शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी, 20 जानेवारी 2026 रोजी खुला होणार
शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी, 20 जानेवारी 2026 रोजी खुला होणार
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 15/01/2026 📞 9004379946
प्राईस बँड प्रत्येक इक्विटी समभागासाठी 118 ते 124 रुपयांदरम्यान निश्चित
- प्रति इक्विटी समभागासाठी (दर्शनी मूल्य ₹ 10) फ्लोअर प्राईस दर्शनी मूल्याच्या8 पट आणि कॅप प्राईस दर्शनी मूल्याच्या 12.4 पट आहे.
- बोली/ऑफर खुली होण्याची तारीख – मंगळवार, 20 जानेवारी 2026, आणि बंद होण्याची तारीख – गुरुवार, 22 जानेवारी 2026
- अँकर गुंतवणूकदारांना सोमवार, 19 जानेवारी 2026 रोजी बोली लावता येईल.
- कमीत कमी 120 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास 120 च्या पटीत बोली लावावी लागेल.

मुंबई NHI.COM(M) शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपला आयपीओ मंगळवार, 20 जानेवारी 2026 रोजी खुला करण्याचे ठरवले आहे. या ऑफरसाठी प्रत्येक इक्विटी समभागासाठी 118 ते 124 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी 120 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास 120 च्या पटीत बोली लावावी लागेल.
दर्शनी मूल्य ₹ 10 असलेल्या इक्विटी शेअर्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (एकूण ऑफर आकार) एकूण ₹ 19,072.69 दशलक्ष (₹ 1,907.27 कोटी) पर्यंत आहे. यामध्ये ₹ 10,000 दशलक्ष (₹ 1,000 कोटी) पर्यंतच्या नव्याने जारी केलेल्या इक्विटी शेअर्सचा आणि ₹ 9,072.69 दशलक्ष (₹ 907.27 कोटी) पर्यंतच्या विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या प्रत्येकी ₹ 10 दर्शनी मूल्याच्या शेअर्सचा समावेश आहे.
अँकर गुंतवणूकदारांना सोमवार, 19 जानेवारी 2026 रोजी बोली लावता येईल. बोली/ऑफर मंगळवार, 20 जानेवारी 2026 रोजी खुली होईल आणि गुरुवार, 22 जानेवारी 2026 रोजी बंद होईल. या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे प्रस्तुत करण्यात आलेले इक्विटी शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE सह एकत्रितपणे, “स्टॉक एक्सचेंज”) या स्टॉक एक्सचेंजेसवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरच्या उद्देशांसाठी, NSE हे ‘नियुक्त स्टॉक एक्सचेंज’ आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. येथे वापरलेले परंतु परिभाषित न केलेले सर्व कॅपिटलाईज्ड शब्द, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेल्या अर्थाप्रमाणेच मानले जातील.
ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19(2)(बी) आणि सेबी आयसीडीआर नियमावलीच्या नियम 31 नुसार दिली जात आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर नियमावलीच्या नियम 6(2) चे पालन करून ‘बुक बिल्डिंग प्रोसेस’द्वारे दिली जात आहे, ज्यामध्ये ‘निव्वळ ऑफर’च्या किमान 75% हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) प्रमाणबद्ध रीतीने वाटपासाठी उपलब्ध असेल. कंपनी BRLMs सोबत सल्लामसलत करून, सेबी आयसीडीआर नियमांनुसार क्यूआयबी हिश्यातील 60% पर्यंत भाग स्वेच्छेनुसार ‘अँकर गुंतवणूकदारांना’ देऊ शकते (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). या अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी 40% पर्यंतचा भाग खालीलप्रमाणे राखीव असेल: (अ) 33.33% पर्यंत हिस्सा देशांर्गत म्युच्युअल फंडांसाठी; आणि (ब) 6.67% पर्यंत हिस्सा जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीव असेल. हे वाटप अँकर गुंतवणूकदारांना ज्या किमतीला शेअर्स दिले जातील, त्या किमतीला किंवा त्यापेक्षा जास्त किमतीला वैध बोली प्राप्त होण्याच्या अटीवर असेल. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये कमी सबस्क्रिप्शन झाल्यास किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबी हिश्यात (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळून) जोडले जातील.
नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी ऑफर किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. जर ऑफरच्या किमान 75% वाटप क्यूआयबीना होऊ शकले नाही, तर बोलीची संपूर्ण रक्कम त्वरित परत केली जाईल. मात्र, जर म्युच्युअल फंडांची एकूण मागणी ‘नेट क्यूआयबी पोर्शन’च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड हिश्यातील उर्वरित शेअर्स इतर क्यूआयबीना प्रमाणबद्ध वाटपासाठी उर्वरित क्यूआयबी पोर्शन’मध्ये जोडले जातील. पुढे, ‘नेट ऑफर’चा 15% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा एनआयबीसाठी उपलब्ध असेल, ज्यापैकी (ए) एक तृतीयांश भाग ₹0.20 दशलक्ष ते ₹1.00 दशलक्ष दरम्यान अर्ज करणाऱ्या बोलीदारांसाठी राखीव असेल; आणि (बी) दोन तृतीयांश भाग ₹1.00 दशलक्ष पेक्षा जास्त अर्ज करणाऱ्या बोलीदारांसाठी राखीव असेल. ऑफर किमतीला किंवा त्यापेक्षा जास्त किमतीला वैध बिड्स प्राप्त झाल्यास, सेबी आयसीडीआर नियमांनुसार कोणत्याही एका उप-श्रेणीतील उर्वरित हिस्सा दुसऱ्या उप-श्रेणीतील बोलीदारांना वाटप केला जाऊ शकतो. तसेच, ‘नेट ऑफर’चा 10% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा ‘रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी’ (आरआयबी) उपलब्ध असेल, जो त्यांना ऑफर किमतीला किंवा त्यापेक्षा जास्त किमतीला वैध बोली प्राप्त होण्याच्या अटीवर वाटप केला जाईल.
तसेच, कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवलेल्या भागातून अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना वैध बोली ऑफर किमतीला किंवा त्याहून अधिक किमतीला मिळाल्यास, इक्विटी शेअर्सचे वाटप प्रमाणबद्ध आधारावर केले जाईल. (अँकर गुंतवणूकदार वगळून) सर्व बोलीदारांनी या ऑफरमध्ये केवळ ‘ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट’ (“ASBA”) प्रक्रियेद्वारेच भाग घेणे अनिवार्य आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या संबंधित एएसबीए खात्याचे तपशील (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या युपीआय बोलीदारांच्या बाबतीत युपीआय आयडीसह) देणे आवश्यक आहे, ज्यामध्ये बोलीची रक्कम एससीएसबी (स्वतंत्र बँक) द्वारे किंवा युपीआय यंत्रणेअंतर्गत ब्लॉक केली जाईल. अँकर गुंतवणूकदारांना ऑफरच्या अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये एएसबीए प्रक्रियेद्वारे भाग घेण्याची परवानगी नाही.
शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी, 20 जानेवारी 2026 रोजी खुला होणार



