श्याम धनी इंडस्ट्रीज लिमिटेडचा आयपीओ २२ डिसेंबर २०२५ रोजी खुला
श्याम धनी इंडस्ट्रीज लिमिटेडचा आयपीओ २२ डिसेंबर २०२५ रोजी खुला

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 18/12/2025 📞 9004379946
-
एकूण इश्यू आकार – ₹10 दर्शनी मूल्याच्या जास्तीत जास्त 54,98,000 इक्विटी शेअर्स ●आयपीओ आकार – ₹38.49 कोटी (वरच्या किंमत पट्ट्यानुसार)● किंमत पट्टा – प्रति शेअर ₹65 ते ₹70● लॉट आकार – 2,000 इक्विटी शेअर्स
मुंबई,( NHI@24.COM) :, – श्याम धनी इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी – श्याम) ही ‘श्याम’ या ब्रँडखाली विविध प्रकारच्या मसाल्यांचे उत्पादन व प्रक्रिया करणारी प्रमुख कंपनी असून, कंपनीने सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी आपला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) उघडण्याचे योजले आहे. या आयपीओद्वारे (वरच्या किंमत पट्ट्यानुसार) ₹ ३८.४९ कोटी उभारण्याचे उद्दिष्ट असून, कंपनीचे समभाग एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत.
या इश्यूअंतर्गत प्रत्येकी ₹ १० दर्शनी मूल्य असलेल्या एकूण ५४,९८,००० इक्विटी समभागांचा समावेश असून, प्रति समभाग किंमत पट्टा ₹ ६५ ते ₹ ७० असा निश्चित करण्यात आला आहे.
इक्विटी शेअर वाटप
- अँकर गुंतवणूकदारांसाठी हिस्सा – जास्तीत जास्त 15,60,000 इक्विटी शेअर्स
• पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) – जास्तीत जास्त 10,44,000 इक्विटी शेअर्स
• असंस्थात्मक गुंतवणूकदार (NII) – किमान 7,86,000 इक्विटी शेअर्स
• खुद्दरा वैयक्तिक गुंतवणूकदार (RII) – किमान 18,28,000 इक्विटी शेअर्स
• मार्केट मेकर – जास्तीत जास्त 2,80,000 इक्विटी शेअर्स
आयपीओमधून मिळणारा निव्वळ निधी वाढीव कार्यभांडवलाच्या गरजा भागविणे, काही विद्यमान कर्जांची परतफेड/पूर्वपरतफेड, ब्रँड निर्मिती व विपणन खर्च, विद्यमान उत्पादन युनिटमध्ये बसविण्यात येणाऱ्या नवीन अतिरिक्त यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी भांडवली खर्च, विद्यमान उत्पादन युनिटमध्ये सोलार रूफटॉप प्लांटची खरेदी व बसविणे तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्यात येणार आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा शुक्रवार, 19 डिसेंबर 2025 रोजी खुला होईल. आयपीओ सोमवार, 22 डिसेंबर 2025 रोजी सुरू होऊन बुधवार, 24 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.
या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर होलानी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड असून, इश्यूचे रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत.
श्याम धनी इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. रामावतार अग्रवाल यांनी सांगितले,
“आमच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा शुभारंभ हा श्याम धनी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विकास प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षांत आमची कंपनी विविधीकृत अन्न प्रक्रिया क्षेत्रात एक मजबूत ओळख निर्माण करत ‘श्याम’ या आमच्या प्रमुख ब्रँडअंतर्गत विविध प्रकारचे मसाले तसेच भारताच्या बदलत्या पाककृतींच्या आवडी लक्षात घेऊन किराणा माल, औषधी वनस्पती व मसाल्यांची विस्तृत श्रेणी पुरवत आहे.
हा आयपीओ आमच्या क्षमतांना अधिक बळकटी देण्यासाठी आणि विस्ताराच्या पुढील टप्प्याला गती देण्यासाठी धोरणात्मक भांडवल उपलब्ध करून देईल. या निधीचा उपयोग कार्यभांडवल वृद्धिंगत करणे, ब्रँडची दृश्यमानता वाढविणे, विद्यमान उत्पादन युनिटमधील यंत्रसामग्री अद्ययावत करणे तसेच सोलार रूफटॉप प्रणालीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला जाईल. या उपक्रमांमुळे कार्यक्षमता वाढेल, उत्पादन क्षमता विस्तारेल आणि भारत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करताना शाश्वत मूल्यनिर्मितीस पाठबळ मिळेल.”
होलानी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री. अशोक होलानी म्हणाले, “श्याम धनी इंडस्ट्रीज लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग हा अशा कंपनीसाठी एक महत्त्वाचा वळणबिंदू आहे जिने भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अन्न प्रक्रिया क्षेत्रात सातत्याने भक्कम उपस्थिती निर्माण केली आहे. मजबूत उत्पादन पोर्टफोलिओ आणि वाढती किराणा माल, औषधी वनस्पती व मसाल्यांची श्रेणी लक्षात घेता, ग्राहकांच्या बदलत्या पसंतीचा आणि विश्वासार्ह देशी ब्रँड्ससाठी वाढत्या मागणीचा लाभ घेण्यासाठी कंपनी उत्तम स्थितीत आहे.
हा आयपीओ कंपनीला कार्यक्षमतेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी आणि शाश्वत विस्ताराच्या पुढील टप्प्यास चालना देण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देईल. कार्यभांडवल, ब्रँड उभारणी, उत्पादन अद्ययावतता आणि नवीकरणीय ऊर्जा उपक्रमांसाठी प्रस्तावित गुंतवणूक ही प्रमाणवृद्धी, कार्यक्षमता आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर स्पष्ट लक्ष केंद्रित करते. हा सार्वजनिक इश्यू कंपनीची बाजारातील स्थिती अधिक मजबूत करेल आणि भारत तसेच उदयोन्मुख जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याच्या महत्त्वाकांक्षेला पाठबळ देईल, असा आमचा विश्वास आहे.”
श्यम धनी इंडस्ट्रीज लिमिटेडविषयी माहिती:
श्यम धनी इंडस्ट्रीज लिमिटेडने अन्न प्रक्रिया क्षेत्रात एक विविधांगी कंपनी म्हणून स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. कंपनी प्रामुख्याने “SHYAM” या ब्रँड अंतर्गत 160 हून अधिक प्रकारच्या मसाल्यांचे उत्पादन व प्रक्रिया करते. मसाल्यांव्यतिरिक्त, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आवश्यक किराणा मालाचा व्यापार तसेच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व मसालेदार पदार्थांचा समावेश असून, बदलत्या पाककला प्रवाहांना ती प्रभावीपणे पूरक ठरते.
कार्यक्षमतेच्या दृष्टीने, कंपनीला उभ्या एकात्मिक (व्हर्टिकल इंटिग्रेटेड) पुरवठा साखळीचा लाभ मिळतो. कच्चा माल भारतभरातील मंड्यांमधून थेट खरेदी करून तो जयपूर जिल्ह्यातील चोमू, जटावली येथील कंपनीच्या समर्पित प्रकल्पात प्रक्रिया केला जातो. या प्रकल्पात स्वच्छता, दर्जानिर्धारण (ग्रेडिंग) आणि दळण (ग्राइंडिंग) यांसह संपूर्ण उत्पादन प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.
कंपनीने मजबूत मल्टी-चॅनल वितरण धोरण अवलंबले असून, त्याद्वारे बी2बी आणि डी2सी या दोन्ही बाजारपेठांमध्ये प्रभावी प्रवेश केला आहे. बी2बी विभागात जनरल ट्रेड, मॉडर्न ट्रेड, क्विक कॉमर्स, होरेका (HoReCa), निर्यात व्यवसाय तसेच प्रायव्हेट लेबलिंग सेवा यांचा समावेश आहे. यासोबतच थेट ग्राहकांसाठी ऑनलाइन विक्री चॅनलही उपलब्ध आहे. 5 ग्रॅमच्या सॅशेपासून ते 25 किलोच्या बल्क पॅकपर्यंत विविध एसकेयू उपलब्ध असल्यामुळे, घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी सक्षम आहे.
आर्थिक वर्ष 2025 दरम्यान, कंपनीने ₹12,468.04 लाखांचे उत्पन्न, ₹1,452.06 लाखांचा EBITDA आणि ₹804.16 लाखांचा नफा (PAT) नोंदवला.
सप्टेंबर 2025 ला संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत, कंपनीने ₹6,377.96 लाखांचे उत्पन्न, ₹865.85 लाखांचा EBITDA आणि ₹420.03 लाखांचा नफा (PAT) साध्य केला.
अस्वीकरण –
या दस्तऐवजात नमूद केलेली काही विधाने ऐतिहासिक तथ्ये नसून ती भविष्यातील अंदाजांवर आधारित आहेत. अशा अंदाजात्मक विधानांमध्ये सरकारी धोरणे, स्थानिक, राजकीय किंवा आर्थिक घडामोडी, तांत्रिक धोके तसेच इतर अनेक घटकांमुळे प्रत्यक्ष परिणाम वेगळे ठरू शकतात. अशा विधानांच्या आधारे केलेल्या कोणत्याही कृतीसाठी कंपनी जबाबदार राहणार नाही आणि भविष्यातील घडामोडी किंवा परिस्थितीनुसार या विधानांमध्ये सार्वजनिकरित्या सुधारणा करण्याची कोणतीही जबाबदारी कंपनी स्वीकारत नाही.




