टॉप न्यूज़महाराष्ट्र

एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) खुली होणार ११ नोव्हेंबर रोजी

एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) खुली होणार ११ नोव्हेंबर रोजी

POSTED BY: ANAGHA, 06 NOVEMBER 2025 📞 9004379946

  • एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर लिमिटेड या कंपनीच्या आयपीओसाठी प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा किंमतपट्टा २०६ ते २१७ रुपये इतका निश्चित.
  • अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख : सोमवार, १० नोव्हेंबर २०२५
  • बोली / प्रस्ताव उघडण्याची तारीख : मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५
  • बोली / प्रस्ताव बंद होण्याची तारीख : गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५
  • गुंतवणूकदारांना किमान ६९ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ६९ समभागांच्या पटीत बोली लावता येईल.
  • रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसची (आरएचपी) लिंक : https://www.jmfl.com/Common/getFile/5369

MUMBAI(NHI@24) : एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या मंगळवारी, दि. ११ नोव्हेंबर सुरू होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओमधील बोली प्रक्रिया एक कामकाजाच्या दिवस आधी, म्हणजे सोमवार, दि. १० नोव्हेंबर रोजी होईल. बोली प्रक्रिया बंद होण्याची तारीख गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५ आहे.

या आयपीओसाठी प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा २०६ ते २१७ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान ६९ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ६९च्या पटीत बोली लावता येईल.

आयपीओच्या या प्रस्तावामध्ये एकूण २१,४३८.६२ दशलक्ष (२,१४३.८६ कोटी) रुपयांच्या नवीन इक्विटी समभागांच्या विक्रीचा समावेश आहे, तसेच मंजुनाथा डोंथी वेंकटारथ्नैया आणि शुभा मंजुनाथा डोंथी (प्रवर्तक विक्री भागधारक) या विद्यमान भागधारकांकडील ७,५६१.३८ दशलक्ष (७५६.१४ कोटी) रुपयांच्या समभागांची विक्री (ऑफर फॉर सेल) केली जाणार आहे.

एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर ही कंपनी मुख्यतः सौर मॉड्यूलची उत्पादक आहे. क्रिसिलच्या अहवालाप्रमाणे, ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या उत्पादन क्षमतेनुसार, एकात्मिक सौर फोटोव्होल्टाइक (पीव्ही) मॉड्यूल आणि सौर सेल यांचे उत्पादन करणारी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे, तसेच देशातील अग्रगण्य सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादकांपैकी ती एक आहे. ३० जून २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार कंपनीकडे ७.८० गिगावॅट्स इतकी सौर पीव्ही मॉड्यूल्सच्या उत्पादनाची क्षमता आणि २.९४ गिगावॅट्स इतकी सौर सेलच्या उत्पादनाची क्षमता आहे. या क्षेत्रात कंपनीला १८ वर्षांहून अधिक कामकाजाचा अनुभव आहे. तसेच, ही कंपनी भारतातील उच्च कार्यक्षम “टनेल ऑक्साइड पॅसिव्हेटेड कॉन्टॅक्ट” (टीओपीकॉन) तंत्रज्ञानाचा अवलंब करून सौर सेल निर्मिती सुरू करणाऱ्या पहिल्या काही कंपन्यांपैकी एक आहे. मार्च २०२५ पर्यंत या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या मोजक्या भारतीय सौर सेल उत्पादकांमध्ये ही कंपनी गणली जाते (स्त्रोत: क्रिसिल अहवाल).

ही प्राधमिक समभाग विक्री प्रक्रिया सेबीच्या आयसीडीआर नियमनातील कलम ६(२) नुसार बुक बिल्डिंग पद्धतीद्वारे केली जात आहे. या नियमानुसार आणि कलम ३२(१) च्या तरतुदीनुसार, एकूण प्रस्तावित समभागांपैकी किमान ७५ टक्के भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी क्यूआयबी प्रमाणानुसार वाटपासाठी राखीव असेल. कंपनीला आपल्या बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) यांच्या सल्ल्यानुसार, या क्यूआयबी भागातील कमाल ६० टक्के हिस्सा अँकर गुंतवणूकदारांना त्यांच्या निवडीप्रमाणे वाटप करण्याचा अधिकार आहे. या अँकर गुंतवणूकदार भागामधील किमान एकतृतीयांश हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल, त्याकरीता अशा फंडांकडून अँकर गुंतवणूकदार वाटप किंमतीइतकी किंवा त्याहून जास्त किंमतीची बोली यावी लागेल. जर अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव भागात पूर्ण मागणी नसेल किंवा काही समभागांचे वाटप झाले नसेल, तर उरलेले समभाग नेट क्यूआयबी भागामध्ये समाविष्ट केले जातील.

तसेच, नेट क्यूआयबी भागातील ५ टक्के हिस्सा केवळ म्युच्युअल फंडांसाठी प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. उर्वरित नेट क्यूआयबीचा हिस्सा सर्व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (अँकर गुंतवणूकदार वगळता), त्यामध्ये म्युच्युअल फंडांचा समावेश करून, प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. याकरीता त्यांनी प्रस्तावित किमतीइतकी किंवा त्याहून अधिक किंमतीची बोली लावायला हवी. जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी नेट क्यूआयबी भागाच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्या न वापरलेल्या समभागांचा शिल्लक भाग उर्वरित क्यूआयबी भागात समाविष्ट करून सर्व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना प्रमाणानुसार वाटप केला जाईल. याव्यतिरिक्त, एकूण प्रस्तावित समभागांपैकी कमाल १५ टक्के हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एनआयबी) उपलब्ध असेल. या एनआयबी भागातील (अ) एकतृतीयांश हिस्सा ०.२० लाखांपेक्षा जास्त आणि १.०० लाखांपर्यंत अर्ज आकार असलेल्या गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल; आणि (ब) दोनतृतीयांश हिस्सा ₹१.०० लाखांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. या दोन्ही उपविभागांपैकी कोणत्याही विभागात मागणी कमी राहिल्यास, न वापरलेले समभाग सेबीच्या आयसीडीआर नियमानुसार दुसऱ्या उपविभागातील गुंतवणूकदारांना वाटप केले जाऊ शकतात. तसेच, एकूण प्रस्तावातील कमाल १० टक्के हिस्सा रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. त्याकरीता त्यांनी प्रस्तावित किमतीइतकी किंवा त्याहून जास्त किंमतीची वैध बोली केलेली असावी.

अँकर गुंतवणूकदार वगळता सर्व अर्जदारांना त्यांच्या एएसबीए (अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट) खात्याचे तपशील देऊन ही प्रक्रिया अनिवार्यपणे वापरणे आवश्यक आहे. यूपीआय पद्धतीने पैसे भरणाऱ्या अर्जदारांनी त्यांच्या यूपीआय आयडीची माहिती द्यावी, ज्याद्वारे संबंधित रक्कम एससीएसबी (सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बॅंक्स) किंवा यूपीआय प्रणालीमार्फत गोठवली जाईल. ही रक्कम प्रस्तावात सहभागासाठी राखून ठेवली जाईल. अँकर गुंतवणूकदारांना प्रस्तावातील अँकर गुंतवणूकदार भागामध्ये एएसबीए प्रक्रियेद्वारे सहभागाची परवानगी नाही.

कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) दोन्ही शेअर बाजारांमध्ये सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

जेएम फायनान्शिअल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे नाव आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड), जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

या निवेदनात परिभाषित न केलेले सर्व शब्द रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेल्या अर्थानुसारच ग्राह्य धरले जातील.

Disclaimer:

EMMVEE PHOTOVOLTAIC POWER LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the RHP with RoC and the Stock Exchanges on November 5], 2025. The RHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, and is available on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.emmveepv.com and the websites of the BRLMs, i.e., JM Financial Limited, IIFL Capital Services Limited (formerly known as IIFL Securities Limited), Jefferies India Private Limited and Kotak Mahindra Capital Company Limited at www.jmfl.com, www.iiflcapital.com, www.jefferies.com and https://investmentbank.kotak.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see ‘‘Risk Factors’’ beginning on page 31 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges, and should instead rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved, for making any investment decision. The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the “U.S. Securities Act”) or any state securities laws in the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (i) within the United States only to persons reasonably believed to be “qualified institutional buyers” (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act and referred to in the Red Herring Prospectus as “U.S. QIBs”) pursuant to the private placement exemption set out in Section 4(a) of the U.S. Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales are made. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be offered or sold, and Bids may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction. There will be no public offering in the United States.

 

एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) खुली होणार ११ नोव्हेंबर रोजी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!