फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंडचा सर्वसमावेशक आरोग्यदायी उपक्रम - 'ओजस्य'
फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंडचा सर्वसमावेशक आरोग्यदायी उपक्रम - 'ओजस्य'

Posted BY:: ANAGHA, 13 NOVEMBER 2025 📞9004379946
~ उद्घाटन सत्राला अभिनेत्री तेजश्री प्रधानची उपस्थिती; महिलांमध्ये कर्करोग जागरूकता, प्रतिबंधात्मक तपासणी आणि सर्वांचे उत्तम आरोग्य याला प्राधान्य~
मुंबई, (NHI
@24): मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलने आज ओजस्य हा एक अनोखा आरोग्य उपक्रम सुरू केला, ज्याचा उद्देश प्रतिबंधात्मक आरोग्य, कर्करोगाचे लवकर निदान, मानसिक आरोग्य आणि जीवनशैलीवर आधारित रोग व्यवस्थापन याबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे. ‘आनंदी आयुष्यासाठी निरोगी महिला’ अशी थीम असलेल्या उद्घाटन सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री सुश्री तेजश्री प्रधान उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे जीवनाच्या सर्व टप्प्यांमध्ये महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व समोर आले.
या उपक्रमाच्या उद्घाटन सत्राने क्लिनिशियन, काळजीवाहक, महिला रुग्ण, समाजसेवक आणि समाजातील प्रमुखांना एका प्रेरणादायी मंचावर एकत्र आणले. या मंचाच्या साहाय्याने स्क्रीनिंग, सर्वायव्हरशिप आणि सपोर्टिव्ह केअर नेटवर्क्सबद्दल माहितीपूर्ण चर्चा करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. या सत्रानंतर पाचव्या मजल्यावर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कर्करोग सुविधेची माहिती देण्यात आली.
मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील मेडिकल ऑन्कोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमोल आखाडे या उपक्रमाबद्दल म्हणाले, “आयुष्याच्या विविध टप्प्यांवर, लोक त्यांच्या आरोग्यापेक्षा इतर जबाबदाऱ्यांपेक्षा जास्त महत्त्व देतात. हे लक्षात घेऊन ओजस्यच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक तपासणीबाबत सातत्यपूर्ण संवाद साधणे आणि सर्वांना वेळेवर आवश्यक ती कार्यवाही करण्यास प्रोत्साहित करणे हा आमचा हेतू आहे. जागरूकता आणि लवकर निदान कर्करोग आणि इतर दीर्घकालीन आजारांच्या परिणामांमध्ये लक्षणीय बदल घडवून आणू शकते. हे व्यासपीठ उपयुक्त माहिती, आवश्यक सहकार्य आणि सामुदायिक भावना सक्षम करेल.”
या कार्यक्रमात मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर्सनी मार्गदर्शन केले:
- ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. सोनल कुमटा यांनी रजोनिवृत्तीतून आत्मविश्वासाने मार्ग काढण्याबाबत मागदर्शन केले.
- ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यायाम आणि साहसी खेळांच्या भूमिकेवर इमर्जन्सी मेडिसिनचे संचालक डॉ. संदीप गोरे यांनी चर्चा केली.
- रेडिएशन ऑन्कोलॉजीच्या सल्लागार डॉ. दीपांजली आडुळकर यांनी तरुण महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि लवकर तपासणीचे महत्त्व यावर चर्चा केली.
- वैद्यकीय ऑन्कोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमोल आखाडे यांनी जागरूकता, वेळेवर निदान आणि सामूहिक पाठिंब्याने कर्करोगावर मात करण्याचे महत्त्व सांगितले.
याबाबतचा आपला दृष्टिकोन मांडताना सुश्री तेजश्री प्रधान म्हणाल्या, “कुटुंब आणि समुदायांच्या कल्याणासाठी महिलांचे आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ओजस्य सारख्या उपक्रमांमुळे महिलांना याची जाणीव होते, त्या त्याला प्रतिसाद देऊ शकतात तसेच स्वतःला प्राधान्य द्यायला शिकतात. आपली घेतली जात असलेली काळजी, वेळीच आलेली जागरूकता आणि कोणाची तरी सोबत असल्याचा आत्मविश्वास यामुळे आरोग्यावर अत्यंत सकारात्मक फरक पडतो. ज्ञान, शक्ती आणि स्वतःची काळजी घेण्याचे महत्त्व पटवून देत ते साजरे करणाऱ्या उपक्रमाचा भाग असल्याचा मला आनंद आहे.”
या उपक्रमाबद्दल मुलुंड फोर्टिस हॉस्पिटलचे सुविधा संचालक डॉ. विशाल बेरी म्हणाले,
“प्रतिबंधात्मक मानसिकता आणि सामाजिक सहभाग वाढवून उपचारांच्या पलीकडे जाण्याची आमची वचनबद्धता ओजस्य प्रतिबिंबित करते. शारीरिक, भावनिक आणि सामाजिक अशा सर्व मानसिकतेशी जुळणाऱ्या थीमसह हा मंच विकसित होत राहील. कायमस्वरूपी उपाय, एका वेळी एक संभाषण आणि एक कनेक्शन निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.”
ओजस्य उपक्रमा अंतर्गत दर तीन महिन्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. या प्रत्येक कार्यक्रमात प्रतिबंधात्मक ऑन्कोलॉजी, हार्मोनल आरोग्य, ताण व्यवस्थापन, पोषण, मानसिक आरोग्य आणि सर्वायव्हरशिप उपायासह संपूर्ण आरोग्याच्या प्रमुख पैलूंचा विचार केला जाईल.
—




