क्रॉम्प्टनने ४०,००० हून अधिक घरांसाठी ४४५ कोटी रूपयांची मोठी सोलार रूफटॉप ऑर्डर मिळवली
क्रॉम्प्टनने ४०,००० हून अधिक घरांसाठी ४४५ कोटी रूपयांची मोठी सोलार रूफटॉप ऑर्डर मिळवली

POSTED BY: MRUNALI, 28 Octomber 2025 (8850212023)
मुंबई, (NHI@24): क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल लिमिटेड या घर व ऊर्जा सोल्यूशन्समधील विश्वसनीय आघाडीच्या कंपनीने आपल्या सोलार प्रवासामध्ये मोठा टप्पा संपादित केला आहे, जेथे आंध्रप्रदेश राज्यामध्ये मोठी सोलार रूफटॉप ऑर्डर मिळवली आहे. या ऑर्डरअंतर्गत जवळच्या काळात ४०,००० हून अधिक घरांमध्ये २ किलोवॅट ऑन-ग्रिड रूफटॉप यंत्रणा बसवत सौर ऊर्जा प्रदान करण्यात येईल, जेथे एकूण करार मूल्य ४४५ कोटी रूपये आहे.
४४५ कोटी रूपये मूल्य असलेला हा सर्वात मोठा ७७ मेगावॅट प्रकल्प क्रॉम्प्टनची आतापर्यंतची सर्वात मोठी सोलार रूफटॉप ऑर्डर आहे, ज्यामधून सोलार रूफटॉप बाजारपेठेत प्रवेश केल्याच्या अवघ्या दोन महिन्यांमध्ये कंपनीची झपाट्याने प्रगती दिसून येते. या महिन्याच्या सुरूवातीला मिळालेल्या ५२ कोटी रूपयांच्या ऑर्डरसह या नवीन ऑर्डरमधून क्रॉम्प्टनचे प्रबळ बाजारपेठ आकर्षण, अंमलबजावणी क्षमता आणि सोलार श्रेणीमध्ये विकासाला गती देण्याप्रती क्षमता दिसून येते.
सोलार रूफटॉप श्रेणी जवळपास २०,००० कोटी रूपये ते २५,००० कोटी रूपयांपर्यंतची मोठी आणि वाढती बाजारपेठ आहे, जी दरवर्षाला २० टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. वाढत्या निवासी अवलंबनाला सुधारित तंत्रज्ञान, किफायतशीरपणा, सोपे ग्रिड एकीकरण, वाढती जागरूकता आणि यंत्रणा खर्चांमध्ये घट या पैलूंनी गती दिली आहे, ज्यामुळे क्रॉम्प्टनकरिता घराघरांमध्ये शाश्वत ऊर्जा सोल्यूशन्स वाढवण्याची प्रबळ संधी निर्माण झाली आहे.
या ऑर्डरबाबत मत व्यक्त करत क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रोमीत घोष म्हणाले, ”४४५ कोटी रूपयांची ही मोठी सोलार रूफटॉप ऑर्डर नवीकरणीय ऊर्जेमधील क्रॉम्प्टनच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामधून भारताच्या शुद्ध ऊर्जा महत्त्वाकांक्षांशी संलग्न असलेले मोठ्या प्रमाणात शाश्वत सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती आमच्या क्षमतेमधील वाढता विश्वास दिसून येतो.



