स्टारबक्स कॉफी कंपनी आणि टाटा स्टारबक्स यांच्याकडून कॉफीच्या क्षेत्रात नेतृत्व आणि बीन ते कप पर्यंत कॉफी मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी शेतकरी समर्थन भागीदारीची (एफएसपी) घोषणा
स्टारबक्स कॉफी कंपनी आणि टाटा स्टारबक्स यांच्याकडून
POSTED BY : ANAGHA SAKPAL, 20 NOVEMBER 2025R 📞9004679946
स्टारबक्स कॉफी कंपनी आणि टाटा स्टारबक्स यांच्यातील धोरणात्मक सहकार्यातून स्थापन झालेल्या एफएसपीचे उद्दिष्ट २०३० पर्यंत १०,००० भारतीय कॉफी शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचे आहे.
स्टारबक्स या आठवड्यात दिल्ली एनसीआरमध्ये भारतातील आपले ५०० वे कॉफीहाऊस उघडणार आहे – एक स्टारबक्स रिझर्व्ह® स्थान जे प्रीमियम आणि इमर्सिव्ह कॉफी अनुभव देते.
मुंबई, , (NHI.24.COM)— भारताप्रती असलेल्या दीर्घकालीन वचनबद्धतेची आणि बाजारपेठेत कॉफीचे नेतृत्व अधिक दृढ करण्याच्या योजनांची घोषणा करताना स्टारबक्स कॉफी कंपनीने आज शेतकरी समर्थन भागीदारी (एफएसपी) स्थापनेची घोषणा केली. टाटा स्टारबक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने एफएसपी स्थानिक कृषीशास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांना ओपन-सोर्स कृषीशास्त्राद्वारे जागतिक शेतीच्या सर्वोत्तम पद्धतींशी जोडेल.
बीनपासून कपपर्यंत भारताच्या कॉफी मूल्य साखळीचे सक्षमीकरण
स्टारबक्स जागतिक खरेदी आणि व्यापार उपकंपनी असलेली स्टारबक्स कॉफी ट्रेडिंग कंपनी एसएआरएल (एससीटीसी) २०३० पर्यंत १०,००० शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी टाटा स्टारबक्सशी सहकार्य करणार आहे. कर्नाटकात स्थित एफएसपी टाटा स्टारबक्सचे सखोल स्थानिक ज्ञान, भारताचा कॉफी उत्पादक वारसा आणि स्टारबक्सचा अनेक दशकांचा जागतिक कृषीशास्त्र कौशल्य एकत्र येईल. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळसह भारतातील प्रमुख कॉफी उत्पादक राज्यांमधील शेतकऱ्यांना स्टारबक्स जागतिक नेटवर्कशी संबंध मजबूत करण्यासाठी, नवसंशोधनासाठी आणि शेती व शाश्वततेत सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी पाठबळ देईल जेणेकरून भारतीय कॉफीचे भविष्य शाश्वत होईल.
एफएसपी भारतातील शेतकऱ्यांसोबत भागीदारीत तांत्रिक “मॉडेल फार्म” स्थापन करेल. त्यात जागतिक शिक्षणाचा समावेश असेल, कॉफी शेतीमध्ये सर्वोत्तम पद्धती अंतर्भूत करून शाश्वत उपायांची चाचणी घेतली जाईल. भारतातील एफएसपी नवीन जातींच्या चाचणीसाठी केंद्र म्हणून काम करेल, भारतीय पद्धती आणि परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या नाविन्यपूर्ण शेती तंत्रांबद्दल ज्ञान देईल आणि कॉफीची गुणवत्ता, उत्पादकता आणि हवामान लवचिकता सुधारण्यासाठी इतर कृषी वनीकरण उपक्रमांबद्दल माहिती देईल.
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची गुणवत्ता आणि नफा दोन्ही सुधारण्यास मदत करण्यासाठी पारंपरिक पद्धतींवर आधारित विकास करणे हे उद्दिष्ट आहे. एफएसपी स्टारबक्स जागतिक नेटवर्कमधील विद्यमान उत्कृष्टता केंद्रांसोबत काम करेल. यात जगभरातील कॉफी उत्पादक प्रदेशांमध्ये शेतकरी समर्थन केंद्रे (एफएससी) सोबत भागीदारी करणे समाविष्ट आहे. त्यात कृषीशास्त्रज्ञ संशोधनावर शेतकऱ्यांशी थेट समन्वय साधतील आणि स्टारबक्स पुरवठा साखळीतील विद्यमान “मॉडेल फार्म” मधून शिकतील. या नेटवर्कमध्ये इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा आणि चीनमधील युनानमधील एपीएसी प्रदेशातील एफएससी आणि कोस्टा रिकामधील हॅसिंडा अल्सासिया यांचा समावेश आहे. स्टारबक्स हे पहिले कंपनी-संचालित कॉफी फार्म आहे आणि स्टारबक्स कोस्टा रिका फार्मर सपोर्ट सेंटर आणि स्टारबक्स ग्लोबल रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमचे मुख्यालय आहे.
एफएसपीच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना स्टारबक्स २०२६ जागतिक डिजिटल प्रशिक्षण साधनांचा देखील फायदा होईल. ते कृषीशास्त्र, कॉफीची गुणवत्ता आणि सी.ए.एफ.ई. (कॉफी आणि शेतकरी समभाग) पद्धतींवर तपशीलवार ऑनलाइन मॉड्यूल देतील. त्यामुळे नैतिक स्रोतांना प्रोत्साहन मिळेल आणि शेवटी उत्पादकता आणि शाश्वतता वाढेल. शेतकऱ्यांना कार्बन, पाणी आणि कचरा कमी करण्यासाठी आणि कृषी वनीकरण आणि सामाजिक विकास उपक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी रेजेन-एजी (पुनर्जन्म शेती) पद्धती आणि पद्धतींबद्दल देखील शिक्षित करेल.
एफएसपी पुढील ५ वर्षांत कॉफी उत्पादकता अनलॉक करणे, शेतीचा नफा वाढवणे आणि हवामान लवचिकता निर्माण करणे या प्रमुख स्टारबक्स वचनबद्धतेमध्ये प्रकल्प विकसित करेल. क्षमतानिर्मितीसाठी आणि भारताची संपूर्ण कॉफी मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी टाटा स्टारबक्स पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांना भरपूर उत्पादन देणारी अरेबिका जातीची दहा लाखांपेक्षा अधिक रोपेदेखील दान करेल.
या आठवड्यात भारत भेटीदरम्यान स्टारबक्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन निकोल म्हणाले, “भारत आमच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. आम्ही भारतातील कॉफीचे भविष्य घडविण्यासाठी टाटासोबत भागीदारी करत आहोत. त्यात शेतकऱ्यांना पाठिंबा देणे, समुदायांना सक्षम करणे आणि आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाच्या ऑफर देणे समाविष्ट आहे. बीनपासून कपपर्यंत सर्वांना फायदा होईल अशी मजबूत, अधिक शाश्वत कॉफी परिसंस्था तयार करण्याप्रति दीर्घकालीन वचनबद्धता आहे.”
टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील डिसोझा म्हणाले, “मागील दशकात टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि स्टारबक्स यांनी संयुक्तरित्या भारतातील आघाडीची कॉफी संस्कृती आणि उद्योगाला आकार देण्यास मदत केली आहे. या नवीन उपक्रमाद्वारे आम्हाला स्टारबक्सच्या जागतिक कृषीशास्त्रातील ज्ञान भारतातील टाटाच्या पाऊलखुणांशी जोडून भारतातील जबाबदार कॉफी शेतीच्या भविष्यासाठी ठोस परिणाम घडवून आणताना आणि मार्ग मोकळा करताना आनंद होत आहे.”
वेगळ्या आणि सुंदर अनुभवांद्वारे स्टारबक्स कॉफी नेतृत्वाची हमी
स्टारबक्स कॉफी कंपनी आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स यांच्या संयुक्त उपक्रमाच्या रूपात २०१२ मध्ये स्थापना झाल्यापासून टाटा स्टारबक्स भारतातील ग्राहकांना अद्वितीय स्टारबक्स अनुभव देण्यासाठी समर्पित आहे. तिने भारताच्या सतत विकसित होणाऱ्या आणि गतिमान कॉफी संस्कृतीचा पाया रचला आहे. या आठवड्यात टाटा स्टारबक्स भारतातील आपल्या ५०० व्या कॉफीहाऊसचे उद्घाटन साजरे करेल. तो त्यांच्या वाढीच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा असून बाजारपेठेसाठी दीर्घकालीन वचनबद्धतेची खात्री देईल. स्टारबक्सच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपैकी एक म्हणून भारत कंपनीच्या धोरणात्मक आणि शाश्वत विस्ताराच्या योजनांमध्ये केंद्रस्थानी आहे. त्यात आपल्या भागीदारांसाठी (कर्मचाऱ्यांसाठी) रोजगार निर्मिती आणि अर्थपूर्ण विकासाच्या संधींवर सतत लक्ष केंद्रित केले जाते.
दिल्ली एनसीआरमध्ये स्टारबक्स रिझर्व्ह® कॉफीचा अनुभव देणारे हे ५०० वे कॉफीहाऊस असे दुसरे ठिकाण असेल, जे कॉफीप्रेमींना स्टारबक्स कॉफीची कला, वारसा आणि कथाकथनांचा एक तल्लीन करणारा अनुभव देईल. कॉफीहाऊस आणि त्याचा स्टारबक्स रिझर्व्ह® अनुभव उन्नत स्टोअर डिझाइन, हस्तनिर्मित पेये आणि स्थानिक पातळीवर प्रेरित नवसंशोधनाद्वारे भारताच्या कॉफी कारागिरीला पुढे नेण्याच्या टाटा स्टारबक्सच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो.
कुशल बॅरिस्टांनी हस्तनिर्मित केलेल्या उत्कृष्ट कॉफीचा आनंद घेण्यासाठी लोकांना एकत्र आणणआरे स्टारबक्सला एक स्वागतार्ह कॉफीहाऊस बनवण्याच्या जागतिक धोरणाचा एक भाग म्हणून टाटा स्टारबक्स भारतात एक वेगळा आणि अद्वितीय कॉफी अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करत राहील. ते ग्राहकांना आपल्या संपूर्ण विविध उत्पादनांच्या चवीचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करते – जगातील सर्वोत्तम कॉफी आणि उत्तम दर्जाची उत्पादने एका स्वागतार्ह कॉफीहाऊस वातावरणात सेवा देण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यामुळे ते भारताच्या कॉफी लँडस्केपचा एक प्रिय भाग बनले आहे.
टाटा स्टारबक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत दास म्हणाले, “भारतातील सर्वात मोठी स्पेशॅलिटी कॉफी कंपनी म्हणून आम्हाला एससीटीसीसोबत सहकार्याने शेतकऱ्यांसोबत भागीदारीचा अभिमान आहे. हे भारतातील कॉफी उत्पादक वर्गाला बळकटी देण्याच्या आणि उच्च-गुणवत्तेच्या अरेबिका कॉफीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल आहे. भारताप्रती आमची वचनबद्धता वाढीपलीकडे जाऊन शेतकरी, भागीदार (कर्मचारी) आणि ग्राहकांमध्ये गुंतवणूक करते आणि एक चैतन्यशील कॉफी संस्कृती निर्माण करते. आम्ही भारत आणि जगभरात सर्वोत्तम अरेबिका कॉफी देत राहणार असून स्टारबक्सची व्याख्या आमच्या उबदार, स्वागतार्ह अनुभवाद्वारे जिवंत करू.”
स्टारबक्स बद्दल
स्टारबक्स कॉफी कं…



