खेल

आयडियल बुध्दिबळ स्पर्धेत रविवारी ४८ खेळाडूंमध्ये चुरस

आयडियल बुध्दिबळ स्पर्धेत रविवारी ४८ खेळाडूंमध्ये चुरस

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 03/01/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड सहप्रायोजित ७ ते १४ वर्षामधील ६ वयोगटातील शालेय मुलामुलींच्या जलद बुध्दिबळ स्पर्धेत फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह ४८ खेळाडूंमध्ये ४ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वा.पासून चुरस राहील. आयडियल ग्रुप व आरएमएमएस सहकार्यीत ७/८/१०/११/१३/१४ वर्षे वयोगटातील बुध्दिबळ स्पर्धेचे उद्घाटन आयडियल अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, फिडे इंस्ट्रक्टर राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहामध्ये होणार आहे.

मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेमधील विविध वयोगटातील विजेतेपदाच्या दावेदारीसाठी आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटू आयांश पाटील, राज गायकवाड, विग्नेश शर्मा, मायरा राकेश, सर्वेश पंधर, वेदांश शिंदे, स्तोत्र सावंत, स्वरा प्राश, धीयांश शाह, आयांश पाटील, वेदांत मगरे, मेधांश बांगर, शौर्य गौर, स्मित लोके, अवनीश पाटील, अर्णव जगताप आदी खेळाडूंमध्ये अटीतटीच्या लढती होतील. स्विस लीग पध्दतीची प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहणार आहे. दोन वयोगटात विजेता ठरणाऱ्या सबज्युनियर बुध्दिबळपटूस इंडियन ऑईल व आयडियल अकॅडमीतर्फे विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!