श्री उद्यानगणेश मंदिर शालेय कबड्डी स्पर्धा १५ डिसेंबरपासून
श्री उद्यानगणेश मंदिर शालेय कबड्डी स्पर्धा १५ डिसेंबरपासून
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 04/12/2025 📞 9004379946
मुंबई,( NHI@24.COM) : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई, ठाणे आदी परिसरातील १७ वर्षे व ५५ किलो वजनाखालील इयत्ता दहावीपर्यंत मुलामुलींच्या शालेय संघांची श्री उद्यानगणेश मंदिर कबड्डी स्पर्धा १५ व १६ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही शालेय कबड्डी स्पर्धा विनाशुल्क प्रवेशाची असून प्रथम येणाऱ्या शालेय मुलांच्या ३२ संघांना आणि शालेय मुलींच्या १६ कबड्डी संघांना प्रवेश दिला जाणार आहे. सहभागी संघांतील सर्व खेळाडूंना विनामूल्य कबड्डी टी शर्टस व अल्पोपहार दिला जाईल.
श्री उद्यानगणेश शालेय कबड्डी स्पर्धेच्या मुले व मुली विभागातील अंतिम विजेत्यास रोख रु.५,०००/-, अंतिम उपविजेत्यास रोख रु.३,०००/- व तृतीय क्रमांकास रोख रु.१,०००/- पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम कबड्डीपटू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी वैयक्तिक पुरस्कार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या अथवा मुलींच्या शालेय कबड्डी संघांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी समितीचे क्रीडा समिती निमंत्रक प्रकाश परब अथवा व्यवस्थापक संजय आईर (८६५५२३३७७८), श्री उद्यानगणेश मंदिर कार्यालय (०२२-२४४६६६३४), स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर-पश्चिम, मुंबई-२८ येथे ८ डिसेंबरपर्यंत संपर्क साधावा.



