फ्लिपकार्टकडून डिलिव्हरीच्या ताफ्यात २०,००० इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश
फ्लिपकार्टकडून डिलिव्हरीच्या ताफ्यात २०,००० इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश
Posted BY:: ANAGHA, 06 NOVEMBER 2025 (9004379946)
● ७०% पेक्षा जास्त किराणा मालाची डिलिव्हरी आता इलेक्ट्रिक वाहनांद्वारे केली जाते. हे मेट्रो आणि टियर-२+ शहरांमध्ये वाढत्या ताफ्याचे प्रतिबिंब आहे.
● फ्लिपकार्टने मालवाहतुकीच्या लॉजिस्टिक्समध्ये ईव्ही व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी दिल्ली-जयपूर कॉरिडॉरवर लांब पल्ल्याचा इलेक्ट्रिक ट्रक पायलट प्रकल्प देखील सुरू केला आहे.
बंगळुरू (RMN)–: भारतातील देशांतर्गत ई-वाणिज्य बाजारपेठ असलेल्या फ्लिपकार्टने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) ताफ्यात २०,००० हून अधिक वाहने आणून एक नवीन टप्पा गाठला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. कंपनीच्या २०३० पर्यंत १००% इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा साध्य करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासात हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही वाढ फ्लिपकार्टच्या शाश्वत लॉजिस्टिक्समध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि ईव्ही इकोसिस्टममधील भागीदारांसोबतच्या वाढत्या सहकार्याचे प्रतिबिंब आहे.
विस्तारित ताफा आता दिल्ली, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि लखनऊसह प्रमुख महानगरे आणि टियर-२+ शहरांमध्ये कार्यरत आहे. द क्लायमेट ग्रुपच्या नेतृत्वाखालील ईव्ही१०० उपक्रमासाठी संस्थेच्या व्यापक वचनबद्धतेला ते समर्थन देते. या वाढीसोबतच फ्लिपकार्टनेच्या वापरास गती देण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यात लांब पल्ल्याचे ट्रक पायलट, संपूर्ण भारतात रोड शो, डिलिव्हरी भागीदारांसाठी डिजिटल प्रशिक्षण आणि ताफ्याच्या वापरातील अडथळ्यांना तोंड देण्यासाठी डेटावर आधारित दृष्टिकोन यांचा समावेश आहे.
सध्या फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर ७०% पेक्षा जास्त किराणा मालाची डिलिव्हरी ईव्हीद्वारे केली जाते. त्यामुळे जास्त घनता, जास्त वापर असलेल्या लॉजिस्टिक्समध्ये वाहनांची विश्वासार्हता दिसून येते आणि त्याचबरोबर प्लॅटफॉर्मचा कार्यरत कार्बन ठशात मोठी घट होते.
फ्लिपकार्ट ग्रुपचे मिनिट्स आणि पुरवठा साखळी, ग्राहक अनुभव आणि रिकॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत बद्री म्हणाले, “आम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणाऱ्या आमच्या २०,०००- ईव्हीच्या मजबूत ताफ्याचा प्रचंड अभिमान आहे. फ्लिपकार्टमध्ये आम्ही नेहमीच भविष्यात काय करायचे याचा विचार करतो. शाश्वत पुरवठा साखळी म्हणजे प्रत्येक टप्प्यात नावीन्य आणणे. दीर्घ पल्ल्याच्या मार्गांसाठी आमचा नवीन इलेक्ट्रिक ट्रक पायलट हा पुढचा टप्पा आहे. आम्ही भविष्यासाठी तयारी करत आहोत, हे सिद्ध करत आहोत की आमच्या पूर्तता केंद्रांपासून ग्राहकांच्या दारापर्यंत १००% विद्युतीकरण शक्य आहे.”
फ्लिपकार्टमधील शाश्वततेचे प्रमुख निशांत गुप्ता म्हणाले, “संपूर्णपणे इलेक्ट्रिक लॉजिस्टिक्स नेटवर्ककडे आमचा प्रवास तथ्य आणि वस्तुस्थिती या दोन्हींवर आधारित आहे. आमच्या ईव्ही फ्लीटचा विस्तार करणे अत्यंत महत्त्वाचे असून आम्हाला खात्री आहे की खरी प्रगती अशी परिसंस्था तयार करण्यात आहे जी कायमस्वरूपी ईव्हीचा वापर करण्यास सक्षम बनवेल. आमच्या इच्छाशक्तीला व्यवहारात आणण्यापासून ते पायाभूत सुविधा आणि उत्पादन डिझाइनमध्ये उद्योगातील भागीदारांशी सहयोग करण्यापर्यंत आम्ही ईव्हीचा वापर करण्यातील अडथळे दूर करण्यावर आणि समावेशक, दीर्घकालीन बदल घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. या संक्रमणाला गती मिळत असताना हे बदल प्रत्येक भागधारकाच्या गरजांना न्याय्य, सुलभ आणि प्रतिसाद देणारे असतील याची खात्री करणे ही आमची जबाबदारी आहे.”
लांब पल्ल्याच्या ईव्ही व्यवहार्यतेची चाचणी घेण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रक पायलटचे अनावरण
गोल्डन एरो लॉजिस्टिक्ससोबत भागीदारीत लांब पल्ल्याच्या लॉजिस्टिक्ससाठी पायलट प्रोग्राम हा फ्लिपकार्टच्या दिल्ली-जयपूर कॉरिडॉरवर रेट्रोफिटेड कल्याणी इलेक्ट्रिक ट्रकचा वापर करून शेवटच्या मैलाच्या डिलिव्हरीपर्यंत ईव्ही व्यवहार्यता शोधण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. मध्यम-अंतराच्या मालवाहतुकीत इलेक्ट्रिक ट्रकची व्यवहार्यता तपासण्यासाठी पायलटची रचना केली गेली आहे. त्यामुळे वाहनाची कामगिरी, ऊर्जेचा वापर आणि लागणारा वेळ समजू शकेल.
ईव्ही १००-नेतृत्वाखालील उपक्रमात संपूर्ण सहभाग आणि सहकार्य
ईव्हीच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि डिलिव्हरी नेटवर्कमध्ये त्याबद्दल आत्मविश्वास वाढवण्यासाठी फ्लिपकार्टने ओईएम भागीदार रिव्हॉल्ट आणि बजाज यांच्या सहकार्याने देशव्यापी ईव्ही रोड शो आयोजित केला. अनेक शहरांमध्ये आयोजित या उपक्रमामुळे इच्छुकांना ईव्ही मॉडेल्सची चाचणी घेणे, उपलब्ध चार्जिंग पर्याय समजून घेणे आणि बॅटरी कामगिरी आणि श्रेणीबद्दलच्या शंका दूर करणे शक्य झाले. तसेच फ्लिपकार्टने दिल्ली आणि मुंबईत खास ओईएम x लास्ट माईल एजन्सीज (एलएमए) कनेक्ट्सचे आयोजन केले होते. त्यात उत्पादक, फ्लीट ऑपरेटर आणि सेवा प्रदात्यांना पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा आणि वाहन तयारी यावर खुल्या, उपायकेंद्री चर्चा करण्यासाठी एकत्र आणले गेले. त्यामुळे मजबूत परिसंस्थेची रचना आणि भविष्यातील वचनबद्धतेचा पाया रचला गेला.
डिजिटल लर्निंग आणि ज्ञानावर आधारित हस्तक्षेपांद्वारे कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण
ईव्हीमधील बदलात आपल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी फ्लिपकार्टने विशमास्टर डिजिटल कॅम्पेन सुरू केले. हा एक परस्परसंवादी लर्निंग प्लॅटफॉर्म असून त्यातून डिलिव्हरी भागीदारांना ईव्ही१००ची उद्दिष्टे, वाहन ऑपरेशन्स, चार्जिंग पद्धती आणि शाश्वततेसंबंधी फायद्यांबद्दल शिक्षित केले जाते. ही मोहीम वेगवेगळ्या ठिकाणी आणि परिस्थितीत ईव्ही कामगिरीबद्दलचे सामान्य गैरसमजही दूर करते. फ्लिपकार्टने ५४१० हून अधिक कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे की त्यांच्यामध्ये ईव्हीबद्दलची सकारात्मकरित्या वाढत आहे. सुमारे अर्धे लोक ईव्हीचा वापर करण्यास उत्सुक आहेत. तथापि, परवडणाऱ्या दरातील कर्जासारखी आव्हाने अजूनही अडथळा आहेत.
स्वच्छ गतिशीलतेवर उद्योग-व्यापी सहकार्याला चालना देताना फ्लिपकार्टने आपल्या ऑपरेशन्समध्ये शाश्वतता आणण्याच्या सततच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित केले आहे. कंपनी इलेक्ट्रिक वाहने आणि इकोसिस्टम तयारीवर आपले लक्ष केंद्रित करत असताना भारताच्या हरित पुरवठा साखळीकडे संक्रमणाला समर्थन देणारे दीर्घकालीन, समावेशक उपाय सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहे.
फ्लिपकार्ट ग्रुपबद्दल
फ्लिपकार्ट ग्रुप हा भारताच्या आघाडीच्या डिजिटल वाणिज्य आस्थापनांपैकी एक असून त्यांच्याकडे फ्लिपकार्ट, मिंत्रा, फ्लिपकार्ट होलसेल, क्लिअरट्रिप आणि सुपर.मनी अशा कंपन्यांचे जाळे आहे.
फ्लिपकार्टची स्थापना २००७ साली झाली. त्यांनी लाखो विक्रेते, व्यापारी आणि लघु उद्योगांना भारताच्या डिजिटल वाणिज्य क्रांतीत सहभागी होण्यासाठी सक्षम केले आहे. फ्लिपकार्टच्या मार्केटप्लेसवर ५०० दशलक्षपेक्षा अधिक नोंदणीकृत ग्राहक आहेत आणि ८०+ वर्गवारींमध्ये १५० दशलक्षपेक्षा अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. आज या प्लॅटफॉर्मवर शॉप्सी विक्रेत्यांसह १.४ दशलक्षपेक्षा जास्त विक्रेते आहेत. भारतीयांना तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेद्वारे मौल्यवान अनुभव देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचा व आनंद देण्याचा वसा घेतलेल्या फ्लिपकार्टने उद्योजकांच्या तसेच एमएसएमईंच्या अनेक पिढ्यांचे सबलीकरण करून हजारो रोजगार निर्माण केले आहेत. फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी, नो कॉस्ट ईएमआय, ईझी रिटर्न्स आणि यूपीआयसारख्या सेवा सुरू केल्या आहेत. या ग्राहककेंद्री नावीन्यपूर्ण गोष्टींमुळे सर्व ग्राहकांना डिजिटल पेमेंट उत्पादनांचा लाभ मिळतो आणि लाखो भारतीयांना ऑनलाइन खरेदी परवडणाऱ्या दरात सहजसाध्य होते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा media@flipkart.com


