महाराष्ट्र

भारत सरकारने अपोलो लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्रामला विशेष सन्मानित केले

POSTED BY : ANAGHA SAKPAL 14 NOVEMBER  📞 9004679946

मुंबई, (NHI@.COM) : अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने आज भारत आणि दक्षिण आशियातील आरोग्य देखभाल क्षेत्रामध्ये एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. ‘अपोलो लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्राम’ अंतर्गत ५,००० यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (liver transplants) यशस्वीरित्या पूर्ण करणारा अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप हा भारतातील आणि दक्षिण आशियातील पहिला रुग्णालय समूह बनला आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा २५ वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात प्रस्तुत केल्या गेलेल्या नवकल्पना, करुणामय काळजी आणि ५० हून अधिक देशांमधील यकृताच्या शेवटच्या टप्प्यातील आजाराशी लढा देणाऱ्या व्यक्तींसाठी आशेचा किरण आहे.

अपोलो हॉस्पिटल्सने १५ नोव्हेंबर १९९८ रोजी भारतातील पहिले बाल (पीडियाट्रिक) यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले आणि भारत व दक्षिण आशियामध्ये उपलब्ध असलेले यकृतावरील उपचार, वैद्यकीय देखभाल यांची एक नवी व्याख्या लिहून एक वारसा निर्माण केला. ही प्रक्रिया ज्याच्यावर केली गेली तो संजय, त्यावेळी अवघा २० महिन्यांचा होता आणि त्याला पित्त नलिकेच्या अविकसितपणामुळे (biliary atresia) त्रास होत होता. एका जीवघेण्या आजाराशी लढा देणारा बालरुग्ण ते आज एक प्रॅक्टिसिंग डॉक्टर आणि वडील बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास दर्शवतो की, अपोलोच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये केवळ व्यक्तींचेच नव्हे, तर कुटुंबे आणि समुदायांचे जीवन बदलण्याची अचाट शक्ती आहे.

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी सांगितले,”ही कामगिरी म्हणजे भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रात किती आणि कोणत्या क्षमता आहेत, जेव्हा आम्ही 1998 मध्ये आम्ही केलेल्या पहिल्या यशस्वी प्रत्यारोपणाचा आनंद साजरा केला, तेव्हा मी अशा भविष्याचे स्वप्न पाहिले होते, जिथे प्रत्येक गरजू रुग्णाला, तो कोणत्याही भूप्रदेशात असला तरी जागतिक दर्जाचे उपचार मिळू शकतील. 5,000 यकृत प्रत्यारोपणे पूर्ण करणे, हा ते स्वप्न पूर्ण झाल्याचा पुरावा असून, आमचे कुशल आणि अथक प्रयत्नशील वैद्यकीय कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांचे हे फलित आहे.”

दोन दशकांहून अधिक काळामध्ये, अपोलोच्या प्रत्यारोपण कार्यक्रमांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. या कार्यक्रमांतर्गत अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत, जसे की, एबीओ-असंगत (ABO-incompatible) प्रत्यारोपण आणि यकृत व मूत्रपिंड या दोन्ही अवयवांचे एकाच वेळी यशस्वी प्रत्यारोपण. प्रौढ रुग्णांबरोबरीने लहान मुलांवरही अपोलोमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये केवळ ४ महिन्यांच्या आणि फक्त ३.५ किलो वजनाच्या बालकांचाही समावेश होता. देशातील वैद्यकीय क्षेत्रावर या कार्यक्रमाने निर्माण केलेल्या मोठ्या प्रभावाची दखल घेऊन, भारत सरकारने अपोलो लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्रामला विशेष सन्मानित केले आहे. भारत सरकारतर्फे टपाल तिकीट जारी करून गौरवण्यात आलेला हा एकमेव लिव्हर ट्रान्सप्लांट कार्यक्रम आहे.

डॉ.मधू शशीधर,अध्यक्ष-मुख्य कार्यकारी अधिकारी,अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप म्हणाले,”हा कार्यक्रम केवळ किती रुग्णांवर उपचार झाले यावर मोजला जाऊ नये. त्या कार्यक्रमामुळे नवीन डॉक्टर घडत आहेत, महत्त्वाचे वैद्यकीय संशोधन होत आहे आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी नवीन मापदंड निर्माण होत आहेत. हे यश केवळ अपोलोसाठी नव्हे तर संपूर्ण भारताच्या वैद्यकीय प्रगतीसाठी प्रेरणादायी आणि महत्त्वाकांक्षा निर्माण करणारे आहे.”

अपोलो लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्रामअंतर्गत १५ नोव्हेंबर १९९८ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ५,००१ यकृत प्रत्यारोपणे यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. यामध्ये ४,३९१ प्रौढ आणि ६११ बालकांवरील प्रक्रियांचा समावेश आहे. तसेच, ७०० मृत दात्यांकडून आणि ७३ यकृत-मूत्रपिंड एकत्र प्रत्यारोपणे करण्यात आली आहेत. या कार्यक्रमाचा नैदानिक (clinical) यश दर ९०% पेक्षा जास्त असून, प्रगत तंत्रज्ञान, बहुविद्याशाखीय कौशल्य आणि प्रत्यारोपण समन्वयकांचे मजबूत राष्ट्रीय जाळे यामुळे हा कार्यक्रम जगातील एक सर्वोत्तम कार्यक्रम मानला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!