युवा'च्या 'माय बाप्पा वर्कशॉप'मुळे भारतभरातील ८०+ शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित
युवा'च्या 'माय बाप्पा वर्कशॉप'मुळे भारतातील ८०+ शाळांमधील विद्यार्थ्यांत उत्साह

Posted By ANAGHA, 9 September2025
~ खास तयार केलेल्या किट्सचा वापर करून विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाला साजेशा कलाकृती साकारल्या ~
मुंबई,(NHI.COM) : गणेशोत्सवाच्या मंगलप्रसंगी नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या ‘युवा’ या स्टेशनरी विभागाने विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘माय बाप्पा वर्कशॉप‘चे देशभरातील ८०हून अधिक शाळांमध्ये आयोजन केले. या विधायक उपक्रमात ‘युवा‘ने खास तयार केलेल्या किट्सच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी अनोख्या कलाकृती साकारत परंपरा आणि संस्कृतीला सर्जनशीलतेची जोड देत गणेशभक्तीचा उत्सव साजरा केला.
‘युवा’तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’या वार्षिक कार्यशाळेच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा उत्साह सर्जनशीलता आणि शिक्षणाच्या माध्यमातून जिवंत होतो. गणेशोत्सव हा ‘युवा’साठी केवळ सण नसून कल्पनाशक्ती, ज्ञान आणि एकत्रित आनंदाचा उत्सव आहे आणि मुले या आनंदसोहळ्याचा केंद्रबिंदू असतात.
या वर्षी ‘युवा’चा हा उपक्रम महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटकसह विविध राज्यांतील ८० हून अधिक शाळांपर्यंत पोहोचला आणि उत्सवाचा आनंद सर्वत्र द्विगुणित करण्यात आला. मुंबई मध्ये ‘युवा’ने काळाचौकी येथील अहिल्या विद्यामंदिर, महात्मा एज्युकेशन अकॅडमी सीबीएसई, उल्हासनगर येथील नेताजी इंग्लिश स्कूल, नेरळमधील विद्या विकास मंदिर, वडाळ्यातील आंध्रा स्कूल, पनवेल येथील डीएव्ही पब्लिक स्कूल, बोरीवली (पश्चिम) येथील सेंट रॉक हायस्कूल आणि कांदिवली (पश्चिम) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी स्कूल यांसह अनेक शाळांना भेट दिली. देशभरातील २४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात भाग घेतला आणि सुंदर कलाकृतींमधून गणरायाला सर्जनशील अभिवादन केले.
‘युवा स्टेशनरी’चे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर (सीएसओ) श्री. अभिजीत सान्याल म्हणाले : “सण ही आनंद, एकत्र येणे आणि शिकण्याची संधी असते, अशी ‘युवा’मध्ये आमची धारणा आहे. ‘माय बाप्पा सेलिब्रेशन’च्या उपक्रमातून आम्ही मुलांना सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी साधने आणि प्रेरणा देतो. तसेच सांस्कृतिक मूल्यांशी त्यांना जोडतो. आमचे प्रयत्न का महत्त्वाचे आहेत, हे त्यांच्या उत्साहातून आणि कलाकौशल्यातून आम्हाला नेहमीच उमगते.”
‘माय बाप्पा वर्कशॉप’ हा उपक्रम म्हणजे लहानग्यांच्या मनात सामूहिक समारंभाची भावना, सांस्कृतिक नाते आणि स्वतःला व्यक्त करण्याची ताकद जोपासण्याची बांधिलकी आहे. प्रत्येक सण हा मुलांसाठी शिकण्याचा आणि प्रगती साधण्याचा अर्थपूर्ण क्षण ठरावा, याची काळजी ‘युवा’तर्फे’कायम घेण्यात येते.