पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेडची 920 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू
Park Medi World Limited ₹920 crore IPO to open on December 10, 2025
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 05/12/2025 📞 9004379946
प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154 रुपये ते 162 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित (“Equity Share”)
- बोली/ऑफर बुधवार 10 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 09 डिसेंबर 2025 आहे.
- बोली किमान 92 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 92 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

मुंबई,( NHI@24.COM) : पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेड (“कंपनी”)ने इक्विटी शेअरसाठी बुधवार 10 डिसेंबर 2025 पासून प्राथमिक समभाग विक्री बोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे
इक्विटी शेअर्सच्या 9,200 दशलक्ष रु. (920 कोटी रु.) पर्यतच्या एकूण ऑफर साईजमध्ये 7,700 दशलक्ष रु. (770 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि डॉ. अजित गुप्ता (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याद्वारे 1,500 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यतची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. (“The Total Offer Size”).
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 09 डिसेंबर 2025 आहे. बोली/ऑफर बुधवार 10 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.
प्रति इक्विटी शेअरसाठी 154 रुपये ते 162 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 92 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 92 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
कंपनीने इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर खालीलप्रमाणे करण्याचा प्रस्ताव दिला आहे: (i) कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या प्रलंबित कर्जाची पूर्णतः किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी; (ii) उपकंपनी पार्क मेडिसिटी (NCR) द्वारे नवीन रुग्णालयाच्या विकासासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चासाठी निधी; (iii) आमची कंपनी आणि आमच्या उपकंपन्या ब्लू हेव्हन्स आणि रतनगिरी यांनी वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या भांडवली खर्चासाठी निधी; आणि (iv) उर्वरित रक्कम अजून कार्यरत न झालेल्या इनऑर्गनिक अधिग्रहणांसाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (“ऑब्जेक्ट ऑफ इश्यू”).
ऑफर फॉर सेल मध्ये प्रवर्तक विक्री भागधारकाकडून 1500.00 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यतच्या 2 रु. दर्शनी मूल्य असलेल्या संख्येतील इक्विटी शेअर्सचा समावेश आहे,
नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड, CLSA इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, DAM कॅपिटल ॲडव्हायर्स लिमिटेड आणि इंटेसिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (The “BRLMs”) आहेत.
या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे 4 डिसेंबर 2025 (the “RHP”) रोजी सादर केलेले इक्विटी शेअर्स नवी दिल्लीतील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली आणि हरयाणा (the “RoC”) येथे सादर करण्यात आले असून BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर (“NSE”) सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
Disclaimer:
Park Medi World Limited is proposing, subject to, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the RHP with the RoC on December 4, 2025. The RHP is available on the website of the Company at www.parkhospital.in, SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the BRLMs, i.e. Nuvama Wealth Management Limited, CLSA India Private Limited, DAM Capital Advisors Limited and Intensive Fiscal Services Private Limited at www.nuvama.com, www.india.clsa.com, www.damcapital.in and www.intensivefiscal.com, respectively and the websites of National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com, respectively. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see “Risk Factors” on page 35 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP.
The Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the “U.S. Securities Act”) or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in “offshore transactions” as defined in and in compliance with Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where those offers and sales are made.
पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेडची 920 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू
प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154 रुपये ते 162 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित (“Equity Share”)



