Uncategorized

उजासने बालिका अधिकार दिनानिमित्त ‘लेट्स टॉक रेड!’ 

 गोलमेज परिषदेमध्‍ये मुंबईतील पहिले चार्टर ऑफ मेन्‍स्‍ट्रुअल राइट्स तयार करण्‍यासाठी किशोरवयीन मुलींना एकत्र आणले

उजासने बालिका अधिकार दिनानिमित्त लेट्स टॉक रेड!

14 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींच्‍या नेतृत्‍वांतर्गत हे चार्टर तयार करण्‍यासाठी पाच एनजीओंमधील मुली एकत्र आल्‍या, जेथे मुंबईतील अनौपचारिक वस्‍त्‍यांमध्‍ये राहणाऱ्या आणि संपूर्ण महाराष्‍ट्रातील किशोरवयीन मुलींना मासिक पाळीदरम्‍यान आदर, सुरक्षितता आणि उपलब्‍ध सोयीसुविधेबाबत जागरूक करण्‍यात आले

मुंबई, 20 नोव्‍हेंबर २०२५: मासिक पाळीदरम्‍यान उत्तम आरोग्‍य आणि किशोरवयीन अधिकारांच्‍या दिशेने प्रगत वाटचाल करत अद्वैतेशा बिर्ला यांनी स्‍थापन केलेला आदित्‍य बिर्ला एज्‍युकेशन ट्रस्‍ट उपक्रम ‘उजास’ने बाल अधिकार सप्‍ताहादरम्‍यान युवा गोलमेज परिषदेचे आयोजन केले, ज्‍यामध्‍ये मासिक पाळी आरोग्‍याबाबत संवादामध्‍ये मुलींच्‍या महत्त्वपूर्ण मतांवर भर देण्‍यात आला.

आदित्‍य बिर्ला वर्ल्‍ड अकॅडमी येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या या परिषदेमध्‍ये वंचित समुदायामधील किशोरवयीन मुलींना मुंबईतील पहिले चार्टर ऑफ मेन्‍स्‍ट्रुअल राइड्स बाय अॅडोलसेंट गर्ल्‍स तयार करण्‍यास प्रेरित करण्‍यात आले, ज्‍यामध्‍ये पीरियडदरम्‍यान प्रत्‍यक्ष अनुभवास येणाऱ्या पैलूंना प्रकाशझोतात आणण्‍यात आले. उजासने एकत्र आणलेले पाच सहभागी पाच तळागाळातील संस्‍थांमधील होते – वाचा, चीप, पुकार, ऑस्‍कर फाऊंडेशन आणि कोरो, जे सर्व एमपॉवरच्‍या लर्निंग कम्‍युनिटी कोहर्टचा भाग आहेत.

मुलींना खुल्‍या मनाने चर्चा करत त्‍यांच्‍या पहिल्‍या पीरियड अनुभवांबाबत सांगितले, ज्‍यामध्‍ये भिती, कलंक, गैरसमजूत आणि सामाजिक निर्बंधांबाबत गाथांचा समावेश होता. त्‍यांच्‍या या अनुभवांमधून सामुदायिक जागरूकता, सुरक्षित पायाभूत सुविधा आणि सहाय्यक वातावरणासाठी त्‍वरित गरज दिसून आली, ज्‍यामुळे किशोरवयीन मुली आदरासह मासिक पाळीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास सक्षम होतील. उबंटू मूव्‍हमेंटच्‍या संस्‍थापिका लोचना आडिवरेकर यांनी या सत्राचे संचालन केले. उबंटू मूव्‍हमेंट रंगभूमी व चळवळीच्‍या माध्‍यमातून किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण देते.

एकत्रित, मुलींनी चार्टर ऑफ मेन्‍स्‍ट्रुअल राइट्स तयार केलेज्‍याद्वारे पुढील आवाहन केले:     

  • शाळा व समुदायांमध्‍ये मोफत व किफायतशीर मासिक पाळी उत्‍पादने.
  • पॅड-वेंडिंग व डिस्‍पोजल मशिन्‍स असलेली स्‍वच्‍छ,सुरक्षित, प्रकाशमय, लिंग-संवेदनशील शौचालये.
  • मुले व मुली दोघांना इयत्ता पाचवीपासून सर्वसमावेशक मासिक पाळी व प्रजनन आरोग्‍य शिक्षण.
  • मासिक पाळीसंदर्भात कलंक, चिडवणे आणि निर्बंधात्‍मक आचरणाला दूर करण्‍यासाठी प्रयत्‍न.
  • किशोरवयीन-अनुकूल आरोग्‍यसेवांसोबत‍ आपले दवाखाना योजनेअंतर्गत ग्‍यानेकोलॉजिस्‍टची (स्‍त्रीरोगतज्ञ) उपलब्‍धता.
  • अनेमियाचे निर्मूलन करण्‍यासाठी आणि आरामदायी, आरोग्‍यदायी पीरियड्सना चालना देण्‍यासाठी मुलींना दर महिन्‍याला रेशन पुरवठा.
  • शाळा, कॉलेज व समुदायांमध्‍ये पीरियड-अनुकूल जागा, जेथे आराम कक्ष, पॅड्सची उपलब्‍धता, गरम पाण्‍याच्‍या पिशव्‍या आणि आरामदायी मासिक पाळीला साह्य करण्‍यासाठी सुविधा असतील.
  • मुलींसाठी सक्रिय राहण्‍याकरिता आणि आरोग्‍यदायी मासिक पाळी चक्राला साह्य करण्‍याकरिता सुरक्षित खेळाच्‍या मैदानाची उपलब्‍धता.
  • जागरूकता व मार्गदर्शन सत्रांच्‍या माध्‍यमातून सहयोगी म्‍हणून पुरूष आणि मुलांचा पाठिंबा.
  • मासिक पाळी सुरू असलेल्‍या किशोरवयीन मुलींना घरामध्‍ये पाठिंबा देण्‍यासाठी माता व कुटुंबाचा सहभाग.

नुकतेच महाराष्‍ट्रातील ग्रामीण भागामधील सरकारी व स्‍थानिक शाळांमधील 3,000 किशोरवयीन मुलींसह करण्‍यात आलेल्‍या उजास सर्वेक्षणामधील निष्‍पत्तींनी या चार्टरला अधिक मजबूत केले आहे. या सर्वेक्षणामधून गोलमेज परिषदेत करण्‍यात आलेल्‍या मागण्‍यांची पुष्‍टी मिळते आणि मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याची घ्‍यावयाची काळजी आणि जागरूकता यामधील महत्त्वपूर्ण तफावत दिसून येते.

या सर्वेक्षणामधील प्रमुख निष्‍पत्ती पुढीलप्रमाणे:

  • मासिक पाळी उत्‍पादनांची उपलब्‍धता – 22 टक्‍के मुलींनी या बाबीला त्‍वरित गरज म्‍हणून ओळखले.
  • सुरक्षित व स्‍वच्‍छ शौचालये – 19 टक्‍के मुलींनी शाळा व त्‍यांच्‍या समुदायांमध्‍ये प्रमुख अडथळा म्‍हणून योग्‍य स्‍वच्‍छतेचा अभाव असल्‍याचे सांगितले.
  • जागरूकता व शिक्षण – 19 टक्‍के मुलींनी लवकर व अचूक मासिक पाळी व प्रजनन आरोग्‍यासंदर्भात माहिती देण्‍याची मागणी केली.
  • पीरियडसाठी अनुकल जागा – 15टक्‍के मुलींनी विशेषत: मासिक पाळीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी नियुक्‍त आरामदायी जागांसाठी गरज व्‍यक्‍त केली, जेथे गरम पाण्‍याचे बॅड, हीटींग मॅट आणि मुलभूत औषधोपचार असतील, ज्‍यामुळे पीरियडदरम्‍यान होणाऱ्या वेदना व अस्‍वस्‍थतेचे सुरक्षितपणे व्‍यवस्‍थापन करता येईल.
  • डिस्‍पोजल पर्यायांची उपलब्‍धता – 13 टक्‍के मुलींनी अपुऱ्या किंवा असुरक्षित डिस्‍पोजल सुविधांबाबत तक्रार केली.
  • पुरूष व मुलांचा सहभाग – 7 टक्‍के मुलींनी मासिक पाळीबाबत कलंक व चिडवणे दूर करण्‍यासाठी सहकाऱ्यांकडून पाठिंब्‍याची गरज व्‍यक्‍त केली.

या माहितीमधून पद्धतशीर, पायाभूत व सामाजिक-सांस्‍कृतिक आव्‍हाने निदर्शनास येतात, जी किशोरवयीन मुलींना सतत सामना करावी लागत आहेत, तसेच चार्टरमध्‍ये उल्‍लेख करण्‍यात आलेल्‍या सहयोगात्‍मक प्राधान्‍यक्रमांची पुष्‍टी देखील मिळते.

एकत्रित, चार्टरमधून मासिक पाळीदरम्‍यान आदर, सुरक्षितता व स्‍वातंत्र्यासाठी प्रबळ सहयोगात्‍मक मागणी दिसून येते. इव्‍हेण्‍टमध्‍ये सहभाग घेतलेल्‍या संस्‍थांनी देखील अतिरिक्‍त सल्‍ले दिले, ज्‍यासह एकत्रित दृष्टिकोन अधिक दृढ झाला. उजास समविचारी संस्‍थांमध्‍ये चार्टरचे दस्तावेजीकरण आणि प्रसार करेल, ज्‍यामुळे प्रतिसादात्‍मक पायाभूत सुविधा असण्‍यासोबत पीरियडसाठी अनुकूल जागा असलेला समाज घडवण्‍यासाठी उपक्रमाची रचना आणि सहयोगात्‍मक समर्थनाला अधिक पाठिंबा मिळेल.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत उजासच्‍या प्रमुख कु. पूनक पाटकर म्‍हणाल्‍या, ”या गोलमेज परिषदेने मर्यादित उपलब्‍धता, कलंक आणि असुरक्षित स्‍वच्‍छता अशा दैनंदिन वास्‍तविकतांचा सामना कराव्‍या लागणाऱ्या किशोरवयीन मुलींचे धैर्य व स्‍पष्‍टतेला प्रकाशझोतात आणले. त्‍यांचे मत पक्के आहे, त्‍यांच्‍या मागण्‍या कायदेशीर आहेत आणि त्‍यांचे नेतृत्‍व महत्त्वाचे आहे. त्‍यांनी तयार केलेले चार्टर फक्‍त डॉक्‍यूमेंट नाही तर कृती, आदर व समानतेसाठी आवाहन आहे. उजासमध्‍ये आम्‍ही त्‍यांच्‍या आवाजांना अधिक बुलंद करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत आणि खात्री घेत आहोत की, मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याची घ्‍यावयाची काळजी विशेषाधिकार नाही तर हक्‍क बनेल.”

या गोलमेज परिषदेने मासिक पाळी आरोग्‍याबाबत संवादांमध्‍ये किशोरवयीनांच्‍या मतांना प्राधान्‍य देण्‍याप्रती आणि तरूण मुली त्‍यांना अपेक्षित असलेल्‍या परिवर्तनाचे नेतृत्‍व करू शकतील, असे प्‍लॅटफॉर्म्‍स निर्माण करण्‍याप्रती उजासच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!