टेक्नोलॉजी

एमसीएक्सकडून निकेल फ्युचर्स कराराची घोषणा

एमसीएक्सकडून निकेल फ्युचर्स कराराची घोषणा

Posted By Anagha Sakpal 5 September2025

मुंबई,  : मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडने (एमसीएक्स) 18 ऑगस्ट 2025 पासून निकेल फ्युचर्स करार सुरू करण्याची घोषणा केली आहे. या करारामुळे दरनिर्धारणाची प्रक्रिया अधिक प्रभावी होणार असून देशभरातील मूल्य साखळीत अधिक व्यापक सहभागाला प्रोत्साहन मिळणार आहे.
निकेल हा महत्त्वाचा औद्योगिक धातू असून स्टेनलेस स्टील उत्पादन, इलेक्ट्रोप्लेटिंग, ईव्ही बॅटऱ्या आणि इतर अभियांत्रिकी उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून निकेलचा वापर करण्यात येतो. भारत निकेल आयातीवर अवलंबून असल्यामुळे या धातूचा वापर करणाऱ्या उद्योगांना किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अडथळे यांचा मोठा फटका बसतो, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाच्या नफ्यावर कायम दबाव असतो.
निकेल फ्युचर्स करार सुरू झाल्याने या उद्योगांना दरातील चढ-उतारांचा धोका कमी होऊन अधिक स्पर्धात्मक होण्यासाठी सक्षम साधन उपलब्ध होईल. हा करार थेट भारतीय रुपयांमध्ये असल्यामुळे, सहभागी कंपन्यांना केवळ वस्तूंच्या किंमतीतील चढउतारापासूनच नव्हे तर डॉलर-रुपया विनिमय दरातील बदलांपासूनही संरक्षण मिळेल. फिजिकल मार्केटमधील व्यावसायिक कंपन्यांसोबतच, या करारामुळे आर्थिक क्षेत्रातील सहभागी आणि गुंतवणूकदारांसाठीही पोर्टफोलिओ विविधीकरण आणि लिक्विडिटी वाढवण्यासाठी ही गुंतवणुकीची महत्त्वाची संधी ठरणार आहे.
व्यापारासाठीचे युनिट 250 किलो आणि डिलिव्हरीसाठीचे युनिट 1500 किलो असेल, आणि ही अट सप्टेंबर 2025 पासून लागू होणाऱ्या एक्सपायरी करारापासून लागू होईल. कराराच्या एक्सपायरी महिन्यातील तिसरा बुधवार हा व्यवहाराचा शेवटचा दिवस असेल; त्या दिवशी सुट्टी असल्यास त्या आधीचा कामकाजाचा दिवस अंतिम दिवस मानला जाईल. ठाणे हे डिलिव्हरी सेंटर असेल आणि कराराच्या महिन्यातील कामकाजाचे शेवटचे 3 दिवस डिलिव्हरी कालावधी म्हणून ठरविण्यात आले आहेत. एक्स्चेंजकडून केवळ 99.80% किमान शुद्धतेचे, एलएमई मान्यताप्राप्त प्रायमरी निकेल कॅथोड्सच ‘गुड डिलिव्हरी’ म्हणून स्वीकारले जातील.
या करारासाठी टिक साइज प्रति किलो ₹0.10 इतका असेल. दररोजची किंमत मर्यादा 4% ठेवली आहे, तर मार्जिन किमान 10% किंवा एसपीएएन (जे जास्त असेल ते) इतके निश्चित करण्यात आले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना एमसीएक्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणा राय म्हणाल्या, “बेस मेटलचे करार अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि बाजाराच्या बदलणाऱ्या गरजांशी सुसंगत असावे यासाठी एमसीएक्सतर्फे हे लिस्टिंग करण्यात आले आहे. इष्टतम ट्रेडिंग युनिट, एक्स्पायरी शेड्यूल आणि डिलिव्हरी सेंटर निश्चित करून आम्ही मार्केट पार्टिसिपंट्सना सुधारित लिक्विडिटी, माल कुठे मिळणार आहे याविषयीची स्पष्टता आणि जागतिक मापदंडांशी जुळणारी उत्पादन रचना उपलब्ध करून देत आहोत. देशाच्या सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीत आपण वापरत असलेल्या कमॉडिटीजसाठी भारच हा स्वतः दर ठरवणारा देश व्हावा, हे आमचे उद्दिष्ट आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!