#मीपणअहिल्या”: अमृता खानविलकरचा राज्यव्यापी चळवळीला पाठिंबा
अमृता खानविलकरचा राज्यव्यापी चळवळीला पाठिंबा

Posted BY:: ANAGHA, 16 NOVEMBER 2025 📞 9004379946
ठाणे, (NHI@24)-ZEE5 ची मराठी ओरिजिनल मालिका बाई तुझ्यापायी ही केवळ लोकांच्या हृदयाला भिडलेली कथा नाही, तर तिने एक सामाजिक चळवळ निर्माण केली आहे. या मालिकेत दाखवलेली अहिल्याची धैर्याची आणि प्रश्न विचारण्याची प्रवासकथा आता महाराष्ट्रात मासिक पाळीवरील कलंक आणि लैंगिक असमानतेविरोधात चर्चा सुरू करण्याचे कारण ठरली आहे.
#मीपणअहिल्या या मोहिमेद्वारे ZEE5 ने कलाकार, प्रभावशाली व्यक्ती, विद्यार्थी आणि नागरिकांना एकत्र आणले — अहिल्याचा साधा पण ताकदवान प्रश्न “का?” (Why?) पुन्हा विचारण्यासाठी. जे एका मालिकेतून सुरू झाले, ते आता वास्तवातील चळवळ बनले आहे — लोकांनी आपल्या लाल तळहातांनी ऐक्य आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून आवाज उठवला आहे, मौन आणि लज्जेविरुद्ध.
या मोहिमेने सर्जनशीलतेचा वापर रस्त्यांवर आणि स्क्रीनपलीकडेही केला. डोंबिवलीतील कॉलेज थिएटर ग्रुप्सनी हृदयस्पर्शी स्ट्रीट प्ले सादर केले, आणि प्रत्येक नाटकाच्या शेवटी प्रेक्षकांनी लाल तळहात उंचावले — सार्वजनिक ठिकाणे संवाद आणि परिवर्तनाचे व्यासपीठ बनली.
ऑनलाईन देखील या चळवळीने वेग घेतला. अमृता खानविलकर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात मराठी कलाकार आणि 100 हून अधिक इन्फ्लुएन्सर्सनी सोशल मीडियावर अहिल्याचा संदेश पुढे नेला — ज्यामुळे #मीपणअहिल्या मोहिमेने जागरूकता आणि एकतेची लाट निर्माण केली.
या मोहिमेबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना अमृता खानविलकर म्हणाल्या, “अहिल्याची कथा मला अतिशय भावली — अंधश्रद्धेला प्रश्न विचारण्याचे तिचे धैर्य आणि शिक्षण मिळविण्याची तिची चिकाटी असंख्य महिलांच्या स्वप्नांचा आणि संघर्षाचा आवाज आहे. बाई तुझ्यापायी ही केवळ तिची कथा सांगत नाही, तर ती आपल्यामध्ये काहीतरी जागं करते — उभं राहण्याचं, बोलण्याचं, आणि बदल शक्य आहे यावर विश्वास ठेवण्याचं सामर्थ्य. #मीपणअहिल्या ही चळवळ वाढत असताना, मी प्रत्येक त्या स्त्रीसोबत उभी आहे जी मौनाऐवजी सबलीकरणाची निवड करते — माझा लाल तळहात उंचावत मी अभिमानाने सांगते, #मीपणअहिल्या.”
भावनिक कथाकथन आणि सामाजिक परिणाम यामुळे बाई तुझ्यापायी ही मालिका मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रभर संवाद, धैर्य आणि परिवर्तनाची प्रेरणा बनली आहे.
~ बाई तुझ्यापायी पाहा, फक्त ZEE5 मराठीवर ~




