खेल

एलआयसी-आयडियल चषक बुध्दिबळ स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून

एलआयसी-आयडियल चषक बुध्दिबळ स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून

Posted BY:: ANAGHA, 10 NOVEMBER 2025, (9004379946)

   (MUMBAI-NHI@24) : बाल दिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा १५ नोव्हेंबरला आणि सर्वांसाठी खुली बुध्दिबळ स्पर्धा १६ नोव्हेंबर रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. १४ वर्षाखालील मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेसाठी एकूण १२० पुरस्कार असून खुल्या बुध्दिबळ स्पर्धेसाठी एकूण २५ रोख पुरस्कारांसह प्रथम पुरस्कार रोख रुपये पाच हजारसह आकर्षक एलआयसी-आयडियल चषक आहे. तसेच खुल्या स्पर्धेतसुध्दा १३ वर्षाखालील विविध वयोगटासाठी विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत.

मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने ही स्पर्धा येत्या शनिवारी ७/८/१०/११/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या ६ वयोगटात स्विस लीग पध्दतीच्या किमान ४ साखळी फेऱ्यांमध्ये तर खुल्या गटाची बुध्दिबळ स्पर्धा येत्या रविवारी स्विस लीग पध्दतीच्या किमान ७ साखळी फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे स्पर्धकांना बुध्दिबळ पट व घड्याळ दिले जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे व्हॉटसअॅपवर १२ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!