Uncategorized

देव ॲक्सीलेरेटर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 10 सप्टेंबर 2025 पासून होणार

देव ॲक्सीलेरेटर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 10 सप्टेंबरपासून

Posted By Anagha Sakpal 5 September2025

प्रति इक्विटी शेअरसाठी 56 रुपये ते 61  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा

  • प्रत्येकी 2 रुपये (“इक्विटी शेअर्स”) दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 56 रुपये ते 61 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित. 
  • फ्लोअर प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 00 पट आणि कॅप प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 30.50 पट
  • बोली/ऑफर बुधवार, 10 सप्टेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 9 सप्टेंबर 2025 असेल
  • बोली किमान 235 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 235 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

मुंबई, : देव ॲक्सीलेरेटर लिमिटेड (“कंपनी”) आपल्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्री संदर्भात बोली/ऑफर बुधवार 10 सप्टेंबर 2025 रोजी खुली करणार आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 9 सप्टेंबर 2025 असेल. बिड / ऑफर बुधवार, 10 सप्टेंबर 2025 रोजी खुली होऊन शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल. (“IPO Issue Dates”) बोली किमान 235  इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 235  इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“बिड डिटेल”) ऑफरचा किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअरसाठी 56 रुपये ते 61  रुपये निश्चित करण्यात आला आहे.(“इश्यू प्राईस”) एकूण ऑफर साईज मध्ये 1,433.50 दशलक्ष रु. [143.35  कोटी रु.] (कमाल किंमतपट्टावर मोजणी) (“फ्रेश इश्यू”) (एकूण इश्यू साईज) पर्यंतच्या किंमतीच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू समाविष्ट आहेत. त्यामध्ये  ऑफर फॉर सेल (OFS) घटकाचा समावेश नाही.

कंपनी इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूमधून मिळणारा निव्वळ निधीचा उपयोग पुढीलप्रमाणे करणार आहे: (अ)  अंदाजित रक्कम 731.16 दशलक्ष रु. [73 कोटी रु.] च्या प्रस्तावित केंद्रासाठी भांडवली खर्च; (ब) अंदाजे 350 दशलक्ष रु. [35 कोटी रु.] पर्यतच्या नॉन कन्व्हर्टबल डीबेन्चर्सच्या रीडेम्शनसह आपल्या कंपनीने घेतलेल्या काही विशिष्ट कर्जाची संपूर्ण किंवा काही प्रमाणात परतफेड किंवा पूर्वफेड (क) उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी. (“ऑफरचा उद्देश”)

कंपनी आपल्या ग्राहकांना फ्लेक्सिबल वर्कस्पेसेसच्या (काम करण्याची जागा) स्वरूपात स्पेस सोल्यूशन्स उपलब्ध करून देते. टियर 2 बाजारपेठेमध्ये  ऑपरेशनल फ्लेक्स स्टॉकच्या दृष्टीने त्या सर्वात मोठ्या फ्लेक्स स्पेस ऑपरेटर्सपैकी एक आहेत (स्रोत: JLL अहवाल). कंपनी  स्ट्रेट लीज मॉडेल,  रेव्हेन्यू शेअर मॉडेल,  फर्निश्ड बाय लँडलॉर्ड मॉडेल आणि ऑपको – प्रॉपको मॉडेल द्वारे वर्कस्पेसेस सोर्स आणि प्रोकेअर करते. 31 मे 2025 पर्यंत, कंपनीकडे भारतातील 11 शहरांमध्ये 28 केंद्र आणि 250 हून अधिक ग्राहक आहेत. त्यामध्ये 14,144 सीट्सचा समावेश असून SBA 860,522 चौरस फूट क्षेत्र व्यवस्थापनाखाली आहे.

हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) द्वारे सादर करण्यात येत असून रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, अहमदाबाद, गुजरात (“ RoC”), सेबी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. हे शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. NSE हे निर्धारित स्टॉक एक्सचेंज आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 (आर्थिक वर्ष 25) मध्ये, कंपनीने कामकाजामधून 158.88 कोटी रु. इतका महसूल नोंदवला. मागील आर्थिक वर्षातील 108.09 कोटी रु.च्या तुलनेत तो 47 टक्के जास्त आहे. करानंतरचा पुनर्स्थापित नफा आर्थिक वर्ष 25 मध्ये 1.77 कोटी रु. इतका होता, जो आर्थिक वर्ष 24 मधील 0.44 कोटी रु.च्या तुलनेत 305.72% ने वाढला. व्याज, कर, घसारा आणि अमॉर्टायझेशनपूर्व समायोजित उत्पन्न आर्थिक वर्ष 25 मध्ये 80.46 कोटी रु.इतके झाले.

ही ऑफर SCRR, 1957 च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली  जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 75% पेक्षा कमी नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion (प्रमुख गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा वगळून) (“Net QIB Portion”) मध्ये समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. त्यानंतर संपूर्ण अर्जाची रक्कम तात्काळ परत केली जाईल.

याव्यतिरिक्त नेट ऑफर पैकी 15% पेक्षा जास्त नसलेला भाग बिगर संस्थात्मक बोली लावणारे (“NIBs”) (“बिगर संस्थात्मक भाग”) यांच्यासाठी गुणोत्तरीय प्रमाणावर वाटपासाठी उपलब्ध असेल. त्यापैकी (अ) एक तृतीयांश भाग 0.20  दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब्) दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 10% पेक्षा जास्त नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.

तसेच, 164,500  पर्यंतचे इक्विटी शेअर्स एकत्रितपणे रु.[●] दशलक्षपर्यंत, पात्र कर्मचाऱ्यांना (Eligible Employees) कर्मचारी आरक्षण भागाअंतर्गत (Employee Reservation Portion) त्यांच्या वैध बोली (Bids) इश्यू प्राईस (Issue Price) वर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर प्राप्त झाल्यास, प्रमाणानुसार वाटप केले जातील आणि 329,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स एकत्रितपणे रु.[●] दशलक्षपर्यंत, केवळ पात्र शेअरहोल्डर्सना (Eligible Shareholders) शेअरहोल्डर्स आरक्षण भागाअंतर्गत (Shareholders Reservation Portion) प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध करून दिले जातील. त्यांच्या वैध बोली (Bids) इश्यू प्राईस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.

येथून पुढे, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची वैध बोली ऑफर किंमती एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास इक्विटी शेअर्सचे प्रमाणात वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. पॅटोमॅथ कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या आयपीओ इश्यूचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

Disclaimer:

DEV ACCELERATOR LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the RHP dated September 02, 2025 with RoC, SEBI and the Stock Exchanges. The RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, and is available on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.devx.work and the website of the BRLM, i.e., Pantomath Capital Advisors Private Limited at www.pantomathgroup.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see ‘‘Risk Factors’’ beginning on page 43 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges, and should instead rely on their own examination of our Company and the Issue, including the risks involved, for making any investment decision.

The Equity Shares have offered in the Issue not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (The “U.S. Securities Act”) or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exception from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of each jurisdictions where such offers and sales are made.

Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be offered or sold, and Bids may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!