Uncategorized
घरात श्री गणरायाची प्रतिष्ठापना नवा आदर्श;कुलाबा येथील मुस्लिम खान कुटुंबाचा ऐक्याचा संदेश
Installation of Shri Ganesha is a new ideal; Message of joy from Khan family in Colaba


मुंबई 🙁 सुजित धाडवे ) हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणजे गणेशोत्सव १४ विद्या आणि ६४ कलांचा दाता असलेल्या श्री गणरायाचे हिंदू बांधव सार्वजनिक आणि घरोघरी पूजन करतात. मुंबई येथील कुलाबा गणेश मुर्ती नगर येथील इस्माईल उर्फ मनीष खान हे मुस्लिम धर्मातील असूनही गेले तीन वर्षे गणेश चतुर्थीला घरामध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून चतुर्थी साजरी करतात. खान कुटुंबांनी आपल्या घरात श्री गणरायाची प्रतिष्ठापना आणि पूजा करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे
इस्माईल उर्फ मनीष अबू खान अनेक वर्ष मुंबईत राहत असून बॅकबे सार्वजनिक् गणेशोत्सव मंडळाचा खंदा कार्यकर्ता म्हणून ओळख असून गणेशोत्सव मध्ये मनोभावे श्री गणरायची सेवा करण्याचा व मंडळाच्या सर्व उपक्रमामध्ये सहभागी होत प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
लहानपणापासून मुंबईत राहत असल्यामुळे इस्माईल उर्फ मनीष सर्वच उत्सवामध्ये ते सहभागी होत होते, लहानपणी त्यांना बाप्पाची ओढ लागली होती, त्यांनी त्यांचे वडील अबू सिद्दी खान यांच्याकडे हट्ट धरले, अखेर त्यांनी सन २००२ साली गणरायाची स्थापना केली होती, त्यादरम्यान त्यांनी वर्ष मनोभावे सेवा केली. यानंतर त्यांनी पुन्हा सन २०२३ मध्ये गणरायाची स्थापना करत सात दिवसीय गणेशाची स्थापना करून धार्मिक सहिष्णुतेचे दर्शन घडवले आहे.
इस्माईल उर्फ मनीष खान यांनी सांगितले की, “मला हिंदू धर्मा बद्दल तसेच श्री गणरायावर माझी नितांत श्रद्धा आहे तसेच मला विविध धर्मांबद्दल आदर आहे. माझी सुद्धा प्रचंड इच्छा होती की माझ्या घरी श्री गणेशाची स्थापना व्हावी म्हणून मी मागील तीन वर्षा पासून गणेशाची स्थापना माझ्या घरात केली मला सांस्कृतिक विविधतेचा सन्मान करायचा आहे असेही ते म्हणाले.
गणेशोत्सवाचे सर्वत्र मंगलमय वातावरण तयार असतानाच सर्वधर्म समभाव मांडणारे अनेक कमी असतात.काही राजकीय नेते, काही नागरिक, काही सामाजिक कार्यकर्ते केवळ सर्वधर्म समभाव याची वक्तव्य करतात. मात्र कृती करत नाही. हिंदू धर्माचा श्री गणेश असूनही सर्व धर्म समभाव मानत कुलाबा येथील इस्माईल उर्फ मनीष खान यांनी धर्माने मुस्लिम असले तरी मागच्या तीन वर्षापासून ते आतापर्यंत आपल्या घरात गणपतीचे पूजन करून एक चांगला संदेश देण्याचे काम करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. काहींनी या वृत्तीला सामाजिक ऐक्याचे संदेश दिले, तर काहींनी त्याची प्रशंसा केली.विशेष म्हणजे या वर्षी त्यांचे शेजारी असणाऱ्या कुटुंबाच्या घरी दुःखद प्रसंग आल्याने त्याचे घरी गणपती मूर्तीची प्रतिस्थापना करणे शक्य होत नव्हते परंतु खान कुटूबियाने मनाचा मोठेपण दाखवत आपल्या घरी दोन गणेश मूर्ती विराजमान करीत त्यांची मनोभावे सेवा करीत आहेत.
धर्मांतील भेदाभेद न पाहता मानवता आणि स्नेह वाढवण्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.चर्चगेट येथील सर्व मित्र मंडळीनी खान कुटूबियांच्या घरी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले जात आहे, खान यांच्याकडे दिवसभरातून सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन आरती करून गणेशभकांसह लाभ घेत आहेत.