परिसर, स्थानिक ठिकाणे आणि एअरबीएनबी मुक्कामांचा समावेश आहे. त्यातून शहराचे वैशिष्ट्य प्रतिबिंबित होते. भारतातील सुमारे ७६% जेन झी प्रवाशांनी सांगितले की ते पहिल्यांदाच एखाद्या संगीत कार्यक्रम किंवा महोत्सवासाठी एखाद्या शहराला भेट देत आहेत. हे गाईडबुक याच उत्सुकतेवर आधारित आहे – प्रवाशांना त्यांचा प्रवास समृद्ध करण्यास आणि स्थानिकांप्रमाणे मुंबईचा अनुभव घेण्यास मदत करते.
फक्त चार पाहुण्यांसाठी उपलब्ध असलेला हा अनुभव गाइड प्रत्यक्षात आणतो – त्यांनी केलेल्या शिफारशींचे रूपांतर प्रत्यक्ष क्षण, कथा आणि समान अनुभवांमध्ये करतो. कारण शोध आणि दुर्मिळ क्षण हे अनेक भारतीयांसाठी प्रवासाला चालना देणारे ठरतात. सुमारे ६२% जेन झी प्रवासी म्हणतात की नवीन शहर एक्सप्लोर करणे ही त्यांची सर्वोच्च प्रेरणा आहे आणि ५५% तरूण संगीत कार्यक्रमासाठी प्रवास करताना आयुष्यात एकदाच येणाऱ्या अनुभवांनी आकर्षित होतात. पाहुण्यांना पूर्ण दिवस हा आनंद घेता येईल. त्यांना सिद्धांतच्या आवडत्या स्थानिक फूड जॉइंटपैकी एकावर जेवणाने सुरुवात करून त्यानंतर वांद्र्याच्या ऐतिहासिक रणवर व्हिलेजमधून क्युरेटेड हेरिटेज वॉक करता येईल. यासोबत एका सुंदर जॅम सत्र असेल जिथे जिथे सिद्धांत शहराने प्रेरित एक ओरिजिनल ट्रॅक सादर करेल. त्यानंतर संगीत आणि उर्जेचा अनुभव घेण्यासाठी ते लोल्लापालूझा इंडियाला जातील.
“मुंबईने मला घडवले आहे – मी निर्माण केलेल्या संगीतापासून ते माझ्या आवडीच्या ठिकाणांपर्यंत. एअरबीएनबीवर हा अनुभव इतरांसोबत शेअर करणे आणि त्यांच्यासोबत मुंबई गाइड पुस्तक तयार करणे, हा माझ्या शहरात पाहुण्यांचे स्वागत करण्याचा माझा मार्ग होता – मला आवडणारे परिसर, मला प्रेरणा देणारे आवाज आणि मुंबईला घडवणारे दैनंदिन क्षण. लोल्लापालूझा इंडियामध्ये मुंबईचा अनुभव घेण्यात दिवस घालवणे ही माझ्यासाठी रोमांचक गोष्ट आहे. मी या अतिशय मजेदार दिवसासाठी खूप उत्सुक आहे!”, असे यजमान सिद्धांत चतुर्वेदी म्हणाले.
हा अनुभव लोल्लापालूझा इंडिया २०२६ मध्ये एअरबीएनबीच्या पहिल्या जागतिक लाइव्ह संगीत भागीदारीवर आधारित आहे. त्याची रचना बॅकस्टेज प्रवेशापासून ते कलाकारांच्या नेतृत्वाखालील सत्रांपर्यंत आणि पडद्यामागील टूरपर्यंत – चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संगीत आणि संस्कृतीच्या जवळ आणण्यासाठी करण्यात आली आहे.
“एअरबीएनबीमध्ये आम्हाला कल्पना आहे की हल्ली प्रवासी आयुष्यात एकदाच येणाऱ्या अनुभवाप्रमाणेच नवीन शहर शोधण्याच्या संधीनेही प्रेरित होतात,” असे एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत बजाज म्हणाले. “लाइव्ह संगीतासारखे क्षण अनेकदा त्या प्रवासाला चालना देतात, परंतु स्थानिक परिसर, यजमान आणि दैनंदिन अनुभव त्याला संस्मरणीय बनवतात. लोल्ला इंडिया लाईक अ लोकलसह सिद्धांत ते प्रत्यक्षात आणतो, पाहुण्यांना संगीत, संस्कृती आणि एअरबीएनबी ज्या प्रकारच्या स्थानिक कनेक्शनसाठी ओळखले जाते हे सर्व एकत्र करून त्याच्या डोळ्यांनी मुंबई अनुभवण्याची दुर्मिळ संधी देतो.”
लोल्ला इंडिया लाईक अ लोकल एक्सपीरियन्स बद्दल
सिद्धांत यांच्या नेतृत्वाखाली, हा ४ तासांचा अनुभव मुंबईत होईल आणि त्यात खालील गोष्टी समाविष्ट असतील.
- त्याच्या आवडत्या पदार्थांपासून सुरुवात करणे: सिद्धांतच्या आवडत्या स्थानिक खाद्यपदार्थांपैकी एकाचा आनंद घ्या – वांद्रे येथे असताना तो वारंवार येणाऱ्या परिसरातील आरामदायी हॉटेलमध्ये.
- वांद्र्यात फिरणे: वास्तुविशारद निखिल महाशूर यांच्यासोबत रणवर व्हिलेजमध्ये फिरायला जाऊन वांद्र्याचे आकर्षण आणि इतिहास जाणून घेणे.
- जॅम ऑन: सिद्धांतसोबत एका जिव्हाळ्याच्या जॅम सत्रात सहभागी होणे.
- सिद्धांतसोबत लोल्लापालूझा इंडिया: लोल्लापालूझा इंडियामध्ये संध्याकाळ संगीतमय करणे. सिद्धांत तुमचा मार्गदर्शक असेल आणि एकत्र एक लाईव्ह अभिनय पाहता येईल.
कसे बुक करायचे:
- बुकिंगसाठी विनंती १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता airbnb.com/Siddhant वर उघडेल.
- ४ तासांच्या या अनुभवाचे शुल्क ₹० असेल.
- हा अनुभव कमाल ४ पाहुण्यांसाठी बुक करता येईल. १ किंवा २ लोकांसाठी बुक करा. कृपया लक्षात ठेवा की जागा मर्यादित असल्यास तुम्ही फक्त एका व्यक्तीसाठी बुक करू शकता. पाहुण्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केली जाईल.
- मुंबई, भारत येथील येण्याजाण्याचा खर्च तुम्हाला करावा लागेल.
एअरबीएनबीबाबत
२००७ मध्ये दोन यजमानांनी आपल्या सॅन फ्रान्सिस्कोच्या घरी तीन पाहुण्यांचे स्वागत केले आणि तिथून एअरबीएनबीची स्थापना झाली. तेव्हापासून त्यांची संख्या ५० लाखांहून अधिक झाली आहे आणि त्यांनी जगभरातील जवळजवळ प्रत्येक देशात २ अब्जाहून अधिक पाहुण्यांचे स्वागत केले आहे. दररोज यजमान अद्वितीय मुक्काम, अनुभव आणि सेवा देतात. त्यामुळे पाहुण्यांना स्थानिक समाजाशी अधिक प्रामाणिकपणे जोडणे शक्य होते.
-Ends-


