एस. एस. राजामौली यांची ‘बाहुबली: द एपिक’चा टीझर प्रदर्शित, उत्सुकता शिगेला!
S. S. Rajamouli's 'Baahubali: The Epic' teaser released, curiosity is at its peak!

POSTED BY: ANGHA SAKPAL AUGUST 31 , 2025
भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात यशस्वी ब्लॉकबस्टर देणाऱ्या बाहुबली फ्रँचायझीचा नवा अध्याय!
(NHI@24)बाहुबली फ्रँचायझीमधून दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी भारतीय सिनेमाला एक नवीन ओळख दिली. या चित्रपटांनी केवळ देशातच नव्हे तर विदेशातही मोठ्या प्रमाणावर यश संपादन केलं. बाहुबली: द बिगिनिंग आणि बाहुबली: द कन्क्लूजन या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवलं.
आता या यशस्वी मालिकेचा एकत्रित अनुभव देण्यासाठी, एस. एस. राजामौली यांनी नवा प्रोजेक्ट जाहीर केला आहे – ‘बाहुबली: द एपिक’. या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, आणि आता त्या उत्सुकतेला आणखी एक पातळी मिळाली आहे कारण या नव्या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर अधिकृतरित्या रिलीज करण्यात आला आहे.
पोस्टरमध्ये प्रभासला ‘बाहुबली’ आणि राणा दग्गुबतीला ‘भल्लालदेव’च्या भूमिकेत पुन्हा पाहायला मिळतं. हा पोस्टर जुन्या आठवणी जागवतो आणि तरीही एक नवा जोश आणि ताजेपणा घेऊन येतो. या पोस्टरमध्ये ‘बाहुबली: द एपिक’चा अधिकृत लोगोही समाविष्ट आहे, आणि त्याद्वारे चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
प्रेक्षकांच्या मते, ‘बाहुबली’ ही केवळ एक फिल्म फ्रँचायझी नाही, तर ती भारतीय सिनेमाचा गौरव आहे. या फ्रँचायझीने फक्त बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडले नाहीत, तर पॅन-इंडिया सिनेमा या संकल्पनेला खऱ्या अर्थाने आकार दिला. त्यामुळेच या दोन मास्टरपीस चित्रपटांना एकत्र करून आणलेली ‘बाहुबली: द एपिक’ ही एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना मानली जात आहे. राजामौली यांच्या या नव्या प्रकल्पाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्या महाकाव्य जगात प्रवेश करण्याची संधी दिली आहे. यामुळे, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी येणाऱ्या या चित्रपटाची वाट पाहणं प्रेक्षकांसाठी अधिकच अवघड होणार आहे.
https://www.instagram.com/reel/DN0KKlbwjVP/?igsh=amVub2M2d3hiY2Zp