आदित्य आय क्लिनिकच्या नव्या शाखेचे कांदिवलीत भव्य उद्घाटन
आदित्य आय क्लिनिकच्या नव्या शाखेचे कांदिवलीत भव्य उद्घाटन

POSTED BY ANAGHA SAKPAL ON DATED 26/01/2026(9094379846)
https://youtu.be/0Bq1KO-iZIE?feature=shared
*मुंबई, (NHI@24.COM): –* दर्जेदार, करुणामय आणि समर्पित नेत्रसेवेची परंपरा जपणाऱ्या आदित्य आय क्लिनिकच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन कांदिवली (पश्चिम) येथे उत्साहात पार पडले. उद्घाटनापूर्वी क्लिनिकमधील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व सेवा यांची माहिती माध्यमांना देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
पत्रकार परिषदेत *आदित्य आय क्लिनिकचे संस्थापक व संचालक डॉ. जिगर मनियार* यांनी क्लिनिकच्या प्रवासाचा आढावा घेतला. २००४ मध्ये स्थापन झालेल्या या क्लिनिकने नेत्ररोग उपचार क्षेत्रात विश्वासार्ह ओळख निर्माण केली असून आतापर्यंत मोतीबिंदू शस्त्रक्रिया (विविध लेन्स प्रत्यारोपणासह), डोळ्यांच्या वाकडेपणाच्या शस्त्रक्रिया, रिफ्रॅक्टिव्ह उपचार आदी ५० हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. देश-विदेशातील दोन लाखांहून अधिक रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत. महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठीही क्लिनिकतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
डॉ. जिगर मनियार यांना १०० वर्षांच्या सर्वांत ज्येष्ठ रुग्णावर लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्याबद्दल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. तसेच एका तासात नोंदणीपासून तपासणी व निदानापर्यंत ३०० हून अधिक बालकांची तपासणी केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डशीही क्लिनिक संलग्न आहे. रुग्णांचे समाधान आणि त्यांचा विश्वास हेच आमचे खरे अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
*या प्रसंगी बोलताना डॉ. मनियार म्हणाले,* “नवजात बालकांपासून १०० वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांनी गेल्या २० वर्षांत त्यांच्या दृष्टीची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. ही मोठी सुविधा केवळ तंत्रज्ञानातील उन्नती नाही, तर समाज वाढत असताना सर्वांना सुलभ आणि जागतिक दर्जाची नेत्रसेवा देण्याची माझी वचनबद्धताही अधिक बळकट होईल. दृष्टी ही अमूल्य देणगी आहे; जनजागृती आणि प्रगत उपचारांच्या माध्यमातून आपण ती जपली पाहिजे.”
नव्या शाखेत फेकोइमल्सिफिकेशन व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना उपचार, चष्मा काढण्यासाठी एक्सायमर लेझर प्रक्रिया, काचबिंदू उपचार, डोळ्यांच्या वाकडेपणाची शस्त्रक्रिया, बाल नेत्रसेवा तसेच बोटॉक्स व फिलर्ससारख्या ऑक्युलर एस्थेटिक उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. अत्याधुनिक तपासणी यंत्रणा आणि अनुभवी नेत्रतज्ज्ञांची टीम येथे कार्यरत आहे. रेटिना आजारांच्या उपचारासाठी नवीन यंत्रसामग्री व लेझर्ससह रेटिना सुविधा अधिक सक्षम करण्यात आली असून, अतिशय पात्र रेटिना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आरओपी (रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी) उपचारही सुरू करण्यात आले आहेत.
उद्घाटन सोहळा २१ बिझनेस एलिट्स, पहिला मजला, काळा हनुमान मंदिराजवळ, एम. जी. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे झाला. हा कार्यक्रम हेमंत–अंजली मनियार आणि नरेंद्र–मनीषा मेहता यांच्या आशीर्वादाने संपन्न झाला. यावेळी डॉ. प्रिया मनियार, डॉ. राहुल मेहता, डॉ. यश परमार, डॉ. अंकिता भांगुई, डॉ. अरुण सिंहवी, डॉ. विकास जैन, डॉ. हिमांशू शेखर आणि डॉ. सौमिल शेठ यांसह अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.
नव्या शाखेमुळे कांदिवली आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रगत नेत्रसेवा उपलब्ध होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


