Uncategorized

दत्तात्रय उतेकर गौरवार्थ बुध्दिबळ स्पर्धेत जैन, राठोड, शेट्टीची विजयीदौड

दत्तात्रय उतेकर गौरवार्थ बुध्दिबळ स्पर्धेत जैन, राठोड, शेट्टीची विजयीदौड

POSTED BY: MRUNALI, 08 NOVEMBER 2025 📞 8850212023

MUMBAI : NHI:-आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप, आरएमएमएस व सरस्वती हायस्कूल वर्गमित्र मंडळ आयोजित सुवर्णपदक विजेते वर्ल्ड मास्टर पॉवर लिफ्टर दत्तात्रय उतेकर गौरवार्थ १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पधेत कृषीव जैन, देवांश राठोड, अद्विक शेट्टी, राज गायकवाड, गोकर्ण औटी, धैर्य बिजल्वान, कैवल्य परब, आराध्य पुरो, अर्णव जगताप आदींनी विजयीदौड केली. दुसऱ्या साखळी फेरीत कृषीव जैनने हत्तीच्या आक्रमक चाली रचत अब्दुल शेखच्या राजाला २४ व्या चालीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्यीत परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये १४ वर्षाखालील गटात देवांश राठोडने शार्दुल रेडकरला वजिराच्या सहाय्याने शह देत ३५ व्या चालीला विजय मिळविला. अन्य सामन्यात अद्विक शेट्टीने मैत्रेयी बेराचा, राज गायकवाडने राजवीर चव्हाणचा, गोकर्ण औटीने वाकुल बेठीचा, धैर्य बिजल्वानने मोहमद अन्सारीचा, कैवल्य परबने आरव कदमचा, आराध्य पुरोने नैतिक पालकरचा तर अर्णव जगतापने सुजय सावंतचा पराभव करून एक गुण वसूल केला. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले, सत्कारमूर्ती दत्तात्रय उतेकर, कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व अनंत चाळके आदींनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्यातील फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह एकूण १२२ खेळाडूंमध्ये परेल येथील आरएमएमएस सभागृहात चुरशीच्या लढती सुरु आहेत.

Dominant displays and close contests mark Dream Sports-MSSA U-12 Boys Division IV action

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!