रियलमी 16 प्रो सिरीजचे पदार्पण : मास्टर डिझाइन आणि पॉवरफुल परफॉर्मन्ससोबत 200MP लुमाकलर पोर्ट्रेट मास्टर
रियलमी 16 प्रो सिरीजचे पदार्पण

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 08/01/2026 📞 8850212023
● 200MP लुमा कलर पोर्ट्रेट कॅमेरा, 3.5× पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स, स्नॅपड्रॅगन® 7 जेन 4 चिपसेट, 7000mAh टायटन बॅटरी आणि अर्बन वाइल्ड डिझाइन असलेला रियलमी 16 प्रो+ हा नाओतो फुकासावा यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. हा फोन 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12GB+256GB या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून त्याची किंमत ₹35,999*पासून सुरू होते.
● 200MP लुमा कलर पोर्ट्रेट कॅमेरा, मीडियाटेक डायमेन्सिटी 7300-Max 5G चिपसेट, 7000mAh टायटन बॅटरी आणि प्रीमियम अर्बन वाइल्ड डिझाइन असलेला रियलमी 16 प्रो हा 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12GB+256GB या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून त्याची किंमत ₹28,999* पासून सुरू होते.
● रियलमी बड्स Air8मध्ये 55dB रिअल-टाइम एएनसी, एआय इअर कॅनल अडॅप्टिव्ह एएनसी, ड्युअल-ड्रायव्हर अॅकूस्टिक्स आणि गुगल जेमिनीवर आधारित एआय व्हॉइस असिस्टंट उपलब्ध आहे. याची किंमत ₹3,799 असून लाँच ऑफरमध्ये विशेष किंमत ₹3,599* इतकी आहे.
● रियलमी पॅड 3मध्ये 2.8K बुक-व्ह्यू डिस्प्ले, AI-पावर्ड प्रॉडक्टिव्हिटी टूल्स आणि 6.6mm अल्ट्रा-स्लिम डिझाइनची 12,200mAh स्लिम टायटन बॅटरी आहे. हा टॅबलेट वायफाय आणि 5G व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून याची किंमत ₹24,999* पासून सुरू होते.
मुंबई NHI24.COM(M) – भारतीय युवकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड असलेल्या रियलमीने आज अत्यंत प्रतीक्षित रियलमी 16 प्रो सिरीजचे अनावरण केले. यामुळे या सिरीजची प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये बेंचमार्क म्हणून असलेली स्थिती अधिक भक्कम झाली आहे. फ्लॅगशिप-टियर रियलमी 16 प्रो+ आणि अॅक्सेसिबल ऑल-राउंडर रियलमी 16 प्रो यांच्या नेतृत्वाखाली ही सिरीज परफॉर्मन्स आणि डिझाइनमध्ये उत्कृष्टतेचा दर्जा वाढवत असून पोर्ट्रेट इमेजिंगच्या स्टॅन्डर्ड्सना नव्याने परिभाषित करण्यावर अभूतपूर्व लक्ष केंद्रित करते.
200MP पोर्ट्रेट मास्टर : प्रत्येक व्हाइब अचूकतेने कॅप्चर करा
रियलमी 16 प्रो सिरीज ही प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये स्वतःला 200MP पोर्ट्रेट मास्टर म्हणून स्थापित करून फ्लॅगशिप-लेव्हल इमेजिंग हार्डवेअर आणि इंटेलिजंट सॉफ्टवेअर यांना एकत्रित आणून पोर्ट्रेट फोटोग्राफीला नव्याने परिभाषित केले जाते. दोन्ही मॉडेल्स हे प्रत्येक मूड आणि क्षणाला अचूकतेने कॅप्चर करण्यासाठी प्रोफेशनल टूल्स ऑफर करतात, तर रियलमी 16 प्रो+ हा फ्लॅगशिप-टियर स्मार्टफोन एक्सक्लुझिव्ह अपग्रेड्ससह क्रिएटिव्ह एक्सप्रेशनला पुढच्या पातळीवर घेऊन जातो.
रियलमी 16 प्रो+ हा सेगमेंटमधील एकमेव 200MP लुमाकलर कॅमेरा आणि 3.5× पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सच्या साहाय्याने नवा बेंचमार्क सेट करतो, ज्यामुळे वापरकर्त्यांना “स्नॅप योर व्हाइब अॅट एव्हरी झूम”चा लाभ घेता येतो. TÜV Rheinland-सर्टिफाइड असलेला हा कॅमेरा नैसर्गिक स्किन टोन्स, प्रभावी डेप्थ आणि अॅटमॉस्फेरिक लाइटिंग डिलिव्हर करतो, ज्यामुळे पोर्ट्रेट्स अधिक उजळून दिसतात. फुलफोकल पोर्ट्रेट लेन्स किट (1×/1.5×/2×/3.5×/4×) आणि प्रोडेप्थ बोकेह अल्गोरिदमच्या सोबतीने हा कॅमेरा केसांइतकी सूक्ष्म ब्लरिंग, थ्री-डायमेन्शनल डेप्थ आणि सर्व फोकल लेंग्थ्सवर तीक्ष्ण डिटेल्स प्राप्त करतो. तेजस्वी प्रकाश आणि उत्साही गर्दी असणाऱ्या पार्ट्यांसाठी डिझाइन केलेला रियलमी 16 प्रो+ सुंदर ग्रुप शॉट्समध्ये लोकांना एकत्र आणतो आणि आकर्षक सोलो पोर्ट्रेट्स सहजतेने कॅप्चर करतो.
याव्यतिरिक्त, रियलमी 16 प्रो+ हा 7× क्लोज-अप्स, 10× स्टेज कॅप्चर्स आणि 120×पर्यंतच्या सुपर झूमला सपोर्ट करतो, तसेच तो 4K फुलफोकल एचडीआर व्हिडिओ (1×/2×/3.5×/7×) आणि मेनट्रॅक अल्गोरिदमलाही सपोर्ट करतो, ज्यामुळे हालचाल करणाऱ्या सब्जेक्ट्सना अचूकपणे लॉक करत स्मूथ, प्रोफेशनल-ग्रेडचे फुटेज मिळतात.
अॅक्सेसिबल रियलमी 16 प्रोमध्येही रियलमी 16 प्रो+ प्रमाणेच 200MP लुमाकलर कॅमेरा आणि गोल्डन पोर्ट्रेट लेन्स किट (1×/1.5×/2×/3.5×/4×) देण्यात आली आहे. हे केसांइतकी सूक्ष्म ब्लरिंग, थ्री-डायमेन्शनल डेप्थ ऑफ फील्ड आणि फ्री फोकल लेंग्थ स्विचिंगसोबत स्पष्ट पोर्ट्रेट्स डिलिव्हर करते, ज्यामुळे वापरकर्ते कोणत्याही झूम लेव्हलवर चकचकीत आणि नैसर्गिक दिसणारे पोर्ट्रेट्स कॅप्चर करू शकतात.

फोटोग्राफीला अधिक स्टायलिश आणि क्रिएटिव्ह बनवण्यासाठी दोन्ही मॉडेल्समध्ये अॅडव्हान्स्ड सॉफ्टवेअर फीचर्सचे संपूर्ण संच उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंडस्ट्री-फर्स्ट असलेल्या व्हाईब मास्टर मोडमध्ये 21 एक्सक्लुझिव्ह कस्टमाइझ्ड टोन्स दिले आहेत, ज्यामध्ये 5 सिग्नेचर पोर्ट्रेट स्टाइल्सचा (लाईव्हली/विंटेज/फ्रेश/नियॉन/विविद) समावेश आहे, तसेच यासोबत एआय एडिट जेनिमध्ये महत्त्वपूर्ण अपग्रेड्स देण्यात आले आहेत. एआय एडिट जेनि व्हॉइस आणि टेक्स्ट कमांड्सना सपोर्ट करते, ज्यामुळे सीमलेस एडिटिंग शक्य होते. यामुळे वन-क्लिक स्टाइल किंवा बॅकग्राऊंड बदलताना नॅचरल फेशियल कन्सिस्टन्सी कायम ठेवली जाते तसेच व्हायरल सोशल मीडिया ट्रेंड्सचे सोपे रेप्लिकेशनही करता येते. एआय लाइटमी आणि एआय स्टाईलमी हे कॅमेरा इंटरफेसमध्ये स्टुडिओ-ग्रेड लाईटिंग इफेक्ट्स आणि मजेदार, स्टायलाइज्ड फिल्टर्स थेट उपलब्ध करवतात. या इनोव्हेशन्समुळे प्रत्येक फोटो तत्काळ शेअर करता येतो आणि वापरकर्त्याच्या युनिक स्टाइलला उत्तमपणे प्रतिबिंबित करतो.
नाओतो फुकासावा यांचे अर्बन वाईल्ड डिझाइन : व्हेअर नेचर सोल मीट्स अर्बन डिझाइन
जेव्हा श्री. नाओतो फुकासावा यांची प्रसिद्ध “विदाउट थॉट” डिझाइन फिलॉसफी आणि रियलमीच्या मालकीची “खरी डिझाइन” एकत्र येतात, तेव्हा व्हिज्युअल अपील आणि डिझाइन फिलॉसफीचे खोलवर परिणाम निर्माण होतात. हा समन्वय रियलमी 16 प्रो सिरीजचा गाभा आहे, जो ब्रँडच्या “अस्सल नाविन्यता” या आवश्यक घटकावर आधारित आहे.
या समन्वयाच्या आधारे रियलमी 16 प्रो सिरीज “अर्बन वाइल्ड डिझाइन” ही डिझाइनची नवीन संकल्पना सादर करते. निसर्गात आढळणाऱ्या गव्हाच्या दाण्यांच्या आणि दगडांच्या आकर्षक संरचनेपासून प्रेरणा घेत या डिझाइनचे प्रत्येक तपशील स्पर्श करण्याची सहज इच्छा निर्माण करतात आणि वाइल्ड नॅचरल टेक्सचर्स व अत्याधुनिक अर्बन एस्थेटिक्स यांचा समतोल साधतात.
रियलमी 16 प्रो+मध्ये इंडस्ट्रीतील पहिले बायो-बेस्ड ऑरगॅनिक सिलिकॉन बॅक कव्हर देण्यात आले आहे, हे एक युएसडीए-सर्टिफाइड इको-फ्रेंडली मटेरियल असून ते सॉफ्ट आणि रेसिलियंट टेक्स्चर ऑफर करते. त्याचा रिफाइन्ड व्हीट-ग्रेन पॅटर्न बोटांना गव्हाच्या शेतातून फिरवल्यासारखी अनुभूती देतो. सोबतच, त्याची ऑल-नेचर कर्व्ह डिझाईन ही बॅक पॅनलपासून डिस्प्लेपर्यंत सीमलेस आणि कम्फर्टेबल ग्रिप सुनिश्चित करते.
रंगांचे पर्यायही तितकेच वेगवेगळे आहेत. रियलमी 16 प्रो+ हा पुढील दोन मास्टर-क्युरेटेड रंगांमध्ये उपलब्ध आहे : मास्टर गोल्ड, जो सूर्यप्रकाशात न्हालेल्या गव्हाच्या शेतांपासून प्रेरित आहे आणि मास्टर ग्रे, जो ओहोळातील गुळगुळीत गोट्यांना प्रतिबिंबित करतो. याशिवाय, कॅमेलिया पिंक हा एक फ्रेश शेडही उपलब्ध आहे, जो उमललेल्या कॅमेलिया फुलांच्या नाजूक सौंदर्यापासून प्रेरित असून हा रंग खासकरून फक्त भारतात उपलब्ध आहे.
कॅमेऱ्याच्या डिझाइनमधील सूक्ष्म तपशीलांकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. लक्झरी पीव्हीडी ट्रीटमेंट आणि नॅनोस्केल कोटिंगद्वारे तयार केलेला मेटल मिरर कॅमेरा डेको हा दागिन्यासारखा चमकतो आणि त्याचवेळी ओरखडे येण्यापासून व गंजण्यापासून संरक्षण करतो. दरम्यान, यातील वोल्कॅनिक कॅमेरा डेको हे लेन्सला बॉडीमध्ये अखंडपणे इंटिग्रेट करते, ज्यामुळे स्लीक आणि एर्गोनॉमिक होल्ड प्राप्त होते. हे सर्व 8.49mm अल्ट्रा-स्लिम प्रोफाइलमध्ये साध्य करण्यात आले असून यातून उत्कृष्टता आणि टिकाऊपणा यांचा सुंदर संगम घडून येतो.
रियलमी 16 प्रो हाही सारख्याच डिझाइन फिलॉसफीचा अवलंब करत उत्कृष्ट व्हॅल्यू प्रदान करतो. हा फोन कोलॅबोरेशनचा सिग्नेचर शेड असलेल्या मास्टर गोल्डमध्ये उपलब्ध असून तो स्किन-फ्रेंडली टॅक्टाइल अनुभव देतो. याशिवाय, नदीतील गोट्यांच्या स्मूथ टेक्सचरपासून प्रेरित पेबल ग्रे आणि शांतता व सौंदर्याचा प्रतीक असलेला ऑर्चिड पर्पल हे रंगही उपलब्ध आहेत. इंडस्ट्री-लीडिंग व्हेल्वेट मॅट फिनिश हे सहज आणि सॉफ्ट स्पर्श देते आणि ते रंगहीनतेला प्रतिरोधक आहे, तर त्याची स्लीम, लाइटवेट बॉडी सहज कम्फर्ट प्रदान करते. ही कोहिसिव्ह डिझाइन लँग्वेज realme 16 Proला रियलमी 16 प्रो+च्या सारखे प्रीमियम एस्थेटिक देते, ज्यामुळे मास्टर-लेव्हल डिझाइन ही अधिक वापरकर्त्यांसाठी सुलभ होते.
डिझाइनच्या पलीकडे जात रियलमी 16 प्रो सिरीज ही IP69 प्रो-लेव्हल वॉटर रेसिस्टन्स ऑफर करते, जे वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ प्रोटेक्शनसाठी इंडस्ट्रीतील सर्वोच्च मानकांना पूर्ण करते. हे दोन्ही डिव्हाइसेस उच्च दाबाचे वॉटर जेट्स आणि 80°Cपर्यंतचे तापमान यांसारख्या तीव्र परिस्थितींना सहन करतात तसेच अंडरवॉटर फोटोग्राफीलाही सपोर्ट करतात. सोबतच, रियलमी 16 प्रो+मध्ये अतिरिक्त संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i उपलब्ध असून ते पडण्यापासून आणि स्क्रॅचेसपासून उत्कृष्ट संरक्षण देते आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करते.
अग्रेसर कामगिरी : रॉकेट एव्हरी मूव्ह
रियलमी 16 प्रो सिरीज पॉवरफुल हार्डवेअर आणि युनिफाइड सॉफ्टवेअर एन्हान्समेंट्स यांना एकत्रित करून सेगमेंट-लीडिंग परफॉर्मन्स प्रदान करते.
रियलमी 16 प्रो+मध्ये Snapdragon® 7 Gen 4 चिपसेट उपलब्ध असून तो 1.44 मिलियनचा AnTuTu स्कोअर प्राप्त करतो आणि 120FPSवर लॅग-फ्री गेमिंग शक्य करतो. यासोबत रॉकेट LPDDR5X रॅम दिली असून ही प्रीमियम लो-पॉवर DRAM आहे, जी 8400Mbpsपर्यंतच्या रीड आणि राइट स्पीडला सपोर्ट करते. हे संयोजन मल्टिटास्किंग, एआय फोटो प्रोसेसिंग आणि गेमिंग स्टॅबिलिटीला वाढवते. याशिवाय, रियलमी 16 प्रो+मध्ये 6.8-इंच 1.5K 144Hz हायपरग्लो 4D कर्व्ह+ डिस्प्ले आहे. त्याचे 6500nitचे पीक ब्राइटनेस बाहेरील तीव्र प्रकाशातही कंटेंटला क्लिअर आणि विविधरंगी ठेवते. 4608Hz PWM डिमिंग आणि 10-bit 1.07 billion कलर डेप्थमुळे आय-प्रोटेक्टिव्ह आणि समृद्ध व्हिज्युअल्स प्राप्त होतात, यामुळे हे डिव्हाइस इमर्सिव्ह आणि कम्फर्टेबल एंटरटेनमेंटसाठी आदर्श आहे.
रियलमी 16 प्रोमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7300-Max 5G चिपसेट उपलब्ध असून तो AnTuTuवर 970,000 पेक्षा जास्त स्कोअर मिळवतो, ज्यामुळे दररोज स्मूथ परफॉर्मन्स सुनिश्चित होते. यात 6.78-inch 1.5K फ्लॅट 144Hz AMOLED डिस्प्ले आहे.
दोन्ही मॉडेल्समध्ये सामाईक मजबूती म्हणून दिवसभर पॉवर प्रदान करणारी अल्ट्रा-स्लिम 7000mAh टायटन बॅटरी देण्यात आली आहे, तसेच ओव्हरहिटिंगला टाळण्यासाठी यांच्यात एयरफ्लो व्हीसी कूलिंग सिस्टम उपलब्ध आहे. या भक्कम हार्डवेअरला पूरक म्हणून फ्लक्स इंजिन³सोबत रियलमी UI 7.0 देण्यात आले असून ते 15%पर्यंत फास्टर डेली रिस्पॉन्स आणि अधिक स्मूथ अनुभव प्रदान करते. त्याची युजेबिलिटी आणखी वाढवण्यासाठी त्यातील नेक्स्ट एआय हे एआय फ्रेमिंग मास्टर, एआय रेकॉर्डिंग, एआय ट्रांसलेशन, एआय गेमिंग कोच आणि गूगल जेमिनी लाइव्ह यांसारख्या इंटेलिजंट फीचर्सना अनलॉक करते, हे प्रत्येक परिस्थितीमध्ये कार्यक्षमता आणि कल्पकतेला उंचावतात.
रियलमी बड्स एयर8 – द अल्टिमेट एआय साऊंड मास्टर
रियलमीने रियलमी 16 प्रो सिरीजच्या सोबतीने दैनंदिन डिजिटल अनुभवाला अधिक उंचावण्यासाठी दोन पॉवरफुल इकोसिस्टम उपकरणेही सादर आहेत. नव्याने लाँच झालेले रियलमी बड्स एयर8 हे एआय-पावर्ड साऊंड मास्टर म्हणून तयार करण्यात आले असून यांमध्ये बेस्ट-इन-क्लास 55dB रिअल-टाइम नॉईज कॅन्सलेशन, अॅडव्हान्स्ड 11+6mm ड्युअल-ड्रायव्हर सेटअप आणि रिच व हाय-डेफिनिशन वायरलेस साऊंडसाठी LHDC 5.0 सर्टिफिकेशनयुक्त हाय-रेस ऑडिओ उपलब्ध आहे. यामध्ये एआय एयर कॅनल अॅडॉप्टिव्ह एएनसी, क्रिस्टल-क्लिअर कॉल्ससाठी 6-mic डीप नॉईज कॅन्सलेशन सिस्टम आणि गूगल जेमिनीवर आधारित एआय व्हॉइस असिस्टंट 2.0 फेस-टू-फेस ट्रान्सलेशन सपोर्टसोबत उपलब्ध आहेत. या सर्वांमुळे रियलमी बड्स एयर8 हे प्रीमियम, भारत-एक्सक्लुझिव्ह नेचर-टच मास्टर डिझाइनद्वारे इंटेलिजंट आणि इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव प्रदान करतात.
रियलमी पॅड 3 – स्मार्ट लर्निंग, कमी चार्जिंग
पूरक म्हणून कमी चार्जिंगमध्ये अधिक स्मार्ट लर्निंग सक्षम करणारा रियलमी पॅड 3 हा विद्यार्थ्यांसाठी सर्वांत स्मार्ट टॅबलेट म्हणून बाजारपेठेत पदार्पण करतो. एआय रेकॉर्डिंग समरी, सर्कल टू सर्च आणि एआय-असिस्टेड नोट रिफाइनमेंट यांसारख्या एआय प्रॉडक्टिव्हिटी टूल्सवर चालणारा हा टॅबलेट 12,200mAh स्लिम टायटन बॅटरी सोबत येतो. ही बॅटरी 6.6mm अल्ट्रा-स्लिम, लाइटवेट डिझाइनमध्ये बसवण्यात आली आहे, ज्यामुळे पोर्टेबिलिटी सोपी होते. A4 रेशो असलेला इमर्सिव्ह 2.8K बुक-व्ह्यू डिस्प्ले, लो-ब्लू-लाईट सर्टिफिकेशन आणि अल्ट्रा-क्लिअर व्हिज्युअल्समुळे जास्त वेळ वाचन, ब्राउझिंग आणि अभ्यासाचे सेशन्स आरामदायी होतात. या सर्वांमुळे रियलमी पॅड 3 हा मॉडर्न लर्नर्ससाठी एक आदर्श साथीदार ठरतो.
किंमत आणि उपलब्धता
रियलमी 16 प्रो+ आणि रियलमी 16 प्रो यांचा समावेश असलेली रियलमी 16 प्रो सिरीज ही realme.com, Flipkart आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असेल. रियलमी 16 प्रो+ची सुरुवातीची किंमत ₹39,999 आहे, तर रियलमी 16 प्रोची किंमत ₹31,999पासून सुरू होते आणि ते वेगवेगळ्या रॅम व स्टोरेज कॉन्फिगरेशन्समध्ये उपलब्ध आहे. ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेल्सवर आकर्षक लाँच ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात, ज्यांमध्ये बँक बेनिफिट्स, नो-कॉस्ट इएमआय ऑप्शन्स, एक्सचेंज बोनस आणि विद्यमान रियलमी युजर्ससाठी स्पेशल रिवॉर्ड्स यांचा समावेश आहे.
रियलमी 16 प्रो सिरीज सोबतच रियलमी बड्स एयर8 हे ₹3,799च्या किमतीत उपलब्ध होतील. हे इअरबड्स Flipkart, Amazon, realme.com आणि ऑफलाइन चॅनेल्सवर उपलब्ध असतील.
रियलमी पॅड 3 हा वापरकर्त्याच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध होईल आणि त्याची किंमत ₹26,999 आहे. ग्राहक बँक डिस्काउंट्स, नो-कॉस्ट EMI ऑप्शन्स, आणि निवडक प्लॅटफॉर्मवर बंडल ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. रियलमी पॅड 3 हा Flipkart, realme.com आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असेल.
याशिवाय, रियलमी स्मार्ट पेन ₹2,999च्या किमतीत उपलब्ध होईल, जो रियलमी पॅड 3 सोबत वापरल्यास सीमलेस नोट-टेकिंग आणि प्रॉडक्टिव्हिटीचा अनुभव प्रदान करतो.

किमतीचे तपशील खाली दिले आहेत :
रियलमी 16 प्रो सिरीज
प्रॉडक्ट प्रकार MOP ऑफलाइन ऑफर्स फ्लिपकार्ट ऑफर्स OW ऑफर्स NEP
realme 16 Pro+ 5G
8GB + 128GB ₹ 39,999 कार्ड EMIद्वारे ₹4,000पर्यंतचे बँक डिस्काऊंट (12 महिन्यांपर्यंत) किंवा पूर्ण पेमेंटवर ₹2,000चे डिस्काउंट
भेटवस्तू : बॅग + 1-वर्ष विस्तारीत वॉरंटी ₹4,000 BO or ₹6,000 BUP
9 I 0
विद्यमान रियलमी वापरकर्त्यांना ₹1,000चा अतिरिक्त फायदा ₹4,000 CCEMI किंवा 2000 BO + 2000 BUP
12 | 0
भेटवस्तू: रियलमी बड्स T200
विद्यमान रियलमी वापरकर्त्यांना ₹1,500चा अतिरिक्त फायदा
₹99 ब्लाइंड प्री-ऑर्डर ऑफर : S2 वॉच वाउचरवर 50% सूट + 1-वर्षाची विस्तारीत वॉरंटी ₹ 35,999
8GB + 256GB ₹ 41,999 ₹ 37,999
12GB + 256GB ₹ 44,999 ₹ 40,999
realme 16 Pro 5G
8GB + 128GB ₹ 31,999 CC EMI द्वारे ₹3,000 पर्यंत बँक डिस्काउंट (up to 10|0) किंवा फुल स्वाइपवर ₹1,500 त्वरित डिस्काउंट
भेटवस्तू : बॅग + 1-वर्ष विस्तारीत वॉरंटी ₹3,000 बँक ऑफर किंवा ₹5,000 एक्सचेंज बोनस (6|0)
विद्यमान रियलमी वापरकर्त्यांना ₹1,000चा अतिरिक्त फायदा ₹3,000 पर्यंत CC EMI किंवा ₹1,500 बँक ऑफर + ₹2,000 एक्सचेंज बोनस (9|0)
भेटवस्तू: रियलमी बड्स T200
विद्यमान रियलमी वापरकर्त्यांना ₹1,500चा अतिरिक्त फायदा
₹99 ब्लाइंड प्री-ऑर्डर ऑफर : S2 वॉच वाउचरवर 50% सूट + 1-वर्षाची विस्तारीत वॉरंटी ₹ 28,999
8GB + 256GB ₹ 33,999 ₹ 30,999
12GB + 256GB ₹ 36,999 ₹ 33,999
Flipkart, realme.com आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध
realme Buds Air8
प्रॉडक्ट MOP ऑफर्स NEP
realme Buds Air8
₹ 3,799 ₹ 200 discount ₹ 3,599
Flipkart, Amazon, realme.com आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध
realme Pad 3
प्रॉडक्ट प्रकार MOP ऑफर्स NEP
realme Pad 3
8 GB + 128 GB WIFI ₹ 26,999 बँक / UPI पेमेंटद्वारे ₹2,000 पर्यंत बँक डिस्काउंट + 6पर्यंतचे नो-कॉस्ट EMI ₹ 24,999
8 GB + 128 GB 5G ₹ 29,999 ₹ 27,999
8 GB + 256 GB 5G ₹ 31,999 ₹ 29,999
Flipkart, realme.com आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध.
https://newshindindia.com/news/12519/



