Uncategorized

‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव

‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव

POSTED BY: ANGHA SAKPAL AUGUST 31 , 2025

(NHI@24)गणेशोत्सव म्हणजे उत्साह, भक्ती, आणि चैतन्याने भरलेलं वातावरण! या सणामध्ये घराघरात आणि मनामनात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. हाच सकारात्मकतेचा अनुभव यावर्षी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर हिनेसुद्धा घेतला तोही दोन ठिकाणी! ‘लखात एक आमचा दादा’ मध्ये तुळजा ही भूमिका साकारत असलेली  मृण्मयीने सांगितले की, “यावर्षी मी गणपती बाप्पाची पूजा दोनदा केली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते कि मला दोनदा गणपती बाप्पा अनुभवायला मिळाले. एक आमच्या मालिकेत म्हणजेच जगताप कुटुंबांनी बाप्पाच स्वागत केलं, गणेश आगमनाचा सीन आम्ही  गणेशोत्सव सुरु व्हायच्या आधी शूट  केला होता आणि  गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जन पर्यंत सर्व आम्ही मनापासून आणि उत्साहपूर्वक शूट केलं. फक्त गणपतीचं नाही तर आमच्याकडे गौराई ही बसल्या होत्या, त्याआधी हरतालिकेची पूजा मला सर्व पूजा करायला मिळाल्या. या सणाची सुरु आधीच आमच्या सेटवर सुरु झाली होती, आणि लाखात एक आमचा दादा मालिकेमुळे हे इतकं सगळं सुंदरपणे अनुभवायला मिळाल. मी माझ्या भूमिकेला ‘तुळजा’ ला धन्यवाद म्हणेन कि तिच्यामुळे मला गणेशोत्सव दोनदा साजरा करायला मिळाला. माझ्या घरी १.५ दिवसाचा गणपती असतो आणि नेहमी प्रमाणे  या वर्षी ही १५-२० आधी पासूनच  तयारी सुरु केली होती. आम्ही इकोफ्रेंडली पद्धतींनी गणेशोत्सव साजरा करतो. अगदी साधं आणि सुंदर डेकोरेशन केले होते, बाप्पाच्या आवडीचे मोदक नेवेद्याला केले, गणपती अथर्वशीर्ष आवर्तन असत. त्यामुळे हे  वर्ष माझ्यासाठी खूपच विशेष आणि भाग्याचं ठरलं.”

तेव्हा बघायला विसरू नका ‘लाखात एक आमचा दादा’ दररोज संध्या. ६:०० वा. झी मराठी वाहिनीवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!