जॉन्सन’स बेबीने सादर केले नवे ब्रँडिंग, सुधारित फॉर्म्युलेशन्स आणि शाश्वत पॅकेजिंग: बेबीसाठी उत्तम, आईसाठी उत्तम आणि आपल्या सृष्टीसाठी उत्तम
बेबीसाठी उत्तम, आईसाठी उत्तम आणि आपल्या सृष्टीसाठी उत्तम

Posted BY:: ANAGHA, 14 NOVEMBER 2025 📞9004379946
दररोजच्या नात्याच्या क्षणांचा उत्सव आणि हे क्षण साकारण्यातील जॉन्सन’स बेबीची भूमिका साजरी करत अनिल आणि सोनम कपूर यांच्या सहकार्याने ‘इट्स प्युअर लव्ह’ जाहिरात मोहिमेची सुरुवात

कॅम्पेन फिल्म लिंक
: https://youtu.be/7o3g1i7XnjE
राष्ट्रीय, – पालकत्वाची दुनिया बदलली आहे. आजचे पालक आपल्या लहानग्यांसाठी अधिक माहितीपूर्ण आणि विचारपूर्वक निर्णय घेत आहेत. व्यस्त जीवनातसुद्धा आंघोळ आणि मसाजसारखे दररोजचे क्षण अजूनही जपले जातात कारण ते बंध मजबूत करतात. नव्या युगातील पालकांच्या बदलत्या गरजांना उत्तर देत आणि बाळाची कोवळी त्वचा व केसांचे संरक्षण करत या स्नेहबंधाच्या क्षणांना अधिक समृद्ध आणि सुरक्षित करण्यासाठी जगातील पहिल्या क्रमांकाचा बेबी केअर ब्रँड जॉन्सन’स बेबी आपल्या संपूर्ण श्रेणीमध्ये सुधारित स्किन-सायन्सवर आधारित फॉर्म्युलेशन्स आणि शाश्वत पॅकेजिंग सादर करत आहे.
या स्नेहपूर्ण क्षणांचा उत्सव साजरा करत “Protect what’s precious” (जे मौल्यवान आहे ते जपायलाच हवं) या आपल्या आश्वासनावर ठाम राहून जॉन्सन’स® बेबी अनिल आणि सोनम कपूर यांच्यासह ‘इट्स प्युअर लव्ह’ ही जाहिरात मोहीम सादर करत आहे.
बेबीसाठी उत्तम: बेबीच्या त्वचेसाठी तयार केलेले सुधारित फॉर्म्युलेशन्स
130 वर्षांहून अधिक काळापासून, जॉन्सन’स बेबीने बाळाच्या त्वचेच्या विज्ञानावर आधारित बेबीसाठी सर्वोत्तम उत्पादने तयार केली आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत, जॉन्सन’स बेबीने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीतही बाळाच्या त्वचेचे अधिक प्रभावी रक्षण होईल या दृष्टीने आपली संपूर्ण श्रेणी सुधारित केली आहे. प्रत्येक उत्पादन आपल्या लाडक्या जॉन्सन’स सुगंधासह बेबीच्या कोवळी त्वचा, केस आणि डोळ्यांच्या नैसर्गिक कोमलतेचे रक्षण करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केले आहे.
नवीन श्रेणीची वैशिष्ट्ये:
* 100% डॉक्टरांनी प्रमाणित केलेली हळुवार, कोमल फॉर्म्युलेशन्स. एलोवेरा (कोरफड), विटामीन B5, दूध प्रोटीन, हळद यांसारख्या बाळाच्या त्वचेला पोषण देणाऱ्या नैसर्गिक घटकांनी समृद्ध.
* अधिक सुरक्षा : नवीन मॉइश्चरायझिंग श्रेणी 72 तासांपर्यंत आर्द्रता टिकवते, तर जॉन्सन’स बेबी साबण जंतू, कोरडेपणा आणि जळजळपणा याविरुद्ध तिहेरी संरक्षण प्रदान करते.
आईसाठी उत्तम:
सुधारित फॉर्म्युलेशन्स आईंना आपल्या बाळाच्या त्वचेचे अधिक चांगले रक्षण करण्यात मदत करतात आणि त्याचबरोबर दररोजच्या काळजी व स्नेहाच्या क्षणांना अधिक आनंददायी बनवतात.
जॉन्सन’स बेबीचे नव्या स्वरूपातील पॅकेजिंग उत्पादनातील प्रमुख घटक आणि फायदे पॅकच्या समोर दर्शवते. त्यामुळे पालकांना माहितीपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते. प्रथमच, जॉन्सन’स बेबीने प्रेम, काळजी आणि संरक्षणाचे प्रतीक असलेला ‘द आयकॉनिक ड्रॉप’ हा नवीन ब्रँड मॅस्कॉट सादर केला आहे आणि तो विविध माध्यमांवर दिसणार आहे.
पर्यावरण उत्तम:
या परिवर्तनासह, जॉन्सन’स बेबी शाश्वततेच्या दिशेनेही अर्थपूर्ण पावले उचलत आहे. नवीन बॉटल्स 50% पोस्ट कन्झ्युमर रीसायकल्ड (PCR) प्लास्टिकपासून बनवल्या आहेत. त्यामुळे जबाबदार पुनर्वापरास प्रोत्साहन मिळते. यातून ब्रँडची केवळ आजच्या बाळांसाठीच नव्हे, तर ते ज्या जगाचा वारसा पुढे नेणार आहेत त्या जगासाठीही काळजी घेण्याची बांधिलकी दिसून येते.
“इट्स प्युअर लव्ह” मोहिमेसह दररोजच्या या अमूल्य क्षणांचा उत्सव
आपल्या नव्या वचनाला वास्तवात आणण्यासाठी, जॉन्सन’स बेबीने अनिल कपूर आणि सोनम कपूर यांच्या प्रमुख भूमिकेत नवीन कॅम्पेन फिल्म ‘इट्स प्युअर लव्ह’ सादर केली आहे. ही फिल्म एका आई आणि तिच्या बेबीमधील ‘शुद्ध प्रेमा’ च्या छोट्या, दररोजच्या क्षणांचा उत्सव साजरा करते. एफसीबी ग्रुप इंडिया यांनी संकल्पित केलेली आणि फ्लिरटिंग व्हिजन यांनी निर्मिती केलेली ही जाहिरात आईच्या स्पर्शाची आणि तिच्यासाठी सर्वात अमूल्य असलेल्या तिच्या बेबीसाठीच्या जपणुकीतील जॉन्सन’स बेबीची भूमिका यांची जाणीव करून देते. ही कॅम्पेन दूरचित्रवाणी, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, सोशल मीडिआ, इन्फ्लुएंसर कोलॅबोरेशन्स आणि ऑन-ग्राउंड उपक्रमांद्वारे व्यापकपणे प्रसारित केली जाईल.
नव्या जाहिरात मोहिमेविषयी बोलताना केनव्ह्यूचे विपणन उपाध्यक्ष आणि अत्यावश्यक आरोग्य आणि त्वचा आरोग्य बिझनेस युनिट प्रमुख मनोज गाडगीळ म्हणाले, “जेव्हा बेबी जन्माला येते तेव्हा प्रत्येक आईने मनोमन एक वचन दिलेले असते. आणि ते म्हणजे आपल्या बेबीचे पहिल्या दिवसापासून रक्षण करण्याचे. हे वचन तिच्या प्रत्येक कृतीत, मोठ्या निर्णयांपासून छोट्या दैनंदिन सवयींपर्यंत दिसून येते. अनेक पिढ्यांपासून आमची उत्पादने या दैनंदिन क्षणांना आनंद आणि काळजी घेण्याच्या क्षणांमध्ये रूपांतरित करण्याची अर्थपूर्ण भूमिका निभावत आली आहेत आणि आई-बेबीच्या नात्याला अधिक दृढ केले आहे. ‘इट्स प्युअर लव्ह’ या आमच्या नव्या ब्रँड मोहिमेद्वारे आम्ही या क्षणांचे दर्शन घडवतो आणि सुधारित फॉर्म्युलेशन्स व शाश्वत पॅकेजिंगसह मातांना साथ देण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळकट करतो. जॉन्सन’स बेबीमध्ये आम्ही नेहमीच आईंसाठी सर्वाधिक मौल्यवान असलेल्या त्यांच्या बेबीचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या सोबत उभे राहू.”
या मोहिमेबद्दल बोलताना ब्रँड अॅम्बेसेडर अनिल कपूर म्हणाले, “‘इट्स प्युअर लव्ह’ मोहिमेचा भाग होणे माझ्यासाठी अतिशय खास अनुभव आहे – केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर एक वडील म्हणूनही. पालक आणि मुलामधील बंध हे प्रेमाचे सर्वात शुद्ध रूप आहे आणि ही मोहीम त्या भावनेला अतिशय सुंदरपणे पकडते. जॉन्सन’स बेबी आमच्या कुटुंबाचा अनेक पिढ्यांपासून एक भाग राहिले आहे आणि सतत विकसित होत असताना देखील आपल्या मूलभूत मूल्यांशी प्रामाणिक राहणाऱ्या या ब्रँडशी जोडले जाण्याचा मला अभिमान आहे.”
एक आई आणि जॉन्सन’स बेबीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून आपला अनुभव सांगताना सोनम कपूर म्हणाली, “आई म्हणून मी माझ्या बाळासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय प्रेम आणि संरक्षणाच्या भावनेतून येतो. बेबीसोबतच्या रोजच्या दैनंदिन गोष्टी जसे की मसाज, आंघोळ, आंघोळीनंतरची काळजी हे सर्व बंध निर्माण करणारे जादुई, आनंददायी आणि ‘Pure Love म्हणजेच शुद्ध प्रेमाने’ परिपूर्ण क्षण असतात. जॉन्सन’स बेबीने या भावनेला ज्या सुंदरतेने पकडले आहे ते खरोखरच अद्भुत आहे. जॉन्सन’स बेबीच्या या नव्या जाहिरात मोहिमेचे शूटिंग करताना मला खूप आनंद मिळाला. मग ते रिअल लाईफ असो वा रील लाईफ, बेबीसोबतचा बंध हा अमूल्य आणि ‘Pure Love’चाच एक भाग आहे.”
आजच्या कुटुंबांच्या बदलत्या गरजांना आधार देत आपल्या परंपरेचा सन्मान राखत सुरु असलेले हे सादरीकरण जॉन्सन’स बेबीसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात दर्शवते.



