Uncategorized

थम्‍स अप आणि बिर्याणी, एकत्रित सर्वात तूफानी रूपात!

थम्‍स अप आणि बिर्याणी, एकत्रित सर्वात तूफानी रूपात!

POSTED BY: ANGHA SAKPAL.AUGUST 31 , 2025

थम्‍स अपच्‍या नवीन मोहिमेमध्‍ये शाहरूख खान आणि जगपती बाबू एकत्र आले आहेत, ही नवीन मोहिम विशेष टीव्‍ही, डिजिटल व ग्राहक सहभाग ॲक्टिव्हिटीजच्या माध्‍यमातून बिर्याणी व थम्‍स अपप्रती भारतीयांच्‍या प्रेमाला साजरे करते 

मोहिमेसाठी लिंक्‍स – हिंदीLink 1Link 2 |

नवी दिल्‍लीऑगस्‍ट २९२०२५थम्‍स अप या कोका-कोला इंडियाच्‍या प्रख्‍यात बिलियन-डॉलर ब्रँडने आज नवीन मोहिम ‘बिर्याणी एक नही, दो हाथ से खाते है’ लाँच केली, ज्‍यामध्‍ये बॉलिवुड सुपरस्‍टार शाहरूख खान आणि तेलुगू सिनेमा लीजेण्‍ड जगपती बाबू आहेत. ही मोहिम परिपूर्ण बिर्याणी अनुभवाला दर्शवते, जी बिर्याणीचा आस्‍वाद घेण्‍याचा मनमुराद आनंद देते, तसेच काहीसा विरंगुळा घेत प्रत्‍येक स्‍वादाचा मनसोक्‍त आस्‍वाद घेण्‍याची आणि उत्‍साहपूर्ण क्षणाचा आनंद घेण्‍याची आठवण करून देते.

गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये ब्रँडने थम्‍स अपसोबत बिर्याणीचा आस्‍वाद घेण्‍याच्‍या आनंदाला नव्‍या उंचीवर नेले आहे आणि त्‍या क्षणाला उत्‍सवी प्रथेमध्‍ये बदलले आहे. बिर्याणीसह या पेयाचा आस्‍वाद घेणे आता प्रथा बनली आहे, जी ग्राहकांना आत्‍मसात केली आहे. फिझ व थंडरस चवीसह थम्‍स अप भारतीयांच्‍या बिर्याणीचा आस्‍वाद घेण्‍याच्‍या क्षणाला अधिक उत्‍साहवर्धक करते.

मोहिम या गतीला पुढे घेऊन जाते आणि या जोडीला आहारापेक्षा अधिक बनवते. फोनची रेलचेल असलेल्‍या, टीव्‍हीचा छान आनंद घेतल्‍या जाणाऱ्या आणि धावपळीच्‍या विश्वामध्‍ये बिर्याणीचा घाईघाईने नाही तर मनमुराद आस्‍वाद घेतला पाहिजे. म्‍हणून, काहीसा मोकळा वेळ घ्‍या, फोन बाजूला ठेवा आणि बिर्याणीसह थंडगार थम्‍स अपचा आस्‍वाद घ्‍या.

प्रख्‍यात चित्रपटनिर्माते कार्तिक सुब्‍बाराज दिग्‍दर्शित या टीव्हीसीची सुरुवात शाहरुख खान आणि जगपती बाबू यांच्यातील तणावपूर्ण संघर्षासह होते, जो बिर्याणी आणि थम्स अप आल्यानंतर तूफानी अनुभवात बदलतो.

कोकाकोला इंडिया  साऊथवेस्‍ट एशियाच्‍या विपणन विभागाच्‍या उपाध्‍यक्ष सुमेली चॅटर्जी म्‍हणाल्‍या, “थम्‍स अप नेहमी साधारणपेक्षा मोठ्या क्षणांमध्‍ये अग्रणी राहिली आहे. गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये आम्‍ही बिर्याणी-थम्‍स अप जोडीला विशिष्‍ट प्रथेमध्‍ये बदलले आहे. २०२३ मध्‍ये आम्‍ही तूफानी बिर्याणी हंट सिरीज लाँच केली, जिला देशभरातील चाहत्‍यांकडून भरपूर प्रेम मिळाले. आता, आम्‍ही या गतीला अधिक पुढे घेऊन जात आहोत, थम्‍स अप व बिर्याणीला सामाजिक घटक म्‍हणून प्रबळ करत आहोत. ही जोडी सांस्‍कृतिक संकेत बनली आहे, जेथे व्‍यक्‍तींची या जोडीला शेअर करण्‍याची, सतत आस्‍वाद घेण्‍याची आणि अवलंबण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे.”

शाहरूख खान म्‍हणाले, “भारतात आपण हैदराबादी, लखनवी की कोलकाता यापैकी कोणती बिर्याणी सर्वोत्तम आहे याबाबत वादविवाद करतो, पण बिर्याणीचा आस्‍वाद घेण्‍याची पद्धत महत्त्वाची आहे. तुम्‍ही बिर्याणीचा घाईघाईने आस्‍वाद घेत चूक करत आहात, त्‍याऐवजी थम्‍स अपसोबत मनसोक्‍तपणे बिर्याणीचा आस्‍वाद घ्‍या आणि अद्वितीय स्‍वादाचा अनुभव घ्‍या.”

जगपती बाबू म्‍हणाले, “मी जेथून आलो आहे तेथील बिर्याणी फक्‍त डिश नाही, तर परंपरा आहे. बिर्याणीचा छान आस्‍वाद घेतल्‍यास प्रत्‍येक चवीमधून सुगंध, मसालेदार स्‍वादाचा अनुभव मिळेल. आणि बिर्याणीसोबत थम्‍स अपचा आस्‍वाद घेतला तर हा अनुभव कधीच न संपणारा असेल.”

व्हीएमएल इंडियाचे ग्रुप सीओओ कल्‍पेश पाटणकर म्‍हणाले, “ही मोहिम बिर्याणी अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते, आकर्षक नवीन प्रथेमध्‍ये बदलते, जेथे फक्‍त एका हाताने बिर्याणीचा आस्‍वाद घेणे पुरेसे नाही. आम्‍ही भारतीयांना सर्व गोष्‍टी बाजूला ठेवून एका हाताने त्‍यांची आवडती बिर्याणी आणि दुसऱ्या हाताने थम्‍स अप उचलत या जोडीचा आस्‍वाद घेण्‍याचे आवाहन करतो. कारण बिर्याणी व थम्‍स अप फक्‍त आहार नाही तर एकतेचे प्रबळ साजरीकरण आहेत.”

ही एकीकृत मोहिम टीव्‍ही, डिजिटल, सोशल व ऑन-ग्राऊंड टचपॉइण्‍ट्सवर, तसेच चाहत्‍यांना विशेष बिर्याणी वाऊचर्ससह पुरस्‍कारित करणाऱ्या ग्राहक सहभाग प्‍लॅटफॉर्म्‍सवर राबवण्‍यात येईल. या मोहिमेसह थम्‍स अप आहाराचा आस्‍वाद घेण्‍याच्‍या क्षणाला उत्‍साहित करत आहे, जेथे व्‍यक्‍ती सतत त्‍याची मागणी करतील, कारण बिर्याणीचा आस्‍वाद घेण्‍याचे अनेक मार्ग असतील, पण एकच तूफानी मार्ग आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!