अबॅकस म्युच्युअल फंडाच्या पहिल्या एनएफओला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद; 2,468 कोटींची उभारणी
अबॅकस म्युच्युअल फंडाच्या पहिल्या एनएफओला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 31/12/2025 📞 9004379946
मुंबई NHI.COM(M) 5: अबॅकस म्युच्युअल फंडच्या पहिल्याच योजनेला देशभरातील गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 8 ते 22 डिसेंबर 2025 या कालावधीत खुल्या असलेल्या अबॅकस फ्लेक्सी कॅप फंडच्या न्यू फंड ऑफर (एनएफओ) दरम्यान एकूण ₹2,468 कोटींची भरीव गुंतवणूक जमा झाली आहे.
या योजनेत देशातील सुमारे 2,000 शहरांमधील 5,518 पिनकोड्समधून गुंतवणूक नोंदवली गेली असून, 36,688 किरकोळ गुंतवणूकदारांसह 1,060 संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला आहे. यावरून गुंतवणूकदारांचा या नव्या फंडावरील वाढता विश्वास अधोरेखित होतो.
गुंतवणुकीचा विस्तार वाढवण्यासाठी आणि व्यवसायवृद्धीस चालना देण्यासाठी अबॅकस म्युच्युअल फंडने देशभरात 4,700 नोंदणीकृत वितरकांचे मजबूत जाळे उभे केले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना अबॅकस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव चुग म्हणाले की, “आमच्या पहिल्याच फंडाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद हा अबॅकस समूहाच्या मजबूत ब्रँड विश्वासाचा आणि एनएफओ कालावधीत आमच्या विक्री टीम व वितरकांनी दिलेल्या शिस्तबद्ध व विश्वासार्ह सल्ल्याचा परिणाम आहे. फ्लेक्सी कॅप संकल्पनेनुसार या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये विविध मार्केट कॅप श्रेणींमध्ये संतुलित गुंतवणूक करताना ठोस विश्वास असलेल्या संधींना प्राधान्य देण्यात आले आहे. आगामी काळात आणखी फंड्स सादर करण्याचा आमचा मानस आहे.”
अबॅकस फ्लेक्सी कॅप फंडचे व्यवस्थापन संजय दोशी, हेड ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड रिसर्च, करत आहेत. हा फंड 30 डिसेंबर 2025 पासून पुन्हा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला असून, तो नियमित तसेच डायरेक्ट अशा दोन्ही योजनांमध्ये उपलब्ध आहे.




