खेल

प्रल्हाद नलावडे शालेय कॅरम स्पर्धेत राज्यातील ४८ खेळाडूंमध्ये आज चुरस

प्रल्हाद नलावडे शालेय कॅरम स्पर्धेत राज्यातील ४८ खेळाडूंमध्ये आज चुरस

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 26/12/2025 📞  9004379946

मुंबई,( NHI@24.COM) :  आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप तर्फे आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट, अविनाश नलावडे स्पोर्ट्स व सिबीइयू यांच्या सहकार्याने २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक मोफत शालेय कॅरम स्पर्धेत राज्यातील ४८ खेळाडूंमध्ये चुरस होईल. प्रसन्न गोळे विरुध्द सार्थक घाडीगावकर आणि अर्णव गावडे विरुध्द झहीद खान यामधील उदघाटनीय लढती क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते व अविनाश नलावडे, कॅरमप्रेमी विष्णू तांडेल व प्रमोद पार्टे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत दादर पश्चिम येथील सिबीईयु सभागृहात होतील.

नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणारे स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती कॅरम विजेतेपदाच्या दावेदारीसाठी विविध जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीचे सबज्युनियर कॅरमपटू न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, पोद्दार हायस्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे, कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीचा भरत सावंत, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल-दहिसरचा तीर्थ ठाकर, महिला मंडळ स्कूल-कुर्ल्याचा विराज बर्वे, एसकेकेई स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा शिवांश मोरे व देविका जोशी, महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी, शिर्के हायस्कूल-रत्नागिरीची स्वरा मोहिरे, कनोसा हायस्कूल-कांदिवलीची वेदिका पोमेंडकर, महावीर जैन इंग्लिश स्कूल-कल्याणची संचिता मोहिते आदी शालेय कॅरमपटू सर्वांगसुंदर खेळ करण्यासाठी सज्ज आहेत. चॅम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा सहा बोर्डच्या मर्यादेत रंगणार असून पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह आकर्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!