टेक्नोलॉजी

CES 2026 मध्ये AI ऍक्शन मोडमध्ये: तुमच्याशी सुसंवाद साधणारी नवकल्पकता

CES 2026 मध्ये AI ऍक्शन मोडमध्ये: तुमच्याशी सुसंवाद साधणारी नवकल्पकता

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 15/01/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M): CES® 2026 मध्ये, LG इलेक्ट्रॉनिक्सने AI ला केवळ चर्चेपुरतेच मर्यादित ठेवले नाही तर – ते रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले तर कसे असेल हे सुद्धा दाखवले आहे.
‘तुमच्याशी सुसंवाद साधणारी नवकल्पकता’ या संकल्पनेच्या अंतर्गत आमचे प्रदर्शन घर, प्रवास आणि मनोरंजन यांना जोडणाऱ्या सुसंवादी अनुभवांच्या मालिकेत रूपांतरित झाले. या सर्व अनुभवांनी मिळून आमची ‘अफेक्शनेट इंटिलिजन्स’ प्रसंग ओळखते, संदर्भ जाणते आणि सहजतेने, आपुलकीने प्रतिसाद देते, हे स्पष्टपणे दाखवून दिले.”

AI ला केवळ उपकरणांच्या चौकटीत बंदिस्त न ठेवता, तो विविध जागांमधून कसा सहजतेने प्रवास करतो यावर आम्ही भर दिला. स्वयंपाकघर, लिवींग रूम, वाहने आणि मनोरंजनाचे सेटअप्स—हे सर्व एकाच परस्पर जोडलेल्या अनुभवाचा भाग बनले आहेत. या अनुभवात टीव्ही, घरगुती उपकरणे, रोबोट्स, सॉफ्टवेअर आणि सेन्सर्स पडद्यामागे शांतपणे एकत्र काम करत होते. हेच प्रदर्शनस्थळी प्रत्यक्ष साकार झालेले—AI ऍक्शनमोडमध्ये होते.

दृश्यांची प्रस्तावना – आणि एका आयकॉनचे पुनरागमन
तो प्रवास त्या क्षणापासून सुरू झाला जेव्हा अतिथींनी प्रवेश केला.
इन ट्युन मोन्युमेंट हा 38 LG OLED evo W6 या ट्रू वायरलेस वॉलपेपर टिव्हीपासून बनलेला आहे, जे अशाप्रकारे मांडले गेले की, ते हवेत तरंगत असल्यासारखे दिसत होते आणि एकसंध दृश्य कॅनव्हास तयार करत होते. फक्त 9 मिलीमीटर-क्लास थिनमध्ये असलेला हा डिस्प्ले आमच्या 2017 मधील आयकॉनिक वॉलपेपर टिव्ही डिझाइनला नवजीवन देतो – आता ट्रू वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि हायपर रेडिएंट कलर टेक्नॉलॉजी या आमच्या सर्वात प्रगत चित्र तंत्रज्ञान आहेत.”

हे डिझाइन नव्हते, तर LG च्या सौंदर्यदृष्टी, अभियांत्रिकी कौशल्य आणि बुद्धिमत्तेचा संगम व्यक्त करणारे प्रतीक होते.

सुसंगत दृश्य अनुभव
व्हिविंग इन ट्युन झोनमध्ये ही कल्पना पुढे सुरू राहिली. वॉलपेपर टिव्ही थेट भिंतींमध्ये मिसळलेले दिसत होते आणि नवीन α (अल्फा) 11 AI प्रोसेसर जेन3 द्वारे समर्थित होते, सखोलता आणि वास्तवता यांसह रिफ्लेक्शन-फ्री इमेज देत होते – जणू स्क्रीन पाहत नसून प्रत्यक्ष खिडकीमधूनच बाहेर दृश्य बघत आहोत असे वाटायचे.

प्रोजेक्शन मॅपिंगने दृश्यांचा अनुभव डिस्प्लेच्या पलीकडे वाढवला, तर एक खेळकर गोल्डबर्ग-शैलीतील इंस्टॉलेशनमुळे webOS व्यक्तीच्या पाहण्याच्या सवयींनुसार कसा जुळतो – ज्यामुळे टिव्ही खरोखरच वैयक्तिक बनतो हे लक्षात येते.

प्रतिसादात्मक मार्ग
राईड इन ट्युन झोनमध्ये कारला एक बुद्धिमान आणि प्रतिसाद देणारा गतिशील साथीदार म्हणून पुन्हा मांडले गेले.
AI-शक्तीच्या विंडशील्डने वास्तव जगावर जादू केली – बोगदे जणू स्वप्नाळू जंगलांमध्ये बदलले, खुले रस्ते चेरीच्या फुलझडीत न्हाल्यासारखे झाले. केबिनमधील कॅमेरे आणि व्हिजन सोल्यूशन्स ड्रायव्हरच्या थकव्यावर लक्ष ठेवत, आवश्यकतेनुसार सहजपणे ऑटोनॉमस ड्रायव्हिंगवर स्विच करत होते. पारदर्शक रिअर-व्हिंडो डिस्प्ले प्रवाशांना बाहेरील जगाशी सतत जोडून ठेवत, प्रत्येक प्रवासाला एक जिवंत आणि वैयक्तिक अनुभव बनवत होता.

हे सर्व मिळून दाखवते की जेव्हा AI रस्ता आणि प्रवाश्यांच्या गरजा समजते, तेव्हा प्रवास शांत, सुरक्षित आणि सहजतेने अनुभवता येतो.

अखंड अनुभवाच्या जगात
एंटरटेंटमेंट इन ट्युन मध्ये अतिथी खेळ, संगीत आणि कथाकथनासाठी तयार केलेल्या मल्टी-सेंसरी अनुभवांत पाऊल ठेवतात.
एल्डन रिंगच्या प्रेरणेने सजलेली ही जागा, रेडिट समुदायाच्या सहकार्याने तयार केलेली, खेळाडूंना स्क्रीनच्या पलीकडे जाणारे दृश्य आणि आवाज अनुभवायला देते. जवळच, रेसिंग चाहत्यांनी तीन वक्री आकाराच्या अल्ट्रागियर™ OLED मॉनिटर्समधून बनवलेल्या पॅनोरॅमिक कॉकपिटमध्ये स्वतःला हरवून अनुभव घेतला.

xBoom स्टुडियो मधील साउंडने सर्व अनुभवांना एकत्र केले – जिथे मल्टी-प्लॅटिनम संगीतकार व तंत्रज्ञान उद्योजक विलियम (will.i.am) रोज लाइव्ह ब्रॉडकास्ट करत होता. इतर वेळेस अतिथी AI डीजे पर्सोनाज आणि खास तयार केलेले म्युझिक स्ट्रीम एक्सप्लोर करून मनोरंजनाला जिवंत आणि संवादात्मक अनुभव बनवत होते

होम रोबोट्स: श्रम विरहित घराच्या दिशेने
लिवींग इन ट्युनमध्ये आम्ही श्रम विरहीत घराची झलक दाखवली – जिथे घरकाम स्वतःच मागे सरकते आणि जीवन अधिक सहज होते.
केंद्रस्थानी LG CLOiD™ होता – AI-शक्तीवर चालणारा घरासाठीचा खास रोबोट – ज्याने स्वयंपाकघर आणि लिवींग रूममध्ये दोन हात आणि हवी तशी मोबिलिटी देऊन काम केले आणि विविध जीवनशैलींचे म्हणजेच न्याहारी, घरकाम किंवा वातावरणीय काळजी घेण्याऱ्या कामांचे सहाय्य केले.

LG ThinQ™ प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या CLOiD ने दाखवून दिले की उपकरणे, सेन्सर्स आणि AI सर्व्हिस एकत्र येऊन घरातली कामे सुरळीत चालवतात, समस्या टळतात आणि गरजा आधीच ओळखतात – ते सुद्धा सर्व काही व्हॉइस कमांड शिवाय

निपुण डिझाइन, प्रगल्भ बुद्धिमत्ता
मास्टरी इन ट्युन झोनने LG सिग्नेचरचा 10 वा वर्धापनदिन साजरा केला, जिथे जिवंत जागा निपुण डिझाइन आणि प्रगत बुद्धिमत्ता एकत्र येतांना सादर करत होत्या.
त्याच्या केंद्रस्थानी उभा होता पारदर्शक LG सिग्नेचर OLED T, जो सहजपणे काचेसारखा दिसून जिवंत प्रदर्शनात रूपांतरित होत असे. त्याभोवती बुद्धिमान घरगुती उपाय होते – जसे की LG सिग्नेचर फ्रिज, ज्यामध्ये अन्न व्यवस्थापनासाठी कन्व्हर्सेशनल AI होता, आणि LG सिग्नेचर ओव्हन रेंज, ज्यामध्ये गॉरमेट AI आहे, जे साहित्य ओळखते आणि योग्य स्वयंपाक सेटिंग निवडते.
इटालियन लक्झरी लिव्हिंग ब्रँड पोलिफॉर्म सोबतच्या सहकार्याने, नाजूक लाकूड, धातू आणि कापड यांचा संगम झाला – अशा जागा जिथे प्रगत तंत्रज्ञान प्रीमियम फर्निचरइतकेच नैसर्गिक वाटत होते.

सर्वांसाठी विचारपूर्वक केलेले डिझाइन
यात्रेचा शेवट इन ट्युन फॉर एव्हरीवन मध्ये झाला, जो LG च्या सर्वांसाठी डिझाइन या तत्वज्ञानाला समर्पित होता.
सोप्या आणि विचारपूर्वक कल्पनांनी दाखवले की, लहान तपशीलही मोठा फरक घडवू शकतो – हाय-कॉन्स्ट्रास्ट रंगाचा शीट दृष्टिहीन वापरकर्त्यांना रोबोट व्हॅक्युम शोधायला मदत करतो, आणि वॉशरचा हँडल हाताऐवजी तळहाताने उघडता येतो. अशा अनेक कल्पना LG कंफर्ट किटमधून आल्या आहेत जो दररोजच्या उपकरणांचा अनुभव प्रत्येकासाठी सोपा करण्यासाठी तयार केलेले अ‍ॅक्सेसरी संच आहे.

ऍफेक्शनेट इंटिलिजन्स, ऍक्शनमध्ये
LG चा CES 2026 बूथ एका उत्पादन किंवा एका शोधापुरता मर्यादित नव्हता; हा त्या क्षणाबद्दल होता जेव्हा AI, उपकरणे आणि जागा एकत्र येऊन जिवंत अनुभव तयार करतात.
श्रमविरहीत घरापासून इंटिलिजन्ट वाहनांपर्यंत, OLED डिस्प्लेपासून सर्वांगीण ध्वनीपर्यंत – आम्ही दाखवून दिले की, ऍफेक्शनेट इंटिलिजन्स कशी क्षणाक्षणात समजून घेत, विचार करून, क्रिया करते – लोकांना तंत्रज्ञानाशी जुळवायला सांगण्याऐवजी, तंत्रज्ञान स्वतः लोकांशी जुळते.

याचं स्वरूप CES 2026 मध्ये इनोवेशन इन ट्युन वुइथ यू असं दिसलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!