टॉप न्यूज़दिल्ली NCR

जय अंबे सुपरमार्केट्स लिमिटेड एसएमई आयपीओ खुला होत आहे १० सप्टेंबर २०२५ रोजी

 JAY AMBE SUPERMARKETS LIMITED SME IPO Opens on 10th September, 2025

Posted By Anagha Sakpal,7 September2025

  • एकूण २३,६४,८०० एवढ्या इक्विटी समभागांचा इश्यू, एकत्रित मूल्य ₹ १,८४४.५४ लाख रुपयांपर्यंत
  • प्राइस बॅण्ड (दरश्रेणी)– प्रति समभाग ७४ रुपये ते ७८ रुपये
  • दर्शनी मूल्य – १० रुपये प्रति समभाग
  • लॉटचे आकारमान १६०० इक्विटी समभाग
  • सूचित – बीएसई एसएमई

MUMBAI : जय अंबे सुपरमार्केट्स लिमिटेडने १० सप्टेंबर, २०२५ रोजी खुल्या होणाऱ्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाच्या (आयपीओ) माध्यमातून सार्वजनिक होत असल्याची घोषणा केली आहे. ही कंपनी बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचित केली जाणार आहे.

जय अंबे सुपरमार्केट्स लिमिटेड विषयी

 

ही कंपनी गुजरात राज्यभरातील १७ सुपरमार्केट्सच्या माध्यमातून एफएमसीजी उत्पादने, किराणामाल, गृहोपयोगी वस्त्रे (होम टेक्स्टाइल), गृह सजावटीची उत्पादने, कापड तसेच तयार कपडे, खेळणी, भेटवस्तू, पादत्राणे आणि गृहोपयोगी वस्तूंचा व्यापार करत आहे. सिटी स्क्वेअर मार्ट हा ब्रॅण्ड जय अंबे सुपरमार्केट्स लिमिटेड या कंपनीच्याच मालकीचा आहे. कंपनी रिटेल मार्ट्स व फ्रँचायझी मॉडेल यांच्या माध्यमातून व्यवसाय करत आहे. कंपनीने गांधीनगरमधील कुडासन येथे पहिले दुकान उघडून ऑगस्ट २०१८ मध्ये व्यवसायाला सुरुवात केली आणि ६ वर्षांत गुजरातमध्ये १७ दुकाने उघडण्यापर्यंत विस्तार केला. सर्वोत्तम दर्जाची सेवा, विस्तृत उत्पादन श्रेणी आणि वाजवी किमती यांच्या जोरावर कंपनीने वेगाने वाढ साध्य केली आहे; कंपनीपुढे राहणीमान उंचावण्याचे उद्दिष्ट तर आहेच, शिवाय केवळ नफ्याहून अधिक महत्त्व ग्राहकाच्या समाधानाला देण्यावर कंपनी लक्ष केंद्रित करत आहे. खरेदी, विक्री व इन्वेंटरी व्यवस्थापनाच्या कामकाजातील आणि अन्य प्रशासकीय कामांतील कार्यक्षमता सुधारण्यासाठी तसेच राखण्यासाठी कंपनी ईआरपी प्रणालींचा वापर करत आहे. फ्रँचायझींकडून आकारले जाणारे शुल्क, लिस्टिंग व डिसप्ले शुल्क तसेच रॉयल्टी यांच्याद्वारेही कंपनीला कार्यात्मक उत्पन्न मिळत आहे.

 

सिटी स्क्वेअर मार्टची सध्या १७ दुकाने आहेत, यातील १० दुकाने कंपनीच्या मालकीची आहेत व ती चालवलीही कंपनीद्वारेच जातात, तर ७ फ्रँचायझी स्टोअर्स आहेत. अमिन मार्ग (राजकोट), भुज, मावडी (राजकोट), मेहसाणा, न्यू चांदखेडा आणि ओगनाज येथे ही दुकाने आहेत. या ७ दुकानांपैकी भुज आणि चांदखेडा येथील दुकाने एफओसीओ (फ्रँचायझी ओन्ड, कंपनी ऑपरेटेड) तत्त्वावर चालवली जातात, तर उर्वरित दुकाने एफओएफओ (फ्रँचायझी ओन्ड, फ्रँचायझी ऑपरेटेड) तत्त्वावर चालवली जातात. यातून कंपनीचा या प्रदेशात व्यवसाय करण्याचा वैविध्यपूर्ण दृष्टीकोन दिसून येतो.

 

जय अंबे सुपरमार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जिग्ने पटेल म्हणाले,  “बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवरील आमच्या आगामी आयपीओची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना दर्जेदार उत्पादने व अपवादात्मक सेवा पुरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही आमचे कार्यक्षेत्र सातत्याने वाढवत व विस्तारत असतानाच, नीतीमत्ता, सहानुभूती, निष्ठा, पारदर्शकता व उत्कृष्टता या प्रमुख मूल्यांप्रती समर्पित आहोत.”

 

इश्यूमागील उद्दिष्टे (जय अंबे सुपरमार्केट्स आयपीओ उद्दिष्टे)

१. अहमदाबाद येथील नाना चिलोडा येथील कंपनीच्या सध्या अस्तित्वात असलेल्या दुकानाची खरेदी (‘निर्धारित दुकानाचे अधिग्रहण’)

२. तीन (३) दुकानांच्या अंतर्गत रचनेसाठी (फिट-आउट) खरेदी

३. खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करणे

४. सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे

 

इश्यू रचना
इश्यू खुला होण्याची तारीख बुधवार, १० सप्टेंबर, २०२५
इश्यू बंद होण्याची तारीख शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५
क्यूआयबी अँकर कमाल ६,७२,००० इक्विटी समभाग
एनईटी क्यूआयबी कमाल ४,४९,६०० इक्विटी समभाग
एनआयआय किमान ३,३७,६०० इक्विटी समभाग
व्यक्तिगत गुंतवणूकदार किमान ७,८७,२०० इक्विटी समभाग
मार्केट मेकर १,१८,४०० इक्विटी समभाग

 

बीलाइन कॅपिटल अॅडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इश्यूसाठी लीड मॅनेजर म्हणून काम बघत आहे, तर एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इश्यूसाठी रजिस्ट्रार म्हणून काम बघत आहे.

 

आर्थिक बाबी

 

(लाख रुपये)
तपशील आर्थिक वर्ष २३ आर्थिक वर्ष २४ आर्थिक वर्ष २५
कामकाजाद्वारे मिळणारे उत्पन्न ३,२६८.९६ ३,३३८.६८ ४,७३५.२८
ईबीआयटीडीए १२४.३३ ३१६.०८ ४८९.६०
आबीआयटीडीए (%) ३.८०% ९.४७% १०.५३%
पीएटी ३५.३० १५४.८९ २७५.३७
पीएटी (%) १.०८% ४.६४% ५.८२%

अस्वीकृती: जय अंबे सुपरमार्केट्स लिमिटेड ही कंपनी लागू वैधानिक व नियामक आवश्यकता, आवश्यक मंजुऱ्यांची प्राप्ती, बाजारातील परिस्थिती आणि विचारात घेतलेल्या अन्य बाबी यांना अधीन राहून, आपल्या इक्विटी समभागांचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीएक मांडत आहे तसेच कंपनीने ०२ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनी रजिस्ट्रार यांच्याकडे प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे आणि त्यानंतर सेबी व शेअर बाजारांपुढेही दाखल केला आहे. हा प्रॉस्पेक्ट्स एसएमई बीएसईच्या https://www.bsesme.com/PublicIssues/RHP.aspx या वेबसाइटवर उपलब्ध आहे. इक्विटी समभागांमधील गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात जोखीम असते याची प्रत्येक संभाव्य गुंतवणूकदाराने नोंद घ्यावी आणि त्याच्याशी संबंधित तपशिलांसाठी कृपया प्रॉस्पेक्टस वाचावे, प्रॉस्पेक्ट्समधील पान क्रमांक ३१ वर ‘रिस्क फॅक्टर्स’ या शीर्षकाखाली दिलेले तपशील वाचावे.

 इक्विटी समभागांची नोंदणी सुधारित यू. एस. सिक्युरिटीज कायदा १९३३ अंतर्गत (‘सिक्युरिटीज कायदा’) किंवा अमेरिकेतील अन्य कोणत्याही राज्याच्या सिक्युरिटी कायद्यांखाली करण्यात आलेली नाही आणि केली जाणार नाही तसेच अमेरिकेच्या सीमांमध्ये ते देऊ केले जाऊ शकणार नाहीत किंवा विकले जाऊ शकणार नाहीत किंवा ‘अमेरिकी व्यक्तीच्या’ (सिक्युरिटी कायद्यातील नियम एस खाली केलेल्या व्याख्येनुसार) खात्यावर किंवा लाभासाठी देऊ केले किंवा विकले जाणार नाहीत, सिक्युरिटी कायद्याच्या नोंदणीविषयक आवश्यकतांच्या अधीन नसलेला किंवा त्यापासून मुक्त असा व्यवहार केवळ याला अपवाद ठरू शकेल. त्याचप्रमाणे सिक्युरिटी कायद्यातील ‘नियम एस’ची किंवा हे प्रस्ताव किंवा विक्री ज्या न्यायक्षेत्रात करावयाची असेल तेथील लागू नियमांची पूर्तता झाल्यास इक्विटी समभाग अमेरिकेच्या सीमेत देऊ केले जातील किंवा त्यांची विक्री केली जाईल. भारताबाहेरील कोणत्याही न्यायक्षेत्रात इक्विटी समभागांची नोंदणी करण्यात आलेली नाही आणि केली जाणार नाही तसेच ते या कोणत्याही न्यायक्षेत्रात सूचित करण्यात आलेले नाहीत, पात्र ठरवण्यात आलेले नाहीत व भविष्यात तसे केले जाणार नाहीत तसेच या न्यायक्षेत्रांत त्यांचा प्रस्ताव किंवा विक्रीही केली जाऊ शकणार नाही आणि अशा न्यायक्षेत्रातील व्यक्ती यांसाठी बोलीही लावू शकणार नाहीत, केवळ या न्यायक्षेत्रांतील लागू कायद्यांची पूर्तता होत असल्यास याला अपवाद केला जाऊ शकेल.

 यापुढे जात, अर्जदार कोणताही इक्विटी समभाग विकणार किंवा हस्तांतरित करणार नाही किंवा त्याद्वारे आर्थिक हितसंबंध निर्माण करणार नाही यासाठी प्रत्येक अर्जदाराला आवश्यक तेथे तशी सहमती दर्शवावी लागेल, यामध्ये इक्विटी समभागांवर जारी करण्यात आलेल्या पार्टिसिपेटरी नोट्स किंवा तत्सम सिक्युरिटींसारख्या परदेशांतील डेरिएटिव साधनांचा समावेश होतो, या नियमातून वगळली गेलेली किंवा सिक्युरिटी कायद्याच्या नोंदणी आवश्यकतांना अधीन नसलेली तसेच भारतासह प्रत्येक न्यायक्षेत्रातील लागू कायदे व नियम यांची पूर्तता करणारी साधने याला अपवाद ठरू शकतात.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!