खेल

दक्षिण आफ्रिकेकडून ऐतिहासिक 359 धावांचा यशस्वी पाठलाग;राहुलसेना विजयी घोडदौड राखण्यात अपयशी

India vs South Africa 2nd ODI Match; Africa BEAT India

टीम इंडियाचा 4 विकेट्सने धुव्वा, मालिकेत बरोबरी

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 गडी गमवून 358 धावा केल्या. तसेच विजयासाठी 359 धावांचं आव्हान दिलं. खरं तर हे आव्हान खूपच कठीण होतं. पण दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी सावध फलंदाजी करत हे विशालकाय आव्हान सहज गाठलं आहे. दक्षिण अफ्रिकेने 4 विकेट आणि 4 चेंडू राखून हे आव्हान गाठलं.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेकडून ऐतिहासिक 359 धावांचा यशस्वी पाठलाग, टीम इंडियाचा 4 विकेट्सने धुव्वा, मालिकेत बरोबरी
एडन मार्करम आणि मॅथ्यू ब्रित्झके – दमदार फलंदाजी – आणि टीम इंडियाचा पराभव

रायपूर : गेल्या सामन्यापेक्षा जास्त धावा करूनही भारतावर यावेळी पराभवाची नामुष्की ओढवली. भारताच्या ३५९ धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला एडन मार्करमने शतक झळकावत चांगली सुरुवात करून दिली होती. मार्करमला बाद करण्यात यश आले, पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हाल्ड ब्रेव्हिस आणि मॅथ्यू ब्रित्झके यांनी दमदार फलंदाजी करत संघाला चार विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या विजयामुळे आता दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

रोहित शर्माने तीन चौकारांसह भारताला दणक्यात सुरुवात करून दिली, पण त्याला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. रोहित शर्मा १४ धावांवर बाद झाला, यशस्वीही २२ धावाच करू शकला. भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते. त्यामुळे भारतीय संघाचे काय होणार, हा प्रश्न चाहत्यांना पडला. पण चाहत्यांचा हा प्रश्न ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली यांनी सोडवला.

ऋतुराज आणि विराट यांनी भारताचा डाव फक्त सावरलाच नाही तर त्याला चांगला आकारही दिला. कारण ऋतुराज आणि विराट यांनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल १९५ धावांची भागीदारी रचली आणि त्यामुळेच भारताला वेगवान धावा करता आल्या. विराटपेक्षा ऋतुराज यावेळी जास्त आक्रमक खेळत होता. कारण ऋतुराजने या सामन्यात फक्त ८३ चेडूंत १२ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १०५ धावांची खेळी केली, तर विराट कोहलीने ९३ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १०२ धावा केल्या. ऋतुराजने आपले शतक ७७ चेंडूंत पूर्ण केले होते. गेल्या १४ वर्षांत भारताकडून दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेले हे सर्वात वेगवान शतक ठरले. त्याचबरोबर ऋतुराजने पदार्पण केल्यानंतर ११५४ चेंडूंत हे पहिले शतक झळकावले, यापूर्वी ऋतुराजला गेल्या सात वनडे सामन्यांत एकही शतक झळकावता आले नव्हते. त्यामुळे ऋतुराजसाठी हे शतक महत्वाचे ठरले. हे दोघेही बाद झाले आणि भारताचा डाव अडचणीत आला. पण त्यावेळी केएल राहुलने सावरले. राहुलने यावेळी ४३ चेंडूंत ६६ धावांची खेळी साकारली, त्यामुळेच भारताला ३५८ धावा करता आल्या.

दक्षिण आफ्रिकेने रायपूरमध्ये दुसऱ्या आणि करो या मरो अशा सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात 4 बॉलआधी पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकने 49.2 ओव्हरमध्ये 362 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची परदेशात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची पहिली वेळ ठरली. दक्षिण आफ्रिकेने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. तर टीम इंडियाची 350 पेक्षा अधिक धावा करुनही पराभव होण्याची दुसरी वेळ ठरली. भारताच्या या पराभवामुळे ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या दोघांची शतकी खेळी व्यर्थ ठरली.

त्याला जीवदान देणं हीच भारतासाठी मोठी चूक

दक्षिण अफ्रिकेने 4 विकेट आणि 4 चेंडू राखून हे आव्हान गाठलं. भारतीय गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. एकतर विकेट मिळत नव्हती. त्यात झेल सोडल्याने पराभव होणार हे निश्चित… त्यात एडन मार्करमसारख्या आक्रमक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला संधी देणं म्हणजे पायावर धोंडा मारणं.. त्याला जीवदान देणं हीच भारतासाठी मोठी चूक ठरली. कारण त्याची विकेट झटपट मिळाली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं.

किंग कोहलीचा डबल धमाका! सलग दुसऱ्या सामन्यात ठोकलं विक्रमी शतक

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) लागोपाठ दुसऱ्या सामन्यात शतक ठोकलं. यापूर्वी विराटने रांची येथील सामन्यात सुद्धा शतकीय कामगिरी केली होती. विराटने बुधवारी रायपूरमध्ये ठोकलेलं हे शतक त्याचं वनडे क्रिकेटमधील 53 वं शतक ठरलं आणि तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटचं हे 84 वं शतक ठरलं.  यात आधी ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं. त्यानंतर विराट कोहलीने शतक पूर्ण केलं. विराटने 93 बॉलमध्ये 102 धावा केल्या. दरम्यान त्याने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

ऋतुराज गायकवाडचं शतक : 

दोन वर्षांनी टीम इंडियाच्या वनडे संघात स्थान मिळवलेल्या ऋतुराज गायकवाडने सुद्धा या सामन्यात  शतक ठोकलं. त्याने 77 बॉलमध्ये हे शतक ठोकलं. ऋतुराजने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 52 बॉल घेतले तर पुढील अवघ्या 25 बॉलमध्ये त्याने शंभरीचा आकडा पार केला. दरम्यान ऋतुराजने 12 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 19 डिसेंबर 2023 मध्ये ऋतुराज शेवटचा वनडे सामना टीम इंडियाकडून खेळला होता. 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याचं वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण झालं होतं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!