जावा येझ्दी मोटरसायकल्सची सर्वाधिक विक्री होणारी येझ्दी एडव्हेंचर आणि रोडस्टर आता अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर उपलब्ध
जावा येझ्दी मोटरसायकल्स येझ्दी एडव्हेंचर आणि रोडस्टर आता अमेझॉन, फ्लिपकार्ट वर

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 06/01/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) : जावा येझ्दी मोटरसायकल्सने यंदाच्या वर्षातील आपल्या दमदार नव्या लॉन्चेस—2025 येझ्दी अॅडव्हेंचर आणि 2025 येझ्दी रोडस्टर, आता अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत केवळ शोरूममध्येच उपलब्ध असलेल्या आणि मागील वर्षाच्या तुलनेत सणासुदीच्या काळात विक्रीचे विक्रम नोंदवलेल्या येझ्दीच्या या सर्वाधिक लोकप्रिय मोटरसायकल्स आता अवघ्या एका क्लिकवर खरेदीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सणासुदीच्या हंगामातील जोरदार मागणीनंतर, येझ्दीच्या या नव्या मॉडेल्सना देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये अधिक सुलभ उपलब्धता मिळणार आहे. यामुळे क्लासिक मोटरसायकलिंगवर प्रेम करणाऱ्या रायडर्सशी ब्रँडचे नाते अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व नवी मॉडेल्स ऑनलाइन उपलब्ध झाल्याने, गेल्या वर्षी झालेल्या यशस्वी ऑनलाइन पदार्पणाचा फायदा घेत कंपनी आपली डिजिटल वितरण क्षमता अधिक मजबूत करत आहे. फ्लिपकार्ट वर प्रीमियम क्लासिक मोटरसायकल्स सूचीबद्ध करणारी जावा येझ्दी मोटरसायकल्स ही पहिली कंपनी ठरली होती, त्यानंतर अमेझॉन वरही ही सुविधा सुरू करण्यात आली. जावा येझ्दी मोटरसायकल्सची ऑनलाइन विक्री ही ब्रँडच्या वितरण नेटवर्कवर आधारित असून, हे नेटवर्क यंदा त्यांच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये सातत्याने विस्तारले आहे. आता रायडर्सना रोजच्या ब्राउझिंगसारख्या सोप्या पद्धतीने माहिती पाहण्यापासून थेट बुकिंगपर्यंतचा प्रवास करता येणार असून, खऱ्या रस्त्यांवर उत्तम कामगिरी देण्यासाठी तयार केलेल्या मोटरसायकल्स थेट घरी आणता येणार आहेत.
जावा येझ्दी मोटरसायकल्सचे सह–संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “आमच्या सर्वाधिक आवडल्या जाणाऱ्या दोन येझ्दी बाइक्स अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर उपलब्ध करून दिल्यामुळे देशभरातील रायडर्सना क्लासिक मोटरसायकलिंगचा थरार अधिक सहज अनुभवता येणार आहे. 2025 अॅडव्हेंचर आणि रोडस्टरला आमच्या शोरूममध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंपरा आणि आधुनिक अभियांत्रिकी यांचा सुरेख समतोल साधणाऱ्या परफॉर्मन्स क्लासिक्सबद्दल रायडिंग कम्युनिटीचे प्रेम किती खोल आहे, याची ही प्रेरणादायी आणि नम्र आठवण ठरली आहे. ऑनलाइन रिटेलच्या माध्यमातून आम्ही खरेदीपूर्व प्रक्रिया सोपी करत आहोत, जेणेकरून आमची डीलरशिप्स रायडरला त्याच्या मशीनशी सर्वात सोयीस्कर पद्धतीने जोडू शकतील.”
ऑनलाइन खरेदी कशी केली जाते:
- अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर एक्स–शोरूम बुकिंग रक्कम भरा.
- अधिकृत स्थानिक डीलर ऑर्डरची पुष्टी करून उर्वरित ऑन–रोड पेमेंटसाठी ग्राहकाला मार्गदर्शन करतो.
- डीलरशिपवर नोंदणी आणि विम्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वाहनाची अंतिम डिलिव्हरी दिली जाते.
अॅक्सेसरीज आणि अॅड–ऑन्सची खरेदी डीलरशिपवरच केली जाईल.
रायडर्सना संबंधित ई–कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खास ऑफर्सचाही लाभ घेता येणार आहे :
- अमेझॉन वर 6500 रुपयांपर्यंत क्रेडिट कार्ड कॅशबॅक, अमेझॉन पे आयसीआयसीआय को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर अमेझॉन प्राईम ग्राहकांसाठी 5% कॅशबॅक, तसेच 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय ची सुविधा उपलब्ध आहे.
- फ्लिपकार्ट वर 10000 रुपयांपर्यंत बँक ऑफर आणि 4000 रुपयांपर्यंत क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफरचा लाभ घेता येईल.
ऑनलाइन उपलब्ध मॉडेल्स :
येझ्दी रेंजमधील 2025 येझ्दी अॅडव्हेंचर आणि 2025 येझ्दी रोडस्टर यांच्यासह, जावाचा संपूर्ण पोर्टफोलिओ, जावा 350, 42, 42 एफजे, 42 बॉबर आणि पेराक, आता अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात आला आहे.
ही सेवा सध्या खालील शहरांमध्ये सुरू आहे :
ब्रँडचे ई-कॉमर्स नेटवर्क सध्या 44 शहरांमध्ये कार्यरत असून 55 अधिकृत डीलर्स या उपक्रमात सहभागी आहेत.
दक्षिण भारतात: कर्नाटकातील बेंगळुरू, बेळगाव आणि गुलबर्गा (कलबुर्गी); तामिळनाडूमधील मदुराई; तेलंगणामधील हैदराबाद, संगारेड्डी, महबूबनगर, करीमनगर आणि निजामाबाद; आंध्र प्रदेशातील जयपूर आणि विशाखापट्टणम.
उत्तर भारतात: नवी दिल्लीसह राजस्थानमधील जयपूर, जोधपूर, सीकर, बिकानेर आणि उदयपूर; उत्तर प्रदेशातील सहारनपूर, शामली, आझमगढ, अलीगढ, मथुरा, कानपूर, झांसी आणि बलिया; हरियाणातील रेवाडी आणि अंबाला; पंजाबमधील बठिंडा; जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर; तसेच उत्तराखंडमधील डेहराडून.
पूर्व भारतात: पश्चिम बंगालमधील दुर्गापूर आणि मालदा; ओडिशातील अंगुल, बालुगाव आणि भुवनेश्वर; छत्तीसगडमधील रायपूर; झारखंडमधील जमशेदपूर; बिहारमधील समस्तीपूर; आणि मणिपूरमधील इंफाळ.
पश्चिम भारतात: महाराष्ट्रातील पुणे तसेच गुजरातमधील राजकोट आणि जामनगर.
जावा येझ्दी ओनरशिप एश्युरन्स प्रोग्राम :
- सर्व जावा आणि येझ्दी मोटरसायकल्सना सर्वसमावेशक ‘जावा येझ्दी बीएसए ओनरशिप एश्युरन्स प्रोग्राम’ अंतर्गत संरक्षण दिले जाते. हा या सेगमेंटमधील उद्योगातील पहिलाच उपक्रम आहे.
- 4 वर्षे / 50,000 किमी स्टँडर्ड वॉरंटी: या प्रोग्रामअंतर्गत सेगमेंटमध्ये आघाडीचे संरक्षण मिळते. आमच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे हे प्रतीक असून, मोटरसायकल्स दीर्घकाळ टिकण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, याचा रायडर्सना पूर्ण विश्वास आणि मनःशांती मिळते.
- सहा वर्षांपर्यंत वाढीव वॉरंटीचे पर्याय: प्रीमियम कव्हरेजमुळे मोटरसायकल कायम रस्त्यासाठी तयार राहील याचा आत्मविश्वास मिळतो आणि अचानक येणाऱ्या दुरुस्ती खर्चाची चिंता दूर होते.
- दोन वर्षांची ‘एनीटाइम’ वॉरंटी (मालकीच्या सहा वर्षांच्या आत): गरज भासल्यावर, स्टँडर्ड वॉरंटी संपल्यानंतरही जोडता येणारा लवचिक पर्याय. त्यामुळे ग्राहक कधीही वॉरंटीशिवाय राहणार नाहीत.
- एक वर्षाची मोफत रोडसाइड असिस्टन्स (आरएसए): ही सुविधा आठ वर्षांपर्यंत वाढवता येते. गरज असेल तेव्हा आणि जिथे गरज असेल तिथे मदत मिळेल, अगदी दुर्गम भागातही रायडर्स अडकणार नाहीत, याची खात्री देते.
- पाच वर्षांचा सर्वसमावेशक एएमसी पॅकेज: ठरावीक खर्चात त्रासमुक्त सर्व्हिसिंग, अनपेक्षित खर्च टाळून मालकीचा अनुभव अधिक सोपा आणि सुखद बनवतो.




