खेलराज्यलोकल न्यूज़

‘एसिक्स’चा टाटा ‘मुंबई मॅरेथॉन’सोबतचा १७ वर्षांचा प्रवास साजरा; २०२६मधील हंगामासाठी ‘जेल-निंबस २८’चे अनावरण

२०२६मधील हंगामासाठी ‘जेल-निंबस २८’चे अनावरण

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 13/12/2025 📞  9004379946

MUMBAI (NHI@24.COM) : एसिक्स या जागतिक कीर्तीच्या जपानी स्पोर्ट्सवेअर ब्रँडने टाटा मुंबई मॅरेथॉनसोबतच्या (टीएमएम) आपल्या सहकार्याच्या १७व्या वर्षानिमित्त आज ‘जेल-निंबस २८’ या नव्या ‘परफॉर्मन्स शू’चे अनावरण केले. या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते, उद्योजक आणि फिटनेसप्रेमी डिनो मोरिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुंबईतील लिंकिंग रोडवरील ‘एसिक्स’च्या दुकानात ब्रँडतर्फे मॅरेथॉनसाठी खास तयार केलेली विविध उत्पादनेही सादर करण्यात आली. ‘टीएमएम २०२६’साठी क्रीडासाहित्याचे भागीदार या नात्याने एसिक्सने भारतातील वेगाने वाढणाऱ्या क्रीडा आणि आरोग्यजाणिवेच्या संस्कृतीशी आपले नाते आणखी दृढ केले आहे.

कार्यक्षमता आणि सातत्यपूर्ण नवकल्पनांच्या आपल्या कटिबद्धतेनुसार ‘एसिक्स’ने ‘टीएमएम २०२६’साठी प्रमुख मॉडेल म्हणून आपला प्रसिद्ध न्यूट्रल कुशनिंग रनिंग शू ‘जेल-निंबस™ २८’ सादर केला आहे. जगभर ओळखल्या जाणाऱ्या या मॉडेलचे ढगासारखे मऊ कुशनिंग आणि शरीर-मनाला आधार देणारी आरामदायी रचना यासाठी विशेष कौतुक होते. नवीन मॉडेलमध्ये मागील आवृत्तीच्या तुलनेत तब्बल २० ग्रॅमपेक्षा अधिक वजन कमी केले गेले आहे. त्यामुळे खास गादीसारखा मृदू अनुभव कायम ठेवत धावण्याचा प्रवास आणखी सुरळीत, हलका आणि सहज बनतो.

या पादत्राणांना पूरक म्हणून ‘एसिक्स’ने ‘टीएमएम २०२६ एसएम ग्राफिक टी-शर्ट’ ही मर्यादित आवृत्तीसुद्धा सादर केली आहे. मुंबईच्या विकसित होत असलेल्या ‘कोस्टल रोड’वरून प्रेरित असलेल्या या डिझाइनमध्ये शहराचे नवे मार्ग, त्यांवरील वेग आणि पुढे जाण्याची उर्मी यांचे प्रतिबिंब दिसते. रस्त्याच्या अभियांत्रिकी संरचनेचा वापर ‘जोडणी, आकांक्षा आणि प्रगती’ यांचे प्रतीक म्हणून केला गेला आहे. टी-शर्टवरील रेखाचित्रातील ‘रनिंग शू’ हेच पुढे धावण्याचे, नवे टप्पे गाठण्याच्या ध्येयाचे रूपक बनते.

या वस्त्रसंग्रहात उच्च कार्यक्षमतेचे टू-इन-वन फोर-आयएन शॉर्ट्स, हवेशीर मेश कॅप, तसेच लाइट मेश अँकल सॉक्स अशी वस्त्रे व ॲक्सेसरीजही समाविष्ट आहेत. हा संपूर्ण संच धावपटूंना प्रशिक्षणापासून ते स्पर्धेच्या दिवशीपर्यंत थंड, कोरडे ठेवण्यासाठी व त्यांचे लक्ष केंद्रित राहण्यासाठी म्हणून काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे.

या प्रसंगी बोलताना एसिक्स इंडिया आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक रजत खुराना म्हणाले, “भारतात पुढील एका दशकभरात कामगिरीकेंद्रित क्रीडाक्षेत्र मोठ्या प्रमाणात बहरणार आहे. यामध्ये धावणे हा सर्वात प्रभावशाली क्रीडाप्रकार म्हणून झपाट्याने पुढे येत आहे. टाटा मुंबई मॅरेथॉनसोबत आमची १७ वर्षांची भागीदारी आहे. मॅरेथॉनसारखी ही व्यासपीठे लोकांना अधिक निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीकडे आकर्षित करतात. अशा व्यासपीठांच्या सामर्थ्यावर आमचा विश्वास आहे, म्हणूनच आम्ही त्यांच्याशी जोडलेलो आहोत. ‘जेल-निंबस™ २८’चे अनावरण हा भारतीय क्रीडापटू आणि धावपटूंना जागतिक दर्जाच्या नवकल्पना प्रदान करण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक पुढचा टप्पा मानायला हवा. ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६’साठी क्रीडासाहित्य भागीदार या नात्याने विज्ञानाधारित उत्पादने, अर्थपूर्ण प्रत्यक्ष उपक्रम आणि ‘मन–शरीर नाते’ या केंद्रस्थानी असलेल्या नव्या दृष्टिकोनातून अधिक मूल्य निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

या प्रसंगी ‘प्रो-कॅम इंटरनॅशनल’चे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंग म्हणाले, “टाटा मुंबई मॅरेथॉनच्या प्रवासात एसिक्स हा अविभाज्य भाग आहे. धावपटूंचा अनुभव अधिक समृद्ध करण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा उपक्रम वर्षागणिक अधिक उत्साहवर्धक ठरत आहे. आपण २१व्या आवृत्तीची तयारी करत आहोत. त्यायोगे संपूर्ण शहरात जाणवणारी उत्सुकता आणि ऊर्जा विलक्षण आहे. मुंबईची अढळ जिद्द, तिची आवड आणि लढाऊ वृत्ती पुन्हा एकदा रस्त्यांवर बहरून येईल. याचाच उत्सव म्हणजे #HarDilMumbai.”

मुंबईत ‘जेल-निंबस २८’चे आणि ‘टीएमएम २०२६’साठीच्या वस्त्रसंग्रहाचे अनावरण करत ‘एसिक्स’ने यंदाच्या मॅरेथॉन हंगामाची दिशा अधिक सक्षम आणि परस्परसंलग्न अशी ठरवली आहे. या अनावरण सोहळ्यात अनेक क्रीडापटू, भागीदार आणि धावपटू समुदायातील सदस्य सहभागी झाले होते. यातून ‘टीएमएम २०२६’बद्दल ‘एसिक्स’ची व्यापक, दूरदृष्टीपूर्ण भूमिका स्पष्ट झाली आहे.

‘न्यू दिल्ली मॅरेथॉन’, बंगळुरूची ‘टीसीएस वर्ल्ड १०के’ आणि नुकतीच झालेली ‘एनएमडीसी हैदराबाद मॅरेथॉन २०२५’ अशा भारतातील काही प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भागीदार एसिक्स आहे. त्यातून हा ब्रॅंड संपूर्ण देशभरात सक्षम धावपटूंची एक सक्षम परंपरा उभारीत आहे. नवकल्पनांवर आधारित क्रीडासाहित्य, समुदायाला केंद्रस्थानी ठेवणारे उपक्रम आणि जागतिक दर्जाची परफॉर्मन्स वस्त्रे यांच्या माध्यमातून सर्व स्तरांवरील क्रीडापटूंना आणि धावपटूंना सामर्थ्यवान बनवत, धावण्याच्या परिवर्तनकारी शक्तीचा प्रसार करण्यासाठी एसिक्स कटिबद्ध आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉनचा अधिकृत वस्त्रसंग्रह हा ‘एसिक्स’च्या मुंबई आणि पुण्यातील निवडक दुकानांमध्ये, तसेच ऑनलाईन स्वरुपात https://www.asics.co.in/tata-mumbai-marathon येथे उपलब्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!