युवा

7 वर्षांच्या मुलीच्या पोटापर्यंत विस्तारलेल्या मीडिआस्टिनल मासवर प्रगत थोरॅस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी उपचार

7 वर्षांच्या मुलीच्या पोटापर्यंत विस्तारलेल्या मीडिआस्टिनल मासवर प्रगत थोरॅस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी उपचार

POSTED BY: ANGHA SAKPAL
AUGUST 24 , 2025

मुंबई,  मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबईने प्रगत थोरॅकोस्कोपिक (मिनिमली इन्व्हेजिव्ह) शस्त्रक्रियेद्वारे एका 7 वर्षांच्या मुलीच्या मीडिआस्टिनममध्ये वाढलेला ट्युमर काढून टाकण्याची गुंतागूंतीची आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली ज्यातून मुलीची तब्येत वेगाने पूर्ववत व्हावी व शरीरावर उमटणारऱ्या व्रणाचा आकार लहानात लहान रहावा, याची काळजी घेण्यात आली.

या लहानग्या रुग्णाच्या श्वसनमार्गाची खालील बाजू तीन महिन्यांपूर्वी संसर्गबाधित झाली होती, व रेडिओलॉजिकल तपासण्या केल्या असता हृदयाच्या पोकळीमध्ये दोन फुफ्फुसांच्या मध्यभागी म्हणजे मीडियास्टिनममध्ये ट्युमर तयार झाल्याचे (मीडिआस्टिनल मास) निदान झाले. अल्ट्रासाउंड तपासणीच्या माध्यमातून केलेल्या बायोप्सीमधून हे निदान पक्के झाल्यानंतर ट्युमरचे गुंतागूंतीच्या ठिकाणी असणे लक्षात घेऊन सर्जिकल टीमने थोरॅकोस्कोपिक उच्छेदन करण्याचे योजले.

हे मास एका बाजूला व पाठीच्या दिशेने, पाठीच्या मणक्यातील D10-L1 या हाडांना लागून वाढले होते, श्वासपटलाच्या बाजूला असलेल्या या ट्युमरचा काही भाग या पडद्याच्या वर व काही भाग पडद्याच्या खाली होता. ट्युमर महाधमनी म्हणजे आओर्टा आणि सर्वात मोठी लसिका वाहिनी म्हणजे थोरॅसिक डक्ट यांच्या खूपच जवळ होता – अगदी ओपन सर्जरीद्वारे ही या भागापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण होते. थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रियेमुळे टीमला हा ट्यूमर त्याच्या आवरणासह पूर्णपणे काढून टाकणे व हे करताना छाती व पोटातील मुख्य संरचना सुरक्षित ठेवणे शक्य झाले, ज्यामुळे जीवघेण्या गुंतागूंती टाळता आल्या.

ही प्रक्रिया विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका मल्टिडिसिप्लिनरी टीमच्या देखरेखी खाली पार पाडण्यात आली, ज्यात सहभागी असलेल्या पीडिअॅट्रिक अॅनेस्थेटिस्ट्सनी शस्त्रक्रियेदरम्यान वेदनांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत केली. रुग्णाच्या तब्येतीमध्ये कोणत्याही अडथळ्याविना सुधारणा झाली, शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्याच दिवशी तिने तोंडाने अन्न घेणे सुरू केले, दुसऱ्या दिवशी ती चालू-फिरू लागली व तिसऱ्या दिवशी तिला घरी पाठविण्यात आले.

ही शस्त्रक्रिया ज्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली ते नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्डन्स हॉस्पिटलच्या पीडिअॅट्रिक सर्जरी विभागाचे सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. रसिक शाह म्हणाले, “लहान मुलांमधील थोरॅकोअॅबडॉमिनल ट्युमरवरील उपचारांत प्रचंड नेमकेपणा आणि देखभालीची आवश्यकता असते. या प्रकरणामध्ये ट्यूमर आओर्टा, थोरॅसिक डक्ट आणि श्वासपटल यांच्यासारख्या नाजूक भागांजवळ होता आणि त्याचा काही भाग पोटातही असल्याने हे प्रकरण विशेषत्वाने आव्हानात्मक होते. थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रियेमुळे कोणत्याही हानीशिवाय अचूकतेने ट्यूमर काढणे शक्य होतेच पण त्याचबरोबर ओपन शस्त्रक्रियेच्या तुलनेत दिसण्याच्या दृष्टीने शरीरावर मोठा व्रण होत नाही, वेदना कमी होतात आणि रुग्ण अधिक वेगाने बरा होतो. ”

गुंतागूंतीच्या मिनिमली इन्व्हेजिव्ह पीडीअॅट्रिक शस्त्रक्रियांमधील ह़ॉस्पिटलची कुशलता अधोरेखित करताना नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. झुबीन परेरा म्हणाले, “या केसमधून आमच्या हॉस्पिटलची अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यातील निपुणता दिसून येते. मुलांना शक्य तितके चांगले परिणाम मिळवून देण्यासाठी सुरक्षितता, अचूकता आणि सहृदयता यांना एकत्र आणण्यावर आम्ही नेहमीच आपले लक्ष केंद्रित करतो.”

नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल प्रगत तंत्रज्ञान, कुशल विशेषज्ज्ञ आणि बालक-केंद्री दृष्टिकोन यांच्या माध्यमातून अद्यावत पीडिअॅट्रिक सेवा पुरविण्याप्रती सदैव कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!