क्रिकेटचा देव आणि फुटबॉलचा GOAT एका मंचावर! सचिनने मेस्सीला दिलं खास गिफ्ट, वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक क्षण
Lionel Messi India Tour 2025 :

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 14/12/2025 📞 9004379946

अर्जेंटीना स्टार फुटबॉलर लियोनल मेस्सी ‘GOAT इंडिया टूर 2025’अंतर्गत तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. त्याच्या दौऱ्याची सुरुवात कोलकाता येथून झाली. त्यानंतर तो हैदराबादला पोहचला. आणि दौऱ्याचा दुसऱ्या दिवशी तो मुंबईत आला. यावेळी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर एका खास समारंभाचे आयोजन केले होते. त्यात मेस्सीला भेटायला दिग्गज खेळाडू आणि बॉलीवूडचे तारेही जमले होते.
मुंबई,( NHI@24.COM) : फुटबॉलचा (Football) बादशाह लिओनेल मेस्सी (lionel Messi) हा तब्बल 14 वर्षांनी भारतात आलाय. मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून तो कोलकाता, हैद्राबाद, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कार्यक्रम घेऊन त्याच्या फॅन्सना भेटणार आहे. मेस्सीचा हा भारत दौरा त्याच्या भारतीय फॅन्ससाठी खूपच खास आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या फुटबॉलरची एक झलक पाहायला मिळावी यासाठी फॅन्स भारतातील विविध शहरांमधून मेस्सी भेट देणाऱ्या शहरांमध्ये पोहोचत आहेत. रविवार 14 डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सी हा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाला. येथे वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात फॅन्स सह सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्ती देखील मेस्सीला भेटण्यासाठी उपस्थित होते.
सचिन तेंडुलकरने मेस्सीला 10 नंबरची भारताची जर्सी भेट केली
लिओनेल मेस्सी वानखेडे स्टेडियमवर आला तेव्हा तो फॅन्सला भेटला तसेच त्याने स्टॅन्डच्या दिशेने फुटबॉल सुद्धा भिरकावले. सोबतच तो युवा फुटबॉलपटू असलेल्या संघांसोबत फुटबॉल सुद्धा खेळला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सीचे मुंबईत स्वागत केले. यावेळी मेस्सीने त्यांना त्याची सही असलेली जर्सी गिफ्ट केली. क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकरने सुद्धा यावेळी लिओनेल मेस्सीची भेट घेतली. यावेळी सचिन तेंडुलकरने त्यांना आपली 10 नंबरची भारताची जर्सी भेट केली. ज्यावर सचिनचा ऑटोग्राफ होता. सचिन आणि मेस्सीने सोबत फोटो काढला. हा भारताच्या क्रीडा विश्वातील एक ऐतिहासिक क्षण होता.

मेस्सी आणि सुनील छेत्रीची गळाभेट :

भारताचा स्टार फुटबॉलर सुनील छेत्री याने सुद्धा वानखेडे स्टेडियमवर लिओनेल मेस्सीची भेट घेतली. दोन्ही स्टार फुटबॉलरची गळाभेट झाली यावेळी दोघांनी चर्चा सुद्धा केली. मेस्सीने त्याची सही असलेली जर्सी सुनील छेत्रीला भेट दिली. स्टेडियमवर बॉलिवूडचे मोठे स्टार्स आपल्या कुटुंबासोबत उपस्थित होते. यात करीना कपूर, दिपशिखा देशमुख, टायगर श्रॉफ इत्यादींचा समावेश होता.

भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंह याने देखील लियोनल मेस्सी याची भेट घेतली. त्याची पत्नी मॉडेल गीता बसरा देखील या सोहळ्यात हजर होती. हरभजन याने लियोनल मेस्सी सोबतचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. हरभजनला लियोनल मेस्सी याने त्याची सही असलेली जर्सी भेट दिली.



