Uncategorizedटॉप न्यूज़

टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकलच्या ग्राहकांना संपूर्ण जीएसटी कमी केल्याचा लाभ मिळणार

Tata Motors Commercial Vehicle customers will benefit from the entire GST reduction

Posted By Anagha Sakpal,7 September2025

मुंबई,  (NHI@24)भारतातील सर्वात मोठी वाणिज्यिक (कमर्शियल) वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आज आपल्या संपूर्ण वाणिज्यिक वाहन श्रेणीवरील अलीकडील जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देणार असल्याची घोषणा केली. येत्या २२ सप्टेंबर २०२५ पासून सुधारित जीएसटी दर आणि हा लाभ लागू होईल.

टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्रीगिरीश वाघ म्हणाले की, “वाणिज्यिक वाहनांवरील जीएसटी १८% पर्यंत कमी करणे हे भारताच्या वाहतूक आणि लॉजिस्टिक्सला पुनरुज्जीवित करण्याच्या दिशेने टाकलेले एक धाडसी आणि महत्त्वाचे पाऊल आहे. माननीय पंतप्रधानांच्या स्वप्नातून आणि माननीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी कौन्सिलने जाहीर केलेल्या प्रगतीशील सुधारणांनी प्रेरित होऊन टाटा मोटर्सला आमच्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा देशभरातील ग्राहकांना देताना अभिमान वाटतो. विश्वासाचा समृद्ध वारसा व भविष्यासाठी तयार वाहने आणि वेगवान उपाययोजनांच्या व्यापक पोर्टफोलिओसह आम्ही भारताची प्रगती करणाऱ्यांसाठी एक उत्तम भागीदार आहोत. आम्ही व्यवसाय, गतिशीलता सक्षम करून वाढीला चालना देतो.”

 वाणिज्यिक वाहने ही भारताच्या आर्थिक इंजिनाच्या पाठीचा कणा आहेत – लॉजिस्टिक्सला चालना देणे, व्यापार सक्षम करणे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील समाजाला जोडणे या गोष्टी ती करतात. टाटा मोटर्सचे उद्दिष्ट आमच्या वाणिज्यिक वाहन श्रेणीतील किमती कमी करून वाहतूकदार, फ्लीट ऑपरेटर आणि लहान व्यवसायांसाठी मालकीचा एकूण खर्च आणखी कमी करणे हे आहे. यामुळे प्रगत आणि स्वच्छ गतिशीलता उपायांपर्यंत अधिक प्रवेशासह जलद फ्लीट आधुनिकीकरणाला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे वाहतूकदार खर्च कमी करू शकतील, ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारू शकतील आणि नफा वाढू शकेल.

२२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या टाटा मोटर्स कमर्शियल वाहनांवरील संभाव्य किमती किती प्रमाणात कमी होतील, त्याची माहिती खालीलप्रमाणे आहेग्राहकांना आगामी सणासुदीच्या काळात डिलिव्हरीसाठी त्यांचे पसंतीचे वाहन लवकर बुक करण्यास आम्ही प्रोत्साहित करत आहोत.

Product Reduction in price range (Rs)
HCV from 2,80,000 to 4,65,000
ILMCV from 1,00,000 to 3,00,000
Buses & Vans from 1,20,000 to 4,35,000
SCV Passenger from 52,000 to 66,000
SCV & Pickups from 30,000 to 1,10,000

 तुमच्या जवळच्या अधिकृत टाटा मोटर्स शोरूममध्ये तुमच्या प्राधान्याच्या वाणिज्यिक वाहन प्रकाराची निश्चित किंमत खात्री करून घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!