ब्रुकफील्ड प्रॉपर्टीज पवई रन 2026 मध्ये आरोग्य, समुदाय व महिला सक्षमीकरणाला भरघोस पाठबळ
ब्रुकफील्ड प्रॉपर्टीज पवई रन 2026
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 13/01/2026 📞 8850212023

जवळ-जवळ 11,000 जणांच्या सहभागातून पवई रनने सामुदायिक सहभाग असलेला प्रमुख फिटनेस उपक्रम म्हणून आपले स्थान पुन्हा एकदा प्रस्थापित केले
मुंबई NHI24.COM(M): उच्च दर्जाच्या रिअल इस्टेट मालमत्तांची जागतिक स्तरावरील विकासक व ऑपरेटर कंपनी ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजने रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या सहयोगाने 11 जानेवारी 2026 रोजी पवई रन उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. उपक्रमाच्या या 14व्या पर्वामध्ये (आणि ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजद्वारे प्रायोजित 5व्या पर्वामध्ये) परिसरातील लोक, व्यावसायिक, कर्मचारी आणि धोरणात्मक भागीदार यांसह जवळ-जवळ 11,000 लोक सहभागी झाले. उपक्रमातून उभारला गेलेला निधी प्राणरक्षक हृदय-शस्त्रक्रिया व कर्करोग देखभालीपासून ते बालिका शिक्षण, रुग्ण आधार व सामाजिक आरोग्य आणि स्वास्थ्य कार्यक्रमांपर्यंतच्या विविध धर्मादाय कामांकडे वळविण्यात आला.

या कार्यक्रमाला पवई डाउनटाउन येथून ब्रुकफील्ड येथील आशिया पॅसिफिक आणि मध्य पूर्व, रिअल इस्टेटचे प्रमुख, उपमुख्य गुंतवणूक अधिकारी अंकुर गुप्ता, रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या अध्यक्षा एकता मेनन, ऑस्ट्रेलियातील ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजच्या रिअल इस्टेटचे अध्यक्ष आणि सह-प्रमुख डॅनी पोलजॅक आणि भारतातील ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजच्या कार्यकारी उपाध्यक्ष, ऑपरेशन्स आणि सीआरएम प्रमुख चारू थापर यांनी हिरवा झेंडा दाखवला.
4 किमी आणि 10 किमीच्या सर्वसाधाराण गटांव्यतिरिक्त ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजने खास उच्चपदस्थांसाठी सीईओ रन व प्रतिष्ठित आयआयटी संस्थेचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग, मार्गदर्शक व माजी विद्यार्थी यांच्यासाठी आयआयटी बी रन अशा दोन खास उपक्रमांचेही यजमानपद भूषविले.
उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
• पिंक ऑटो उपक्रमाचे उद्घाटन, यावेळी ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजने रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या सहयोगाने 20 गुलाबी ऑटो-रिक्षांचे वाटप केले व कौशल्याधारित चालक प्रशिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्य देऊ करत व महिला प्रवाशांच्या सुरक्षितता व सामाजिक समावेशकतेमध्ये वाढ करत महिला सक्षमीकरणात योगदान दिले.
• पोस्ट-रन कार्निव्हलमध्ये भारताच्या महिला व्हीलचेअर बास्केटबॉल टीमच्या कर्णधार गीता चौहान यांचा सहभाग
• आपल्या असाधारण प्रवासातून सहभागींना व प्रेक्षकांनाही प्रेरणा देणारी अंध धावपटू श्री. अमरजित सिंग चावला यांची 10 किमीची 100वी धाव

चारु थापर, एक्झेक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडंट, हेड ऑफ ऑपरेशन्स अँड सीआरएम, ब्रुकफील्ड प्रॉपर्टीज इन इंडिया म्हणाले, “ आम्ही जिथे काम करतो तिथे उत्साहपूर्ण, समावेशक असे समुदाय उभारण्याप्रती आमची कटिबद्धता पवई रनमध्ये प्रतिबिंबित झाली आहे. आमच्या वास्तूंव्यतिरिक्त दीर्घकालीन भागीदारींच्या माध्यमातून व पवई रनसारख्या उपक्रमातून रहिवासी, भाडेकरू आणि स्थानिक लाभार्थी यांच्याशी अर्थपूर्ण नात्याच्या जपणूकीवर आम्ही लक्ष केंद्रित करतो. हा एक अनोखा उपक्रम आहे व खास पवईतील स्थानिक लोकांसाठीचा एक ठळक उपक्रम ही ओळख त्याने झपाट्याने मिळवली आहे, ज्याचे श्रेय रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सबरोबरच्या आमच्या दीर्घकालीन भागीदारीला जाते. या प्रयत्नांमुळे आम्ही उपलब्धतेमध्ये तसेच आपलेपणाच्या सामुदायिक भावनेमध्ये भर टाकतानाच शाश्वत सामुदायिक विकासाला चालना देऊ शकलो आहोत.”

रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या अध्यक्ष एकता मेनन पुढे म्हणाल्या, “पवई रन हा आमच्यासाठी केवळ निधीउभारणीचा प्रमुख उपक्रम नाही तर तो आम्ही वर्षभर करत असलेल्या सेवा उपक्रमांच्या केंद्रस्थानी आहे. यात सहभागी झालेल्या व्यक्तीने उचललेले पाऊल एका आयुष्य बदलणारा प्रकल्पाला बळ देते.”
ब्रुकफील्ड प्रॉपर्टीज आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सने डाऊनटाऊन पवई व त्यापलीकडील परिसरावर अर्थपूर्ण व कायमस्वरूपी ठसा उमटविण्याप्रती आपली कटिबद्धता पुन:प्रस्थापित केली आहे, व समुदायांना अधिक प्रबळ बनविणारी समावेशक जागांची जोपासना करण्याचे काम ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजकडून यापुढेही सुरू राहणार आहे.
ब्रुकफील्ड प्रॉपर्टीज पवई रन 2026 मध्ये आरोग्य, समुदाय व महिला सक्षमीकरणाला भरघोस पाठबळ




