युवालोकल न्यूज़

अपोलो टेक्नो इंडस्ट्रीज चा आयपीओ 23 डिसेंबरला उघडणार तर 26 रोजी बंद होणार

अपोलो टेक्नो इंडस्ट्रीज चा आयपीओ 23 डिसेंबरला उघडणार

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 22/12/2025 📞  9004379946

डावीकडे: श्री. पार्थ पटेल -अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, अपोलो टेक्नो इंडस्ट्रीज लिमिटेड. उजवीकडे: सीएस गगन कोहली – सहयोगी उपाध्यक्ष
मुंबईतील अपोलो टेक्नो इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओ पत्रकार परिषदेत बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड

मुंबई,( NHI@24.COM) : मुंबई हॉरीझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलिंग (एचडीडी) रिग्स डायफ्रॉम वॉल ड्रिलिंग रिग्सच्या उत्पादनात गुंतलेली अपोलो टेक्नो इंडस्ट्रीज लिमिटेड ही देशातील एकमेव देशाअंतर्गत उत्पादक कंपनी असून रोटरी ड्रिलिंग रिग्सच्या उत्पादकांपैकी एक असलेल्या कंपनीचा आयपीओ 23 डिसेंबर रोजी खुला तर 26 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल
देशभरातील आणि निर्यात बाजारपेठे मधील विविध अंतिम वापर करता उद्योगांच्या गरजा कंपनी पूर्ण करते. दहा रुपये दर्शनी मूल्यांचे 3689000 इक्विटी शेअर्सच्या नवीन इशू मधून 47.96 कोटी उभारण्याचे लक्ष्य ठेवत आहे. किंमत पट्टा प्रति शेअर 123 ते 130 रुपये असा निश्चित करण्यात आला आहे.
लॉट साइज 1000 इक्विटी शेअर्स हे इक्विटी शेअर्स बीएसइ एसएम इ प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

इक्विटी शेअरचा अँकर भाग 10,50,000 पेक्षा जास्त नसेल पात्र संस्थात्मक खरेदीदार 7,00,000 पेक्षा जास्त नाही तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदार 5,26,000 पेक्षा कमी नाही व्यक्तिगत गुंतवणूकदार 12, 28,000 पेक्षा कमी नाही. मार्केट मेकर 1,85,000 इक्विटी शेअर्स आहेत.

कंपनीला आयपीओ मधून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करणे आणि सामान्य कार्पोरेट खर्चासाठी केला जाईल. अँकर पोर्शन 22 डिसेंबर रोजी उघडेल इशू 23 डिसेंबर रोजी खुला आणि 26 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.
या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर बिलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रा. लि. हे असून इश्यूचे रजिस्टर एमयुएफजी इंटाईम इंडिया प्रा. लि. आहेत.

अपोलो टेक्नोचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ रश्मिकांत पटेल म्हणाले, अपोलो टेक्नो ही भारतातील एकमेव देशांतर्गत उत्पादक कंपनी आहे जी हॉरिझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलिंग(एचडीडी) उपकरणे आणि डायफ्रॉम वॉल ड्रिलिंग रिंग्सच्या उत्पादनात गुंतलेली असून रोटरी ड्रिलिंग रिग्सच्या उत्पादनापैकी एक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही भारताच्या वाढत्या पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मजबूत स्वदेशी उत्पादन क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच निवडक निर्यात बाजारपेठांमध्ये आमची उपस्थिती वाढवली आहे. आयपीओ मधून मिळणारा निधी आमच्या वाढीच्या योजनांना पाठिंबा देईल आणि ड्रिलिंग उपकरण विभागांमध्ये आमचे स्थान मजबूत करेल, असेही ते म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!