साहित्य विश्वात एका संवेदनशील आणि वास्तववादी आत्मकथनाची भर पडणार असून प्रसिद्ध लेखक व कवी धनराज खरटमल यांचे ‘खस्ता‘ हे आत्मकथन
प्रसिद्ध लेखक व कवी धनराज खरटमल यांचे ‘खस्ता‘ हे आत्मकथन

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 27/12/2025 📞 9004379946
मुंबई,( NHI@24.COM) : दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबईच्या वाशीतल्या प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालयाच्या साहित्य मंदिर सभागृहात प्रकाशित होणार आहे. या आत्मकथनातून लेखकाने आपल्या आयुष्यातील संघर्ष, अनुभव, चढ-उतार आणि जीवनाने दिलेल्या शिकवणी अत्यंत प्रांजळपणे मांडल्या आहेत.
‘खस्ता‘ हे केवळ वैयक्तिक आयुष्याचे कथन नसून, समाजातील सामान्य माणसाच्या वेदना, आशा आणि जिद्द यांचे प्रतिबिंब आहे. साध्या भाषेत, प्रभावी शैलीत लिहिलेले हे आत्मकथन वाचकांना अंतर्मुख करणारे ठरेल, असा विश्वास साहित्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने अपयशातून शिकलेले धडे, संघर्षातून घडलेली जडणघडण आणि यशाच्या दिशेने केलेला प्रवास मांडला आहे. त्यामुळे नव्या पिढीसाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे.
दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या प्रकाशन सोहळ्याकडे साहित्य क्षेत्राचे लक्ष लागले असून, वाचक आणि समिक्षकांमध्ये या आत्मकथनबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सदरचे आत्मकथन नामवंत अशा ग्रंथाली प्रकाशनातर्फे ५१व्या वाचकदिनी प्रकाशित करण्यात येत आहे.




