खेल

बीओबी टेबल टेनिस स्पर्धेत शुभ्रदिता, कुलदीप विजेते

बीओबी टेबल टेनिस स्पर्धेत शुभ्रदिता, कुलदीप विजेते

POSTED BY:ANAGHA, 06 NOVEMBER 2025 (9004379946)

MUMBAI (NHI@24):     बँक ऑफ बडोदा-बीओबी मुंबई विभागीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धेमध्ये शुभ्रदिता करमरकरने महिला गटात तर कुलदीप वार्ष्णेयने पुरुष गटात विजेतेपद पटकाविले. महिलांच्या अंतिम फेरीत बिगरमानांकित शुभ्रदिता करमरकरने द्वितीय मानांकित कविता राणाला ११-१, ११-७ असे नमवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. परिणामी कविता राणाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरोशे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी विजेत्या-उपविजेत्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेला आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभले होते.

वायएमसीए-ग्रँट रोड येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या बीओबी टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम मानांकित कुलदीपने अभिजित सोनावणेचे आव्हान ११-४, ११-५ असे संपुष्टात आणून अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत कुलदीपने मोहित शुक्लाचा ११-३, ११-७ असा आणि अभिजित सोनावणेने आशिष दवेचा ११-७, ११-१ असा तर महिला गटात शुभ्रदिता करमरकरने मस्तूद प्रार्थनाचा ११-४, ११-५ असा आणि कविता राणाने कृतिका अग्रवालचा ११-५, १०-१२, १२-१० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. पहिल्या चार क्रमांकाचे टेबल टेनिसपटू राष्ट्रीय स्तरावरील आंतर विभागीय बीओबी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय पुरुष व महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!